Cryptocurrency Prices : कितीही लावा टीडीएस आणि कर, Bitcoin आणि Ethereum चा कायम वाढीचा दर

गेल्या 24 तासांत जागतिक क्रिप्टोकरन्सी बाजारात प्रचंड उलाढाल झाली. या बाजारातील भांडवल 1.70 ट्रिलियन डॉलरवरून 1.87 ट्रिलियन डॉलरपर्यंत वाढले आहे. तर, व्यवसायाचे प्रमाण 68.72 अब्ज डॉलरवरून 90.36 अब्ज डॉलरवर पोहचले आहे.

Cryptocurrency Prices : कितीही लावा टीडीएस आणि कर, Bitcoin आणि Ethereum चा कायम वाढीचा दर
प्रातिनिधीक छायाचित्र
Follow us
| Updated on: Feb 05, 2022 | 2:32 PM

गेल्या 24 तासांत जागतिक क्रिप्टोकरन्सी बाजारात प्रचंड उलाढाल झाली. या बाजारातील भांडवल 1.70 ट्रिलियन डॉलरवरून 1.87 ट्रिलियन डॉलरपर्यंत वाढले आहे. तर, व्यवसायाचे प्रमाण(Trading Volume) 68.72 अब्ज डॉलरवरून 90.36 अब्ज डॉलरवर पोहचले आहे. तर विकेंद्रित वित्त (DeFi) गेल्या 24 तासांत 12.21 अब्ज डॉलरवर असून एकूण क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंग व्हॉल्यूमच्या 13.44 टक्के आहे. त्याच वेळी, स्टेबलकॉइन(Stablecoins) 73.92 अब्ज डॉलर्सवर आहेत. ज्यात क्रिप्टो बाजाराच्या 24 तासांच्या व्हॉल्यूमचा हिस्सा 81.35 टक्के आहे. बिटकॉइनने बाजारात फार नसली तरी झेप घेतली आहे. बिटकॉईन वाढून 41.65 टक्के झाले आहे. बाजार भांडवलाच्या बाबतीत जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी असलेल्या बिटकॉइनचा भाव 41,388.68 डॉलरवर आहे. जगातील सर्वात मोठी आणि सर्वात लोकप्रिय असलेल्या क्रिप्टोकरन्सीने 24 जानेवारी रोजी 32,950.72 डॉलरची वर्षातील सर्वात नीचांकी पातळी गाठली होती. त्या तुलनेत बिटकॉइनमध्ये 23.2 टक्क्यांची वाढ नोंद झाली.

Cardano, Ethereum ही चकाकले

रुपयाच्या मुल्य दृष्टीने बिटकॉइनचे भाव 9 टक्क्यांहून अधिक वाढून 32,33,214 रुपयांवर पोहोचले. तर, इथेरियम 9.5 टक्क्यांनी वाढून 2,34,199.9 रुपयांवर आहे. Cardano चलनाने ही किंमतीत वाढ नोंदवली. त याच्या किंमती 6 टक्क्यांनी वाढून 88.73 रुपयांवर पोहोचल्या आहेत. तर, Avalanche 11 टक्क्यांहून अधिक वाढीसह 6,096.60 वर व्यापार करत आहे. त्याच वेळी, Polkadot 7 टक्क्यांपेक्षा जास्त वाढीसह 1,617.09 रुपयांवर पोहोचले आहे. तर गेल्या 24 तासांत Litecoin 6.7 टक्क्यांनी वाढून 9,320 रुपयांवर पोहोचले आहे. दुसरीकडे, गेल्या 24 तासात Tetherच्या किंमतीत 1.84 टक्क्यांची घसरल्या आहेत. ही क्रिप्टोकरन्सी सध्या 78.19 रुपयांवर आहे. तर Solana 6.76 टक्क्यांनी वाढून 8,713.10 रुपयांवर व्यापार करत आहे. XRPबद्दल बोलायचे झाले तर, 24 तासात हे चलन 7.16 टक्क्यांनी वाढून 52.13 रुपयांवर पोहोचले आहे. त्याच वेळी, Axie 6.75 टक्क्यांनी वाढून 4,163.30 रुपयांवर ट्रेड करत आहे.

नियमनासाठी विधेयकच वेटिंगमध्ये

सरकारने क्रिप्टोकरन्सी अँड रेग्युलेशन ऑफ ऑफ ऑफिशिअल डिजिटल करन्सी बिल, 2021 संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सादर करण्याची तयारी केली होती. पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठीच्या विषय यादीतही त्याचा समावेश करण्यात आला होता. पण मनी लॉड्रिंग आणि इतर अवैध नफेखोरांनी क्रिप्टोकरन्सीत घुसखोरी वाढविल्याने सरकारने करन्सी बिलावर पुन्हा काम करण्याचा निर्णय घेतल्याने तो सादर होऊ शकला नाही. झटपट श्रीमंतीचा मार्ग म्हणून क्रिप्टो करन्सीकडे पाहण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणावर तरुणवर्ग यात रक्कम गुंतवत आहे. मात्र, या बाजाराबाबत तरुणाईने सजग राहण्याची गरज आहे. कारण या बाजारात प्रचंड उलथापालथ होते. किंमतीत मोठ्या प्रमाणात चढ-उतार होतात. त्यामुळे गुंतवणूकदारांनी या बाजाराची संपूर्ण माहिती करून घ्यावी.

Nagpur Crime | पत्नी सोडून जाईल या भीतीने आत्महत्येचा प्रयत्न; नागपुरात नेमकं काय घडलं?

यवतमाळ – वणी पोलिसांवर मोठी कारवाई, चार पोलीस निलंबित; ठाणेदाराला अभय का?, काय आहे प्रकरण?

हिंगणघाटातील अंकिता जळीतकांडाचा निकाल आता नऊ फेब्रुवारीला; सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची माहिती

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.