Cryptocurrency Prices: शेअर बाजार कोमात, तरिही बिटकॉईन जोमात! कोणकोणत्या कॉईनचा बाजार तेजीत? वाचा

Cryptocurrency Prices: शेअर बाजार कोमात, तरिही बिटकॉईन जोमात! कोणकोणत्या कॉईनचा बाजार तेजीत? वाचा
पुणे बिटकॉइन घोटाळा
Image Credit source: TV9

गेल्या 24 तासांत 1.13 टक्क्यांच्या वाढीसह क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) मार्केट 1.63 ट्रिलियन डॉलरवर पोहोचले आहे. समान कालावधीत ट्रेडिंग वॉल्यूम 35.81 टक्के घसरणीसह 83.88 अरब डॉलर वर पोहोचले आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सागर जोशी

Jan 24, 2022 | 6:34 PM

नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांपासून भारतात क्रिप्टोकरन्सीत गुंतवणुकीत कल वाढीस लागला आहे. अनेक किरकोळ गुंतवणूकदारही क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करत आहे. सध्या क्रिप्टोकरन्सीमध्ये बिटकॉईन, ट्रोन (TRX), इथेरियम (Ethereum) आणि रिपल XRP हे ट्रेंडीगमध्ये दिसून येत आहेत. क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीत आज (सोमवारी) तेजीचं वातावरण दिसून आलं. गेल्या 24 तासांत 1.13 टक्क्यांच्या वाढीसह क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) मार्केट 1.63 ट्रिलियन डॉलरवर पोहोचले आहे. समान कालावधीत ट्रेडिंग वॉल्यूम 35.81 टक्के घसरणीसह 83.88 अरब डॉलर वर पोहोचले आहे. DeFi क्रिप्टो ट्रेडिंग वॉल्यूम 14.72 टक्क्यांच्या वाढीसह 12.35 अरब डॉलर झाली आहे. स्टेबलकॉईन्स 79.27 टक्क्यांच्या वाढीसह 66.49 अरब डॉलर वर पोहोचले आहे. जगातील सर्वाधिक लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी बिटकॉईन्स (BITCOIN) 41.26 टक्क्यांवर पोहोचली आहे. आज बिटकॉईन्सची 35,596.12 डॉलरवर ट्रेडिंग सुरू होती.

टॉप क्रिप्टोची कामगिरी :

• इथेरम (Ethereum) : 2.37 टक्क्यांची वाढ, किंमत- 2,05,009.3 रुपये
• टेथर (Tether) : 0.13 टक्क्यांची वाढ, किंमत- 82.51 रुपये
• कार्डेनो (Cardano) : 0.59 टक्क्यांची वाढ, किंमत- 88.71 रुपये
• एक्सआरपी (XRP): 1.69 टक्क्यांची घसरण, किंमत- 50.27 रुपये
• पोल्काडॉट(Polkadot) : 2.64 टक्के घसरण, किंमत- 1475.01 रुपये
• डॉगकॉईन(Dogecoin): 2.05 टक्क्यांची वाढ, किंमत- 11.47 रुपये

गुंतवणुकीचा हवा अभ्यास

गुंतवणुकीचा (Investment) नवा मार्ग म्हणून क्रिप्टोकरन्सीचा (Cryptocurrency) मार्ग अजमाविणाऱ्यांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. अनुभवी गुंतवणुकदारांसोबत नव्या दमाची तरुणाई क्रिप्टोच्या अर्थजगताची भाग बनली आहे. गुंतवणुकीतील चढ-उताराच्या आलेखाचा क्रिप्टोही अपवाद नाही. तुमच्या खात्यात क्रिप्टोनं भरभराटही होईलं. अन् मार्केट (Market) गडगडल्यास तोट्याचे धनीही व्हावे लागेलं.

क्रिप्टोकरन्सीमध्ये काळजीपूर्वक गुंतवणूक करावी. सर्व बाबींवर नीट लक्ष देऊन त्यात गुंतवणूक केल्यास तुम्हाला कमीत कमी नुकसान होऊ शकतं. क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी कोणत्याही गुंतवणूकदाराने त्याचा हेतू काय, त्याला दीर्घकाळात गुंतवणूक केल्याने काय फायदा होऊ शकतो, याचा अभ्यास केला पाहिजे.

‘क्रिप्टो’ करांच्या कक्षेत?

डिजिटल चलन क्रिप्टोकरन्सी कर कक्षेत येण्याची शक्यता आहे. इंटरनेट स्टार्ट-अप्स असोसिएशन इंडिया टेकने (IndiaTech) अर्थ मंत्री निर्मला सीतरमण यांच्याकडे क्रिप्टोकरन्सीवरील कराबाबत विचारणा केली आहे. आगामी अर्थसंकल्पात केंद्र सरकारने क्रिप्टोकरन्सीवरील कर नियमांबाबत स्पष्टता देण्याचे आवाहन पत्राद्वारे केले आहे.

इतर बातम्या :

12 दिवसांत केलं मालामाल, कोणत्या शेअरनं केली कमाल? दामदुप्पट कामगिरी करणाऱ्याब शेअरची खबरबात

HDFC Bank FD : मुदत ठेवीवर चक्क खरेदी व्हाऊचर!, 7,500 रुपयांच्या एफडीवर मिळेल 7,500 रुपयांचे कुपन

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें