‘या’ ठिकाणी मिळते जगातील सर्वात स्वस्त दारू, किंमत फक्त 35 रुपये
Cheap Alcohol : जगातील कानाकोपऱ्यात तुम्हाला दारू मिळेल. तुम्ही वाईन प्रेमी असाल तर आज आम्ही तुम्हाला जगातील अशा ठिकाणांची माहिती सांगणार आहोत तिथे दारूचे दर खूप कमी आहेत.

जगातील एकही असा देश नाही जिथे मद्यप्रेमी सापडणार नाहीत. जगातील कानाकोपऱ्यात तुम्हाला दारू मिळेल. मात्र दारूच्या किमती गेल्या काही काळापासून सतत वाढत आहेत. त्यामुळे मद्यप्रेमींच्या खर्चात वाढ झालेली आहे. तुम्ही वाईन प्रेमी असाल तर आज आम्ही तुम्हाला जगातील अशा ठिकाणांची माहिती सांगणार आहोत तिथे दारूचे दर खूप कमी आहेत. एक ठिकाण तर असे आहे जिथे फक्त 35 रूपयांना दारू मिळते. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
या ठिकाणी मिळते सर्वात स्वस्त वाइन
सर्वात स्वस्त वाइन मिळणाऱ्या ठिकाणांमध्ये पहिला नंबर व्हिएतनामचा आहे. अहवालानुसार, व्हिएतनाममध्ये जगातील सर्वात स्वस्त वाइन मिळते. या वाइनची किंमत भारतीय चलनात फक्त 35 रुपये आहे. व्हिएतनाममधील लोक सरासरी एक लाख रुपये कमवतात, त्यामुळे त्यामुळे त्यांच्या उत्पन्नाच्या तुलनेत ही वाइन खुप स्वस्त आहे. व्हिएतनामनंतर युक्रेनमध्ये सर्वात स्वस्त वाइन मिळते. या वाइनची किंमत फक्त 45 रुपये आहे. त्यापाठोपाठ झांबिया या आफ्रिकन देशातही स्वस्त वाइन मिळते. येथे एका बाटलीची किंमत सुमारे 75 रुपये आहे. व्हेनेझुएला आणि पोर्तुगालमध्येही मद्याच्या किमती कमी आहेत.
वरील देशांमध्ये किंमती कमी का आहेत?
वरील देशांमध्ये जगातील सर्वात स्वस्त वाइन मिळते. याचे कारण या देशांमध्ये उत्पादन शुल्क कमी आहे, तसेच उत्पादन खर्चही कमी आहे. सर्वात स्वस्त ब्रँड्सचा विचार केला तर यात प्रिन्स इगोर एक्स्ट्रीम व्होडका, मोल्सन कॅनेडियन (सर्वात स्वस्त बिअर) आणि टोरो ब्राव्हो टेम्प्रानिलो मेरलोट (सर्वात स्वस्त वाईन) यांचा समावेश आहे.
भारतातही स्वस्त दारू मिळते
भारतात प्रत्येक राज्यात दारूची किंमत वेगळी आहे. काही ठिकाणी दारू स्वस्त आहे तर काही ठिकाणी दारू महाग आहे. याचे कारण म्हणजे प्रत्येक राज्य सरकार स्वतःचे उत्पादन शुल्क ठरवते, हे शुल्क प्रत्येक राज्यात वेगवेगळे असते. गोवा हे भारतातील सर्वात स्वस्त दारू मिळणारे राज्य आहे. कारण या ठिकाणी उत्पादन शुल्क सर्वात कमी आहे. गोव्याशिवाय सिक्कीम, हिमाचल प्रदेश आणि लडाख या राज्यांमध्ये आणि केंद्र शासित प्रदेशात दारूच्या किंमती कमी आहेत.
भारतातील स्वस्त दारू ब्रँड
जर तुम्ही भारतात स्वस्त दारू शोधत असाल, तर कोणत्या ब्रँड परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध आहेत ते शोधूया. भारतातील काही लोकप्रिय आणि परवडणाऱ्या दारू ब्रँडमध्ये ऑफिसर्स चॉइस, मॅकडॉवेल, रॉयल स्टॅग आणि ओल्ड मोंक यांचा समावेश आहे.
