AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CNG : चायसे ज्यादा केतली गरम! पेट्रोल-डिझेलपेक्षा सीएनजीचे वाढले भाव, वाहनधारकांनी मारला डोक्याला हात

CNG : भीक नको पण कुत्र आवर, अशी अवस्था सीएनजी वाहनधारकांची झाली आहे..

CNG : चायसे ज्यादा केतली गरम! पेट्रोल-डिझेलपेक्षा सीएनजीचे वाढले भाव, वाहनधारकांनी मारला डोक्याला हात
सीएनजीने रडविलेImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Dec 17, 2022 | 6:01 PM
Share

नवी दिल्ली : देशभरात सीएनजीच्या किंमतींनी (CNG Price) वाहनधारकांना हैराण केल्याची चर्चा रंगली आहे. एकेकाळी सीएनजी किट बसवून अनेकांनी खिशावरचा भार हलका केला होता. पण आता सीएनजी वाहनधारकांच्या खिश्यावर तेल कंपन्यांनी दरोडा घातला आहे. वर्षभरात सीएनजीच्या भावात (CNG Price Hike 2022) 50 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे वाहनधारक हवाल दिल झाले आहेत. तर गेल्या सहा महिन्यात पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्थिर असल्याने या वाहनधारकांना सध्या दिलासा मिळाला आहे.

मीडियातील अहवालानुसार, मार्चपासून आतापर्यंत सीएनजीच्या किंमतीत 15 वेळा वाढ करण्यात आली आहे. सीएनजीच्या किंमती 26 रुपयांहून अधिक वाढल्या आहेत. त्यामानाने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत (Petrol Diesel Rate Today) सहा महिन्यात काहीच वाढ झालेली नाही. जनआक्रोश वाढल्याने केंद्र आणि राज्य सरकारने पेट्रोल-डिझेलवर कर कपातही केली होती.

देशाची राजधानी दिल्लीत, वाहनधारकांना खऱ्या अर्थाने पेट्रोल-डिझेलने नाही तर सीएनजीने रडवले आहे. यावर्षी सीएनजीच्या किंमतीत आतापर्यंत 50 टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात सीएनजीच्या किंमतीत वाढ झाली होती. त्यानंतर ब्रेक घेत मार्च 2022 मध्ये किंमती वाढल्या.

मार्च 2022 पासून सीएनजीला ग्रहण लागलेले आहे. गेल्या वर्षभरात सीएनजीच्या किंमतीत 26.52 रुपयांची वाढ झाली आहे. सध्या सीएनजीचा भाव 79.56 रुपये झाला आहे. गेल्यावर्षीच्या अखेरीस हा दर 53 रुपये होता. त्यानंतर किंमतींना वाढीचे ग्रहण लागले.

सीएनजीनंतर यंदा डिझेलच्या किंमतीत 3 रुपयांची वाढ दिसून आली. डिझेलच्या किंमतीत 22 मे नंतर कुठलीही भरीव वाढ दिसून आली नाही. पण वर्षभरात डिझेलमध्ये जवळपास 3 रुपये प्रति लिटरची वाढ दिसून आली आहे.

31 डिसेंबर 2021 रोजी डिझेलचा भाव 86.67 रुपये प्रति लिटर होता, सध्या हा भाव 89.62 रुपये प्रति लिटर आहे. याचा अर्थ यंदा, 2022 डिझेलच्या किंमतीत 2.95 रुपये प्रति लिटरची वाढ दिसून आली आहे.

तर पेट्रोलमध्ये नगण्य भाव वाढ झालेली आहे. आकड्यांवर नजर टाकली असता, यंदा, 2022 मध्ये पेट्रोलच्या किंमतीत प्रति लिटर दीड रुपयांची वाढ झाली. दिल्लीसह देशातील अनेक मोठ्या शहरात सहा महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे, पण पेट्रोलच्या आघाडीवर शांतता आहे.

31 डिसेंबर 2021 रोजी पेट्रोलचा भाव 95.41 रुपये प्रति लिटर होते. हा भाव आज 96.72 रुपये प्रति लिटर झाला आहे. याचा अर्थ यंदा पेट्रोलच्या किंमतीत 1.31 रुपये प्रति लिटरची वाढ दिसून आली आहे.

आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा.
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया.
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.