दंतकांती, एलोवेरा जेल; पतंजलीची जबरदस्त उत्पादनं कोणती? बेस्ट सेलिंग प्रोडक्ट्सची यादीच वाचा
तुपापासून ते आयुर्वेदिक गोळ्यांपर्यंत पतंजलीची अनेक उत्पादनं आज सर्वाधिक विक्री होत आहेत. कंपनीच्या संकेतस्थळानुसार, खासकरून Cows Ghee, सातू पीठ, मिल्क पाऊडर आणि Peedanil Gold सारख्या वस्तूंची मागणी कायम आहे.

Patanjali Best Selling Products: देशातील FMCG क्षेत्रात पतंजलीचा डंका वाजला आहे. पतंजलीच्या अनेक उत्पादनांना मोठी मागणी आहे. त्यांची सर्वाधिक विक्री होत आहे. यामध्ये दंतकांती, एलोवेरा जेल ही उत्पादनं आता घरोघरी पोहचली आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का की पतंजलीची सर्वाधिक कोणती उत्पादनं विक्री होतात? FMCG बाजारात पतंजलीची खास ओळख आहे. या कंपनीची काही उत्पादनं ही बेस्ट सेलिंग यादीत येतात. खाद्यपदार्थ, हर्बल सप्लिमेंट आणि घरगुती वापराची उत्पादनं लोकप्रिय ठरली आहेत. त्यांची मोठी विक्री होते.पतंजलीच्या साईटनुसार Cows Ghee च्या 5 लिटर पॅकिंगची किंमत जवळपास 3843 रुपये आहे. सातू पीठ, मिल्क पाऊडर आणि Peedanil Gold सारख्या वस्तूंची मागणी कायम आहे.
पतंजलीच्या साईटनुसार Cows Ghee च्या 5 लिटर पॅकिंगची किंमत 3843 रुपये आहे. याशिवाय, Patanjali चे 500 ग्रॅमचे चना सात्तू 100 रुपयांच्या जवळपास आहे. Patanjali Cow’s Whole Milk Powder (500 ग्रॅम) ची किंमत जवळपास 235 रुपये आहे. दैनंदिन जीवनातील अनेक वस्तूंची पतंजलीची उत्पादनं बाजारात आहेत.
आयुर्वेदिक औषधं आणि सप्लीमेंट्सची विक्री
खाद्य आणि घरगुती सामानाशिवाय, पतंजलीच्या आयुर्वेदिक औषधं आणि सप्लीमेंट्ससारख्या Divya Peedanil Gold Tablet पण बेस्ट सेलिंग सूचीत समाविष्ट आहेत. या टॅबलेटची किंमत जवळपास 480 रुपये इतकी आहे. तर ऑनलाईन बाजारात 20 टॅबलेटची किंमत जवळपास 375 रुपये आहे. संकेतस्थळाच्या आकडेवारीवरुन काही उत्पादनं चांगली विक्री होत आहे. या वस्तू बजेट फ्रेंडली आहे. यामध्ये तूप, दूध पावडर, सातू याचा त्यात समावेश आहे.
पतंजलीच्या दाव्यानुसार, स्वामी रामदेव यांच्या नेतृत्वात कंपनीने केवळ आयुर्वेदिक प्रोडक्सटला प्रोत्साहन दिले आहे असे नाही तर कृषी, अक्षय ऊर्जा आणि कचरा व्यवस्थापना सारख्या क्षेत्रातही अनेक चांगली पावलं टाकली आहेत. पर्यावरणावर सकारात्मक प्रभाव टाकणे आणि येणाऱ्या पिढीसाठी सुरक्षित भविष्य सुनिश्चित करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. कंपनीने पाणी बचत तंत्रज्ञानाला आपलेसे केले आहे. तर मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण मोहिम राबवली आहे.
