FD : या बँकेत केली असेल FD तर सावधान, 1 ऑक्टोबर पासून होणार बंद..

FD : या बँकेतील मुदत ठेव योजनेत तुम्ही गुंतवणूक केली असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच

FD : या बँकेत केली असेल FD तर सावधान, 1 ऑक्टोबर पासून होणार बंद..
Bank FD Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 29, 2022 | 8:43 PM

नवी दिल्ली : भारतातील सार्वजनिक क्षेत्र (PSB) आणि खासगी क्षेत्रातील (Private Sector Bank) बँकांनी कोविड-19 काळात ज्येष्ठ नागरिकांसाठी (Senior Citizen) विशेष मुदत ठेव योजना राबवली होती. ही मुदत ठेव योजना बँका बंद करणार आहेत. या 1 ऑक्टोबर पासून एफडी (FD) योजना बंद होत आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठीची विशेष मुदत ठेव योजना बंद करण्याचा निर्णय  IDBI, HDFC Bank, ICICI Bank या बँकांनी घेतला आहे. त्यावेळी मुदत ठेवीवर देण्यात येणाऱ्या व्याज दरांपेक्षा या एफडीवर व्याजदर जास्त देण्यात येत होता. स्टॅंडर्ड रेटपेक्षा या बँका 50 बेसिस पॉईंट्स व्याजदर अधिक देत होत्या.

HDFC Bank (HDFC Senior Citizen Care)

हे सुद्धा वाचा

एचडीएफसी बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठीची HDFC Senior Citizen Care योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 30 सप्टेंबर 2022 ही या योजनेची शेवटची तारीख असेल. बँक या मुदत ठेवीवर 0.75 टक्के अधिक व्याज देत होते.

IDBI Bank (Naman Senior Citizen Deposit)

आयडीबीआय बँकेने 20 एप्रिल 2022 रोजी ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष Naman Senior Citizen Deposit योजना सुरु केली होती. ही योजनाही 30 सप्टेंबर 2022 रोजी बंद होत आहे. या योजनेत 0.50 टक्के अधिक व्याजदर तर मिळत होतेच. पण त्यासोबतच 0.25 टक्के अधिक व्याजही देण्यात येत होते.

SBI Wecare Deposit

एसबीआय वीकेअर मुदत ठेव योजनेत मात्र एसबीआयने ज्येष्ठ नागरिकांना दिलासा दिला आहे. मुदत संपत असतानाच बँकेने ही योजना 31 मार्च 2023 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिकांची घोर निराशा झाली आहे. काही बँकांनी हा निर्णय घेतल्याने त्यांचे ज्येष्ठ गुंतवणूकदार नाराज झाले आहेत. त्यांना या विशेष योजनेतून अतिरिक्त व्याज मिळत होते. ते आता बंद होणार आहे.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.