AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Jawa Net Worth : कोण आहेत रोहित जावा, ज्यांनी सांभाळली हिंदुस्तान युनिलिव्हरची कमान! इतक्या संपत्तीचे आहेत धनी

Rohit Jawa Net Worth : हिंदुस्तान युनिलिव्हरचे नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी पदी रोहित जावा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दोन महिन्यानंतर ते या पदाचा कार्यभार संभाळतील. साहेबांच्या देशातील या कंपनीच्या नवीन मालकाविषयी जाणून घेऊयात.

Rohit Jawa Net Worth : कोण आहेत रोहित जावा, ज्यांनी सांभाळली हिंदुस्तान युनिलिव्हरची कमान! इतक्या संपत्तीचे आहेत धनी
| Updated on: Mar 11, 2023 | 5:46 PM
Share

नवी दिल्ली : साहेबांच्या देशातील हिंदुस्तान युनिलिव्हरने (HUL) त्यांच्या वरिष्ठ व्यवस्थापनात बदल करण्याची घोषणा केली आहे. हिंदुस्तान लिव्हर एफएमसीजी बाजारातील मोठी कंपनी आहे. या कंपनीचा भारतीय बाजारापेठेत मोठ स्टेक आहे. हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडचे नवीन व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून रोहित जावा (Rohit Jawa) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कंपनीने शुक्रवारी याविषयीची माहिती दिली. जावा सध्या युनिलिव्हरचे चीफ ऑफ ट्रान्सफॉर्मेशन आहे. 27 जून, 2023 रोजी पाच वर्षांकरीता ते या पदावर असतील. हिंदुस्थान युनिलिव्हरने शेअर बाजाराला याविषयीची माहिती दिली. जावा आता संजीव मेहता यांची जागा घेतील. संचालक मंडळाने 10 मार्च रोजी घेतलेल्या बैठकीत याविषयीचा निर्णय घेतला.

शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, रोहित जावा 1988 मध्ये हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीत दाखल झाले. त्यांनी मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून त्यांच्या करिअरची सुरुवात केली. 56 वर्षीय रोहित जावा सध्या लंडनमध्ये आहेत. यापूर्वी त्यांच्या खाद्यांवर चीनमधील युनिलिव्हरची जबाबदारी होती. ते उत्तर आशियातील कार्यकारी उपाध्यक्ष होते. त्यांनी चीनमध्ये मोठ्या प्रमाणात व्यवसाय विस्तार केला. संजीव मेहता यांना ऑक्टोबर 2013 मध्ये एचयुएलचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ म्हणून नियुक्त करण्यात आले होते.

रोहित जावा यांनी सेंट स्टीफेंस कॉलजेमधून पदवी संपादित केली. त्यानंतर त्यांनी दिल्लीतील एफएमएस (FMS) विद्यापीठातून व्यवस्थापनाचे शिक्षण घेतले. पुढे अमेरिकेतील हावर्ड बिझनेस स्कूलमधून ॲडव्हान्स मॅनेजमेंट प्रोग्राममध्ये शिक्षण पूर्ण केले. जावा यांनी आशियातील औद्योगिक क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. इंटरनॅशनलिस्ट मासिकाने त्यांचा 2013 मध्ये द एशिया 50 असा गौरवोल्लेख केला.

रोहित जावा यांना गल्लेलठ्ठ पगार मिळतोच. शिवाय त्यांना कंपनी भरपूर सोयी-सुविधाही देते. त्यांच्या संपत्तीविषयी कुठलीही अधिकृत माहिती नाही. पण जगभर जाळे असलेल्या हिंदुस्तान युनिलिव्हरचे पगाराचे आकडे आपल्या कल्पनेपलिकडले आहेत. त्यांना भरमसाठ पगार तर मिळतोच. पण इतर अनेक सोयी-सुविधा ही मिळतात. कंपनीच्या शेअर्समधूनच त्यांना प्रचंड उत्पन्न मिळते.

भारतीय वंशाचे ऋषि सुनक (Rushi Saunak) साहेबांच्या देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर भारतासोबतच्या व्यापारावर मोठा अनुकूल परिणाम होईल असा एक प्रवाह आहे. भारत आणि इंग्लंडमध्ये मुक्त व्यापार धोरणाचा (Free Trade Agreement) निर्णय अद्यापही प्रलंबित आहे. सुनक यांच्यामुळे हा निर्णय झटपट होऊन देशाला त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे. भारत आणि इंग्लंडदरम्यान मुक्त व्यापार करार या दिवाळीपर्यंत पूर्ण करण्याचे अभिवचन देण्यात आले होते. या वर्षी एप्रिल महिन्यात इंग्लंडचे पूर्व प्रधानमंत्री बोरिस जॉनसन भारत दौऱ्यावर होते. त्यावेळी ही कालमर्यादा आखण्यात आली होती. दरम्यान सुनक यांनी ही भारत-इंग्लंड दरम्यान मुक्त व्यापार करारावर भर दिला आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.