AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Digital Gold : डिजिटल गोल्डने केले मालामाल! सात वर्षांत इतका मोठा परतावा

Digital Gold : या आर्थिक वर्षात केंद्र सरकारने सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेची ( Sovereign Gold Bonds Scheme) दुसरी मालिका सुरु केली आहे. 15 सप्टेंबरपर्यंत यामध्ये गुंतवणूक करण्याची संधी आहे. सराफा बाजारातील किंमतींपेक्षा डिजिटल गोल्ड स्वस्तात खरेदी करता येते. त्यावरील परताव्याने तर चारचांद लावले आहेत.

Digital Gold : डिजिटल गोल्डने केले मालामाल! सात वर्षांत इतका मोठा परतावा
| Updated on: Sep 13, 2023 | 10:19 AM
Share

नवी दिल्ली | 13 सप्टेंबर 2023 : लग्नकार्य असवा कोणताही सण, भारतीयांना सोने खरेदीची (Gold Investment) भारी हौस आहे. निमित्त नसले तरी भारतीय माणूस सहज सराफा बाजारात फेरफटका मारुन येतोच. सोन्यावर पूर्वीपासूनच भारतीयांचा भरवसा आहे. आता तर सोन्यात गुंतवणूकीचे इतर पण पर्याय आले आहेत. या डिजिटल युगात तर गुंतवणूकदारांसाठी या पर्यायांनी गुंतवणूक सोपी केली आहे. भारतात तर केंद्र सरकारच जनतेला सोने विकत आहे. केंद्र सरकारने सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेची ( Sovereign Gold Bonds Scheme) दुसरी मालिका सुरु केली आहे. येत्या दोन दिवसांपर्यंत, 15 सप्टेंबरपर्यंत यामध्ये गुंतवणुकीची संधी आहे. सरकार त्यावर चांगला परतावा तर देतेच पण तुमच्या गुंतवणुकीची हमी पण घेते. त्यामुळे डिजिटल गोल्डमध्ये (Digital Gold) गुंतवणूक करावी की दुकानात जाऊन सोने खरेदी करावे, असा प्रश्न अनेक गुंतवणूकदारांना पडला आहे. या दोघांपैकी कोणता पर्याय भविष्यात चांगला परतावा देईल?

स्वस्तात करा सोने खरेदी

डिजिटल गोल्डमध्ये पण पर्याय आहेत. सध्या केंद्र सरकारने जनतेसाठी सॉव्हेरिन गोल्ड बाँड स्कीम आणली आहे. 2015 पासून केंद्र सरकारने ही योजना सुरु केली आहे. तेव्हापासून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या योजनेतून अनेकांना मोठा फायदा झाला आहे. यावेळी 11 सप्टेंबरपासून ही योजना सुरु झाली आहे. आता 15 सप्टेंबर 2023 रोजीपर्यंत यामध्ये जनतेला गुंतवणूक करण्याची संधी आहे. विशेष म्हणजे बाजारातील भावापेक्षा हे सोने स्वस्त मिळत आहे. या योजनेत सोने खरेदी केल्यानंतर केंद्र सरकार एक प्रमाणपत्र देते. त्यावर सोन्याचा भाव आणि इतर तपशील असतो.

किती आहे भाव

सॉव्हेरिन गोल्ड बाँड स्कीममधील गुंतवणुकीवर वार्षिक 2.5 टक्के व्याज देण्यात येते. सोने खरेदीवर सवलत पण देण्यात येते. या योजनेतंर्गत ऑनलाईन सोने खरेदी केले तर 50 रुपयांची अतिरिक्त सवलत देण्यात येते. 2023-24 या आर्थिक वर्षासाठी सोन्याचा भाव 5,923 रुपये निश्चित करण्यात आला आहे. ऑनलाईन खरेदीवर 5,873 रुपये प्रति ग्रॅम भाव निश्चित करण्यात आला आहे. या योजनेत एका आर्थिक वर्षांत व्यक्ती जास्तीत जास्त 500 ग्रॅम सोने खरेदी करता येते. तर कमीत कमी 1 ग्रॅम सोने खरेदी करता येते.

7 वर्षांत 120 टक्के रिटर्न

गुंतवणूकदार डिजिटल गोल्ड रोखीत सुद्धा खरेदी करु शकतात. या योजनेचा मॅच्युरिटीचा कालावधी 8 वर्षे आहे. परंतु 5 वर्षांनी या योजनेतून बाहेर पडता येते. सॉव्हेरिन गोल्ड बाँड स्कीममध्ये 24 कॅरेट सोन्यात गुंतवणूक होते. ही योजना 2015 मध्ये सुरु झाली होती. तेव्हापासून गुंतवणूकदार या योजनेवर फिदा आहेत. त्यांना जोरदार परतावा मिळाला आहे. 2015-16 मध्ये या योजनेत सोन्याचा भाव 2,684 रुपये प्रति ग्रॅम होता. तर 2023-24 या दुसऱ्या मालिकेत सध्या 5,923 रुपये भाव आहे. म्हणजे गेल्या सात वर्षांत या योजनेत जवळपास 120 टक्के परतावा मिळाला आहे.

शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?
शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?.
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन.
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'.
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव...
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव....
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'.
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'.
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.