मुंबईत जेवण बनवून लखपती होतायत महाराज, किती होतेय कमाई पाहा ?
मुंबई कोणाला उपाशी मरु देत नाही. आणि प्रचंड मेहनत करायची तयार असेल तर येथे येणारा लखपती होतोच कसे ते पाहा...

मुंबईत एकदा कोणी गेले तर तो मुंबईकर होतो. मायानगरी मुंबई कोणालाही उपाशी राहू देत नाही. मुंबईत घर घेणे सोडा भाड्याने राहाणे देखील अवघड आहे. येथील घराचे भाडे आणि मेडचा खर्च इतर राज्याच्या तुलनेत जास्त आहे. महिला वकीला आयुषी दोशी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन एक डोमेस्टीक शेफ म्हणजे बोली भाषेत महाराज आणि आचारी याच्या कमाईचा उल्लेख केला असून तो डोळे विस्फारणारा आहे.
एका वृत्तापत्राशी बोलताना वकील आयुषी दोशी म्हणाल्या की जेवण बनवणाऱ्या कुकची सॅलरी मोठी आहे. सर्वसमान्य लोकांसाठी त्यांना नोकरीवर ठेवणे कठीण आहे. कारण ते प्रति घर अठरा हजार रुपये वेतन घेतात आणि केवळ अर्ध्या तासात जेवण तयार करुन देतात. हे सर्व ऐकून सर्वसामान्यांना धक्का बसू सकतो.त्यांच्या पोस्टवर लोकांनी सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रीया व्यक्त केल्या आहेत.
कुकच्या सॅलरीने आश्चर्याचा धक्का
वकीलाने केलेल्या पोस्टनंतर सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. एक आचारी किंवा महाराज जेवणासाठी घरटी १८ हजार रुपये अर्ध्यासाठी घेतो. ते रोज एका अपार्टमेंटमध्ये १० ते १२ घरात काम करतात. त्यामुळे त्यांचा ट्रॅफीकमध्ये प्रवासात वेळ वाया जात नाही. आणि चांगली रग्गड कमाई होते.
येथे पोस्ट पाहा –
My Maharaj (Cook) •Charges ₹18k per house •Max 30 mins per house •10–12 houses daily •Free food & free chai everywhere •Gets paid on time or leaves without a goodbye 😭
Meanwhile I’m out here saying “gentle reminder” with trembling hands with minimum salary.🙂
— Adv. Ayushi Doshi (@AyushiiDoshiii) July 29, 2025
एका वृत्तपत्राशी बोलताना वकील आयुषी दोशी म्हणाल्या की ही गोष्ट ऐकून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला असेल तर ते स्वाभाविकच आहे. ते जेवण बनवताना खूपच मेहनत करतात. सोसायटीत चांगले आणि विश्वासू कूक याच रेंजमध्ये चार्ज करतात.काही जण १२ ते १५ हजार देखील घेतात. परंतू जे महाराज अधिक कुशल, वेगवान आणि विश्वनसीय आहेत त्यांची सॅलरी प्रीमीयम असते.
अर्ध्यात तासात खाना रेडी
हे महाराज केवळ ३० ते ६० मिनिटात जेवण तयार होईल याचे आश्वासन देतात आणि पटापटा कामाला लागतात. त्यामुळे त्यांना एका महिन्याची १.८ लाख ते २ लाख सहज मिळतात. या पोस्टचा हेतू महाराजची सॅलरी दाखवणे हा नसून हे सामाजिक सत्य उघड करणे आहे. आज अनेक डिग्री घेऊन कॉर्पोरेट नोकरीत अनेक तास माथेफोड करुन तणाव झेलत अनेक जण इतकीही कमाई निट करीत नाही. परंतू काही सराईत कामगार मुंबईत संतुलित जीवन आणि सन्मानजनक वेतन घेत आहेत.
