या क्रिकेटपटूला लॉटरी; आता जामनगर राजघराण्याचा उत्तराधिकारी; वारशात इतक्या कोटींची संपत्ती

Jamnagar Royal Family : भारतीय क्रिकेट टीमच्या या माजी खेळाडूला मोठी लॉटरी लागली. जामनगर राजघराण्याचा पुढील उत्तराधिकारी म्हणून त्याने नाव जाहीर करण्यात आले आहे. दसरा आणि नाही आनंदाला तोटा, असं म्हटलं जातं. त्याचा प्रत्यय या ऑलराऊंडर खेळाडूला आला आहे.

या क्रिकेटपटूला लॉटरी; आता जामनगर राजघराण्याचा उत्तराधिकारी; वारशात इतक्या कोटींची संपत्ती
जामनगर संस्थानला मिळाला नवीन राजा
Follow us
| Updated on: Oct 12, 2024 | 12:14 PM

दसरा आणि आनंदाला नाही तोटा, असे म्हटल्या जाते. या माजी भारतीय क्रिकेटपटूला आज त्याचा प्रत्यय आला आहे. त्याला मोठी लॉटरी लागली आहे. जामनगर राजघराण्याचा पुढील उत्तराधिकारी म्हणून त्याने नाव जाहीर करण्यात आले आहे. शत्रुशल्यसिंहजी जडेजा यांनी विजयादशमीच्या शुभ मुहूर्त साधत हा घोषणा केली आहे. शत्रुशल्यसिंहजी यांनी एक पत्र जाहीर केले आहे. त्यानुसार आज दसऱ्याच्या दिवशी पांडव हे वनवास संपवून विजयासह परतले होते. या शुभ मुहूर्तावर मी कोंडीतून सुटलो आहे. मी माझा उत्तराधिकारी नेमला आहे. मला विश्वास आहे की जामनगरच्या जनतेचा आशीर्वाद त्यांना मिळेल आणि ते पूर्ण निष्ठेने त्यांची सेवा करतील. मी सर्वांचा आभारी आहे, असे ते म्हणाले.

अजय जडेजा यांची उत्तराधिकारी म्हणून निवड

माजी क्रिकेटपटू अजय जडेजा हे जामनगरचा आहे. त्याचे नवानगर संस्थानाशी संबंध आहे. ते रणजीतसिंहजी जडेजा आणि दलीपसिंहजी जडेजा यांच्या कुटुंबातील आहेत. त्यांच्या नावावरुनच भारतात रणजी ट्रॉफी आणि दलीप ट्रॉफी खेळण्यात येते. रणजीतसिंहजी जडेजा आणि दलीपसिंहजी क्रिकेटपटू असतानाच नवानगर संस्थानाचे राजे होते. याशिवाय शत्रुशल्यसिंहजी यांचे वडील दिग्विजयसिंहजी हे पण त्याच घरातील आहेत. 85 वर्षांचे शत्रुशल्यसिंहजी यांना अपत्य नाही. त्यांना उत्तराधिकारी निवड करायची होती. त्यांनी पुढील वारस म्हणून अजय जडेजा यांची निवड केली आहे.

हे सुद्धा वाचा

शत्रुशल्यसिंहजी दमदार खेळाडू

स्वतः शत्रुशल्यसिंहजी दमदार खेळाडू होते. त्यांनी 1958-59 मध्ये सौराष्ट्र संघासाठी तत्कालीन बॉम्बे संघाविरोधात फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यांनी 1959-60 मध्ये तीन सामने खेळले होते. तर 1961-62 मध्ये त्यांनी चार सामने खेळले होते. पुढच्या वर्षी 1962-63 मध्ये ते तितकेच सामने खेळले होते. त्यांनी इंग्लंडमधील काऊंटी क्रिकेट क्लबमध्ये पण जोरदार फलंदाजी केली आहे. पण त्यांना कधीही भारतीय संघाकडून खेळता आले नाही. शत्रुशल्यसिंहजी यांनी फर्स्ट क्लास करिअरमध्ये 29 सामने खेळले, त्यामधील 22 मध्ये त्यांनी सरासरी 1061 धावा चोपल्या तर 36 बळी घेतले.

Non Stop LIVE Update
... तर लाडक्या बहिणी आम्हाला लाटणं घेऊन मारतील, भुजबळ काय म्हणाले?
... तर लाडक्या बहिणी आम्हाला लाटणं घेऊन मारतील, भुजबळ काय म्हणाले?.
'तुझ्या चेहऱ्यासारखा..', शरद पवारांवर सदाभाऊ खोतांचं वादग्रस्त वक्तव्य
'तुझ्या चेहऱ्यासारखा..', शरद पवारांवर सदाभाऊ खोतांचं वादग्रस्त वक्तव्य.
अजितदादा रामराजे निंबाळकरांविरोधात संतापले, नोटीस पाठवण्याची केली भाषा
अजितदादा रामराजे निंबाळकरांविरोधात संतापले, नोटीस पाठवण्याची केली भाषा.
पप्पू नावाचं घुबड जातींमध्ये भेद..., गोविंदगिरींची राहुल गांधींवर टीका
पप्पू नावाचं घुबड जातींमध्ये भेद..., गोविंदगिरींची राहुल गांधींवर टीका.
'मी अजून किती दाढी पिकवायची?' निलेश राणे यांची मिश्किल फटकेबाजी
'मी अजून किती दाढी पिकवायची?' निलेश राणे यांची मिश्किल फटकेबाजी.
“ते डाव्या विचारसरणीचे, काँग्रेसच्या विचारांना बगल अन् लाल संविधान...”
“ते डाव्या विचारसरणीचे, काँग्रेसच्या विचारांना बगल अन् लाल संविधान...”.
दादांकडून जाहीरनामा सादर, बारामती मतदारसंघासाठी 'या' मोठ्या घोषणा
दादांकडून जाहीरनामा सादर, बारामती मतदारसंघासाठी 'या' मोठ्या घोषणा.
सिद्दिकी हत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शीला धमकी, ५ कोटी द्या, नाहीतर..
सिद्दिकी हत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शीला धमकी, ५ कोटी द्या, नाहीतर...
विधानसभेची रणधुमाळी सुरू अन् भाजपमधून 37 नेत्यांची तडकाफडकी हकालपट्टी
विधानसभेची रणधुमाळी सुरू अन् भाजपमधून 37 नेत्यांची तडकाफडकी हकालपट्टी.
'दादांच्या घड्याळाचे 12 वाजलेत, जसं काय ट्रम्पच्या..', कोणाचा टोला?
'दादांच्या घड्याळाचे 12 वाजलेत, जसं काय ट्रम्पच्या..', कोणाचा टोला?.