बिअर, रम, वाईन, व्होडका सर्व फेल, भारतात आहे या मद्याची चलती, आकडे पाहून व्हाल हैराण
भारताची लोकसंख्या प्रचंड मोठी असल्याने मद्याच्या बाजारात अनेक ब्रँडना मागणी आहे. परंतू रम, व्होडका, बिअर या मद्यापेक्षा सर्वाधिक मद्याचा हा प्रकार रिचवला जातो. या मद्याच्या भारतीय ब्रँडला केवळ देशातच नाही तर परदेशातही मागणी आहे.

भारतात खाण्यापिण्याचे शौकीन भरपूर आहेत.देशातील अनेक राज्यात मद्याचे सेवन करणारी लोकसंख्याही देखील मोठी आहे. उन्हाळ्यात एकीकडे पार्ट्यांमध्ये बिअर आणि व्होडका यांची मागणी वाढत असते. भारत जगातील सर्वात मोठी दारुची बाजारपेठ आहे. येथे मद्य पिणाऱ्यांची संख्या कोट्यवधीत आहे. आजही ड्राय डे असेल तर त्याच्या आदल्या दिवशी दारुच्या दुकानात रांगा लागलेल्या असतात. कोविड-19च्या साथीत लॉकडाऊनमध्ये ज्यावेळी निर्बंध थोडे शिथील केले जात तेव्हा दारुच्या दुकानात रांगाल लागलेल्या असत. परंतू तुम्हाला वाटत असेल की भारतात वाईन, व्होडका, रम आणि वाईन जास्त लोकप्रिय आहे तर तुम्ही चुकत आहात ? मग कोणते मद्य भारतात प्रसिद्ध आहे पाहूयात…
बाजारावर ‘व्हिस्की’चे एकतर्फी राज्य
आकडे पाहिल्या तुम्हाला समजेल की भारतात सर्वात लोकप्रिय रम, बिअर किंवा व्होडका नाही तर व्हिस्की ( Whisky ) आहे. भारतीय मद्याचे चाहते व्हिस्कीचे दर्दी आहेत. देशातील मद्याचा एकूण बाजाराचा विचार करता, यात व्हिस्कीची हिस्सेदारी अन्य कोणत्याही मद्यापेक्षा जास्त आहे.
ताज्या आकडेवारीनुसार भारतात विकले जाणारे मद्यापैकी 60 टक्क्यांहून अधिक वाटा केवळ व्हिस्कीचा आहे. याचा थेट अर्थ बाजारात जर 10 दारुच्या बाटल्या विकल्या जात असतील तर 6 बाटल्या व्हिस्कीच्या असतात. रम आणि बिअर देखील लोकप्रिय आहे. परंतू व्हिस्कीच्या तुलनेत त्यांचा बाजार मर्यादित आहे.
जगभरात भारतीय ब्रँडचा डंका
भारतीय व्हिस्कीचा जलवा केवळ देशात नव्हे तर संपू्र्ण जगात आहे. जगाच्या मद्याच्या व्यवसायाचे विश्लेषण करणाऱ्या बातम्यानुसार जगात सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या प्रमुख 20 व्हिस्की ब्रँडपैकी अर्ध्यांहून अधिक भारतातील ब्रँड आहेत.
घरगुती बाजारात व्हिस्कीची पकड एवढी मजबूत आहे की एकूण मद्याच्या बाजाराच्या सुमारे दोन तृतीयांस वाटा व्हिस्कीचा आहे. एकीकडे जागतिक आर्थिक आव्हानांमुळे जगाच्या अनेक बाजारात मद्याच्या बाजारात सुस्ती पसरली असताना भारतीय व्हिस्कीचा बाजार वेगाने घौडदौड करत आहे. येथे मागणीची कोणतीही कमतरता नाही, ही मागणी वर्षानुवर्षे वाढतच जात आहे.
येत्या पाच वर्षात चित्र बदलणार
दारु कंपन्या आणि बाजाराचे विश्लेषकांची नजर भारताच्या भविष्यातील लोकसंख्येवर आहे. यामागे (Demographic Reason) लोकसांख्यिक कारण आहे. रिपोर्टनुसार एक मजेशीर तथ्य समोर आले आहे. ते म्हणजे येत्या पाच वर्षात भारतात 10 कोटी लोक असे असतील जे मद्यसेवन (Legal Drinking Age) करण्याच्या वयात पोहचतील. एवढी मोठी लोकसंख्या बाजारात उपलब्ध असणार असल्याने व्हिस्कीच्या मागणीत आणखी वाढ होणार असल्याचे बाजारातील तज्ज्ञांना वाटते.
मग प्रश्न निर्माण होतो की अखेर व्हिस्कीला एवढी मागणी का ? बिअर आणि वाईनला का नाही ? यामागे मोठे कारण म्हणजे किंमती कमी आणि सहज उपलब्धता मानले जात आहे. भारत एक असा बाजार आहे जेथील ग्राहक किंमतीच्या बाबतीत संवेदनशील असतात.व्हिस्कीचे अनेक असे ब्रँड बाजारात सहज मिळतात जे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडत आहेत.
स्वस्त दरात नशा आणि स्वाद यांचे संतुलन व्हिस्कीत असल्याने ती भारतीयांची आवडती बनली आहे. प्रीमियम व्हिस्कीपासून बजेट रेंजपर्यंत प्रत्येक वर्गासाटी बाजारात पर्याय उपलब्ध आहेत. याच कारणाने कोणताही समारंभ असो की आनंद साजरा करणे असो व्हिस्कीच्या बाटल्या उघडल्या जातातच..
