AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नानंतर स्वप्न धूसर, पण परिस्थितीवर दिशाची मात, आंत्र्यप्रन्योर होत पालटले नशीब

Disha Garg Success Story: लग्नानंतर तिचं मोठं काहीतरी करण्याचं स्वप्न धूसर झालं. पण ती खचली नाही. तिने बिकट परिस्थितीतून ही मार्ग शोधलाच. आपल्या आवडीच्या क्षेत्रात मोठी झेप घेत दिशा गर्ग यांनी स्वप्न साकार केलंच. तिच्या संघर्षाची ही गाथा...

लग्नानंतर स्वप्न धूसर, पण परिस्थितीवर दिशाची मात, आंत्र्यप्रन्योर होत पालटले नशीब
| Updated on: Jan 27, 2026 | 2:28 PM
Share

Disha Garg Entrepreneurship: काही स्वप्न ही परिस्थितीच्या ओझ्याखाली दबतात. पण स्वप्न काही विसरली जात नाहीत. दिशा गर्ग यांची अशीच काहीशी कथा आहे. NIFT कडून शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी फॅशनच्या जगतात मोठे नाव कमावण्याचे स्वप्न पाहिले होते. पण त्यांचे लवकर लग्न झाले. त्यासोबत संसाराचा गाडा आणि जबाबदाऱ्या वाढल्या. चांगली पत्नी, चांगली सून आणि चांगली आई होण्याच्या तयारीत तिची पदवी धुळखात पडली. पण याही परिस्थितीत तिला या स्वप्नाचा विसर पडला नाही.

NIFT मध्ये असताना डिझायनर होण्याचे स्वप्न

NIFT मध्ये असताना डिझायनर होण्याचे स्वप्न दिशाने पाहिले होते. पण लग्नानंतर अनेक जबाबदारी डोक्यावर आल्यानं ती त्यातच मशगूल झाली. प्रत्येक दिवशी तिची ओळख एका गृहिणीपुढे सरकत नव्हती. तिला हीच भीती खात होती की आपण केवळ घरापूरतच सीमित राहतोय. जेव्हा तिने घरीच एक छोटंस बुटीक सुरू करण्याची कल्पना मांडली तेव्हा कुटुंबातून तिला विरोध झाला. तिचे स्वप्न गुदमरत असल्याचे तिला जाणवले.

मग सुरू झाला स्वप्नाचा प्रवास

सासरी अनेकदा समजवल्यानंतर आणि स्वतःवरील विश्वासानंतर तिचे काम सुरू झाले. केवळ दोन शिवणकाम करणारे आणि अत्यंत कमी साधनांचा वापर करत तिचा टेलरिंग आणि बुटीकचा प्रवास सुरू झाला. दोन लोकांपासून सुरू झालेला हा प्रवास आज 25 कर्मचाऱ्यांपर्यंत येऊन पोहचला. मोठा सेटअप नव्हता. पाठीशी फार कोणी नव्हतं. पण तिच्या हातात एक कला होती. एक कुसर होती.

कौटुंबिक आघात आणि कामाची जबाबदारी

जीवनाने दिशाची मोठी कसोटी घेतली. वर्ष 2020 मध्ये तिच्या सासऱ्यांचं निधन झालं. त्यानंतर अवघ्या दोन वर्षातच तिचा नवरा, 2022 मध्ये काळाने हिरावला. या दोन आघाताने ती एकटी पडली. एकीकडे वडिलांसारखं सासऱ्यांचं छत गेलं. तर दुसरा साथीदारही गेला. कधी काळी बुटीक हा केवळ एक छंद होता. पण आता हेच काम तिच्यासाठी गरजेचं झालं. कारण त्यावरच तिचं घर चालणार होतं. परिस्थितीने तिला घडवलं. आज दिशाचं दिल्लीतील ग्रीन पार्कमध्ये स्वतःचे एक खास डिझायनर बुटीक आहे. आज कुटुंबाचा उदरनिर्वाह या बुटीकवरच अवलंबून आहे.

HDFC AMC काय?

HDFC एएमसी म्हणजे ॲसेट मॅनेजमेंट कंपनी देशातील सर्वात मोठी म्युच्युअल फंड कंपन्यांपैकी एक आहे. ही कंपनी वर्ष 1999 मध्ये तयार करण्यात आली. वर्ष 2000 मध्ये या कंपनीला SEBI ने मंजूरी दिली. त्यानंतर ही कंपनी इक्विटी, निश्चिती कमाई, गुंतवणुकीचे इतर पर्याय याचे व्यवस्थापन करते. सध्या ही कंपनी त्यांचा शाखा, बँका, स्वतंत्र आर्थिक सल्लागार अशा मार्फत सेवा देते.

तुम्हीही काही धुतल्या तांदळासारखे नाहीत, नाईकांना सुनावले
तुम्हीही काही धुतल्या तांदळासारखे नाहीत, नाईकांना सुनावले.
गायिका अंजली भारतींच्या वादग्रस्त वक्तव्यावर किशोरी पेडणेकरांचा निषेध
गायिका अंजली भारतींच्या वादग्रस्त वक्तव्यावर किशोरी पेडणेकरांचा निषेध.
आदिवासी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होतात परंतु अंमलबजावणी...
आदिवासी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होतात परंतु अंमलबजावणी....
औकातीत राहा... नाईक-शिंदे वादात या महिला नेत्याची उडी
औकातीत राहा... नाईक-शिंदे वादात या महिला नेत्याची उडी.
आरती केली, अन्... सयाजी शिंदेंनी केला झाडाचा दणक्यात वाढदिवस
आरती केली, अन्... सयाजी शिंदेंनी केला झाडाचा दणक्यात वाढदिवस.
कोश्यारींना पुरस्कार मिळताच महाराष्ट्रात संतापाची लाट
कोश्यारींना पुरस्कार मिळताच महाराष्ट्रात संतापाची लाट.
पुन्हा परीक्षा पे चर्चा, भारतात किती विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग?
पुन्हा परीक्षा पे चर्चा, भारतात किती विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग?.
आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या ZP निवडणुकांची मोठी अपडेट सुनावणीची तारीख..
आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या ZP निवडणुकांची मोठी अपडेट सुनावणीची तारीख...
महापौर निवड प्रक्रियेला वेग; भाजप- सेना वेगवेगळा गट स्थापन करणार?
महापौर निवड प्रक्रियेला वेग; भाजप- सेना वेगवेगळा गट स्थापन करणार?.
भाजप ठाकरेंच्या सेनेसोबत सत्ता स्थापन करणार?
भाजप ठाकरेंच्या सेनेसोबत सत्ता स्थापन करणार?.