AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केंद्र सरकारची लवकरच मोठी भेट, कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी दिवाळी धमाका !

आता वाढत्या महागाईने चिंता वाढत असताना ही तीन टक्क्यांची डीए वाढ या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा ठरु शकतो. खास करुन ते कर्मचारी आणि पेन्शनर ज्यांचा पगार किंवा पेन्शन कमी आहे. त्यांच्यासाठी सणासुदीत हा मोठा दिलासा होऊ शकतो. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे कान या घोषणेकडे लागलेले आहेत. .

केंद्र सरकारची लवकरच मोठी भेट, कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी दिवाळी धमाका !
| Updated on: Sep 08, 2025 | 5:09 PM
Share

केंद्र सरकार यंदाच्या दिवाळीच्या तोंडावर कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनरना मोठी भेट देण्याची शक्यता आहे. जुलै ते डिसेंबर २०२५ च्या काळातील महागाई भत्ता ( DA ) यंदा तीन टक्के वाढ मिळू शकते. जर असे झाले तर आता ५५ टक्के असणारा महागाई भत्ता वाढून ५८ टक्के होऊ शकतो. याचा थेट फायदा सुमारे एक कोटी कर्मचारी आणि पेन्शनर्सना मिळणार आहे. सरकार दर दोन वर्षांनी महागाई भत्ताचा आढावा घेत असते. एक जानेवारी महिन्यात आणि दुसऱ्यांदा जुलै महिन्यात. आता जुलै ते डिसेंबरचा कालावधीचा डीए घोषीत होणार आहे. नवरात्रीनंतर आणि दिवाळीच्या आधी यासंदर्भात घोषणा होऊ शकते.

आधी देखील DA त वाढ केली होती

केंद्र सरकारने यावर्षी मार्चमध्ये जानेवारी ते जून २०२५ च्या अवधीसाठी डीएत २ टक्के वाढ केली होती. त्यावेळी डीए ५३ टक्क्यांहून वाढून ५५ टक्के झाला होता. आता पुढील वाढ होणार आहे. जर यावेळी ३ टक्के डीए वाढला तर तो थेट ५८ टक्के होईल. यामुळे वेतन आणि पेन्शनमध्ये काहीशे रुपये दर महिन्यासाठी वाढतील, त्यामुळे सणासुदीच्या काळात मोठा दिलासा मिळेल.

वेतन आणि पेन्शनमध्ये किती फरक पडेल ?

महागाई भत्ता नेहमी बेसिक सॅलरी वा बेसिक पेन्शनच्या हिशेबाने दिला जातो. याचा अर्थ प्रत्येक व्यक्तीला मिळणारी ही रक्कम त्याच्या बेसिक वेतन आणि पेन्शनवर आधारित असणार आहे.

समजा कोणा पेन्शनरला दर महिन्याला ९,००० पेन्शन मिळत असेल तर आताच्या ५५ टक्क्यांच्या डीएच्या हिशेबाने त्याला ४,९५० एक्स्ट्रा मिळतात. जर डीए वाढून ५८ टक्के झाला तर त्यांना ५,२२० रुपये मिळतील. याच प्रकारे दर महिन्याला २७० रुपये जास्त मिळतील.

आता जर कोणा कर्मचाऱ्याची बेसिक सॅलरी १८,००० असेल तर आता ५५ टक्क्यांच्या डीए म्हणजे ९,९०० रुपये मिळतात. ५८ टक्के डीए झाल्यानंतर त्यांना १०,४४० रुपये मिळतील. म्हणजे दर महिन्याला ५४० रुपये वाढ मिळेल. हा पैसा कमी वाटत असला तरी संपूर्ण वर्षाचा हिशेब जमेस धरला तर ही रक्कम ठीकठाक असते. आणि सणाच्या काळात तर प्रत्येक रुपयांचे मोल असते.

कसा निश्चित होतो महागाई भत्ता ?

सरकार डीएचा हिशेब CPI-IW म्हणजे कंझ्युमर प्राईस इंडेक्स फॉर इंडस्ट्रीअल वर्कर्सच्या आकड्यांआधारे करते. जर खाण्यापिण्याच्या वस्तू आणि महागाई वाढली तर हा इंडेक्स देखील वर जात असतो. या हिशेबाने डीए वाढतो. डीए वाढवण्याचा एक निश्चित फॉर्म्युला असतो. परंतू त्यातील तांत्रिक बाबी सर्वसामान्यांना समजण्याची गरज नाही. एवढे मात्र निश्चित की जेवढी महागाई तेवढा डीए जास्त मिळतो.

घोषणा केव्हा होऊ शकते ?

आता पर्यंत केंद्र सरकारने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. परंतू आधीच्या वर्षांप्रमाणे नवरात्रीनंतर आणि दिवाळीच्या आधी ही घोषणा होईल. गेली काही वर्षे सरकारने याच काळात डीएची घोषणा केली आहे. सणासुदीच्या तोंडावर दिलासा दिला जातो. जर सरकारने ३ टक्के वाढ घोषीत केली तर लाखो कुटुंबांना दिवाळीच्या आधी खिशाला थोडा आधार मिळू शकतो.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.