नवी दिल्ली : नवीन वर्षात भविष्यातील आर्थिक खर्चासाठी (Financial Expenditure) ही तरतूद करणे अत्यंत आवश्यक आहे. या योजनेमुळे आयुष्याची संध्याकाळ सुखकर होईल. पण त्यासाठी अर्थातच तुम्हाला भरघोस गुंतवणूक (Investment) करावी लागेल. तरच जोरदार परतावा मिळेल. या योजनेत तुम्ही वार्षिक 72 हजार रुपये प्राप्त करु शकता. त्यामुळे औषधपाण्यावरील खर्च भागविता येऊ शकतो. त्यासाठी वेळेवर कुठे कर्ज मागण्याची गरज भासणार नाही.