AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बँकेकडून लोन घ्यायचंय? मग ‘या’ 3 चुका कधीच करू नका; नाहीतर Cibil Score ची लागेल वाट!

तुम्हाला घर, कार खरेदी करण्यासाठी किंवा अन्य एखाद्या कामाससाठी मोठे कर्ज घ्यायचे असेल तर काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. तसे न केल्यास तुमच्या सिबिलवर नकारात्मक परिणाम पडतो.

बँकेकडून लोन घ्यायचंय? मग 'या' 3 चुका कधीच करू नका; नाहीतर Cibil Score ची लागेल वाट!
home and car loan
| Updated on: Apr 20, 2025 | 9:09 PM
Share

Loan Application and Cibil Score Relation : घर किंवा गाडी खरेदी किंवा अन्य महत्त्वाच्या कामासाठी बँकेकडून कर्ज घेतले जाते. आजघडीला सरकारी, खासगी संस्था, इतर वित्तीय संस्था तुम्हाला लाखो रुपयांचे कर्ज देण्यासाठी तयार असतात. एका ठराविक व्याजदरावर तुम्हाला हे कर्ज दिले जाते. मात्र तुम्हाला घर, कार खरेदी करण्यासाठी किंवा अन्य एखाद्या कामाससाठी मोठे कर्ज घ्यायचे असेल तर काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. तसे न केल्यास तुमच्या सिबिलवर नकारात्मक परिणाम पडतो. ज्यामुळे तुम्हाला कर्ज मिळण्यास अडचणी येऊ शकतात.

सिबिल स्कोअर कमी असेल तर….

सिबिल स्कोअरच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीची क्रेडिट हिस्ट्री, त्याची कर्ज फेडण्याची क्षमता याची माहिती बँकांना मिळते. एखाद्या व्यक्तीचा सिबिल स्कोअर चांगला असेल तर संबंधित व्यक्ती ही कर्ज फेडण्यास सक्षम आहे, असे बँक गृहीत धरते. तसेच सिबिल स्कोअर कमी असेल तर बँक संबंधित व्यक्तीला कर्ज देण्यास टाळाटाळ करते किंवा जास्त व्याजदराने कर्ज दिले जाते. म्हणूनच तुम्हाला मोठे कर्ज घ्यायचे असेल तर अगोदर तुमचा सिबिल स्कोअर चांगला असणे गरजेचे आहे. त्यासाठी खालील पाच बाबी लक्षात घेणे गरजेचे आहे.

ईएमआय पेमेंट

तुम्ही एखादा ईएमआय भरत असाल तर तो ट्यू टेडच्या आत भरला पाहिजे. कारण त्याचा परिणाम थेट सिबिल स्कोअरवर पडतो. ईएमआय भरायला उशीर झाला की सिबिल स्कोअर घसरतो. त्यामुळे ईएमआय लवकर आणि वेळेत भरणे गरजेचे आहे.

क्रेडिट कार्डचा उपयोग

क्रेडिट कार्डचा वापर चुकीच्या पद्धतीने करू नये. क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरावे. विलंब झाल्यास क्रेडिट स्कोअर घसरतो. परिणामी तुम्हाला एखादे कर्ज मिळण्यास अडचण निर्माण होऊ शकते.

मोठे कर्ज घेणे

तुम्ही एखादे मोठे कर्ज घेतलेले असेल तर त्याचा परिणाम तुमच्या सिबिल स्कोअरवर पडतो. तुमच्यावर अगोदरच एक कर्ज असल्यामुळे तुमचा सिबिल स्कोअर कमी झालेला असतो. त्यात तुम्ही मोठे कर्ज घ्यायला गेले असाल तर तुम्हाला आणखी एक कर्ज मिळणे कठीण होऊ शकते. त्यामुळे घर आणि गाडी यांच्या खरेदीसाठी मोठे कर्ज घ्यायचे असेल तर अन्य कर्जांत फसणे टाळा.

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.