AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अरे देवा, Crypto कमाईचे नव्हे फसवणुकीचे मायाजाल, काही क्षणातच गायब संपूर्ण माल

कोणतेही नियम, कायदे किंवा कोणतेही नियामक अस्तित्वात नसल्यामुळे क्रिप्टो करन्सी फसवणुकीचे मायाजाल झाले आहे. त्याचा विस्तार इतका मोठा आहे की, या फसवणुकीला वेसन घालणे सोपे काम नक्कीच नाही.

अरे देवा, Crypto कमाईचे नव्हे फसवणुकीचे मायाजाल, काही क्षणातच गायब संपूर्ण माल
Crypto कमाईचे नव्हे फसवणुकीचे मायाजाल,Image Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: Apr 01, 2022 | 10:28 AM
Share

दिल्लीतील एका व्यावसायिकाची कहाणी थक्क करणारी आहे. या व्यावसायिकाची क्रिप्टोकरन्सीमध्ये (CryptoCurrency) मोठी गुंतवणूक होती. एके दिवशी सर्व क्रिप्टो त्यांच्या पाकिटातून गायब झाले. पोलिसात तक्रार होती… अनेक महिन्यांपासून तपास सुरु आहे. अखेर त्यांचे क्रिप्टो पॅलेस्टाइनमधील एका दहशतवादी संघटनेच्या हॅकर्सनी (Hackers) चोरल्याचे निष्पन्न झाले. या व्यापाऱ्याचे क्रिप्टो दहशतवाद्यांकडेच आहे. त्यांच्याविरोधात व्यापा-याला कोण मदत करणार आणि त्याची गुंतवणूक (Investment) कोण वाचविणार ? हे मोठे आव्हान आहे. सध्याचा काळ देशाच्या सायबर सिक्युरिटी नेटवर्क, पोलिस आणि इतर अधिकाऱ्यांसाठी खरोखरच आव्हानात्मक आहे. कोणतेही नियम, कायदे किंवा कोणतेही नियामक अस्तित्वात नसल्यामुळे क्रिप्टो करन्सी फसवणुकीचे मायाजाल झाले आहे. त्याचा विस्तार इतका मोठा आहे की, या फसवणुकीला वेसन घालणे सोपे काम नक्कीच नाही.

ही फसवणूक तपासणे सोपे नक्कीच नाही

ही फसवणूक ऑनलाईन आयुधांनी करण्यात येते. त्यासाठीचे सायबर स्कील या भामट्यांनी आत्मसात केले आहे. हॅकर्स तुम्हाला न कळताच तुमच्या रक्कमेवर डल्ला मारतात आणि त्या व्यक्तीला फसवणूक झाल्याचेही कळत नाही. म्हणजे बनावट क्रिप्टोकरन्सी, बनावट माइनिंगपासून ते बनावट वॉलेट्स यांचा या मोहजाळात पदोपदी धोका आहे. तुम्ही देवाणघेवाण करेपर्यंत तर तुमची रक्कम गायब झालेली असते. तेही डोळ्यादेखत. तुम्ही हतबल असता. तुमचा पैसा गेलेला असतो आणि चिक्कार पैसा कमाविण्याचे पाहिलेले स्वप्न भंगलेले असते. आता याची तक्रार करणार कोणाकडे. त्याला भारतात तर मान्यता नाही. मग माग काढणार कोण. तुम्ही अशा ठिकाणी व्यवहार करत आहेत, तिथे नियम तर नाहीतच पण फसविल्या गेल्यावरही तुम्हाला दाद मागायला जागा नाही. कारण क्रिप्टो कोणत्याच देशाच्या अख्त्यारीत येत नाही.

सायबर भामटे तयारच

सरकार क्रिप्टोबाबत कठोर आहे. त्यांनी धोरण स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता तुम्ही उडी घेतली असेल तर नशीब आणि नुकसान तुमच्याच वाट्याला येणार आहे. भारतात सरकार क्रिप्टो ट्रेडिंगला लॉटरी, जुगार म्हणून विचारात घेत आहे. एक मात्र नक्की सरकारच्या तिजोरीत तुमच्या कमाईचा हिस्सा पडणार आहे. 100 रुपये कमाई केले तर 30 रुपये सरकारचे एवढे साधे गणित आहे. आणि ट्रेडिंगवर 1 टक्का टीडीएसही तुमच्या खिश्यातून जाईल. म्हणजे हा एक गोरखधंदा झाला आहे. कमाई होण्याआधीच लुटीला तुम्हाला तयार रहावे लागेल. सरकारने 11 क्रिप्टो एक्सचेंजमधून 95.86 कोटी रुपयांची जीएसटी वसुली केली आहे. या रकमेत व्याज आणि दंडाचाही समावेश आहे. वास्तविक, 81.54 कोटी रुपयांचा जीएसटी चुकवल्याची माहिती सरकारला मिळाली होती. त्यानंतर या वसुलीला सुरुवात झाली. या गदारोळात देशातील जवळपास सर्वच छोट्या-मोठ्या देवाण-घेवाणीची चोपडी सरकारच्या हाती लागली आहे. आता बोला महाराज. म्हणजे तुमच्या सुरक्षेसाठी कोणीच नाही, पण कमाईवर दावे सांगायला सरकार आणि हो, सायबर भामटे तयारच आहेत.

MRI काढताना नागपुरात चिमुकल्याचा मृत्यू, पालकांचा डॉक्टरांवर गंभीर आरोप

Nagpur | मनपाचे प्रशासक पद आयुक्तांकडे; नगरसेवक, महापौर झाले माजी, प्रतीक्षा निवडणूक जाहीर होण्याची

Nagpur School | आजपासून पहिली ते नववीच्या शाळा सकाळी सात ते दुपारी बारापर्यंत; जिल्हाधिकारी, मनपा आयुक्तांचे आदेश

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.