
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ कार्डने भारतीय बाजारात गदारोळ दिसला. शेअर बाजारात पडझडीचे सत्र दिसले. 50 टक्के टॅरिफचा धोका मंगळवारीच दिसला. अनेक गुंतवणूकदारांनी धडाधड शेअर विक्री सुरू केली. काही जण बाजारात नवीन संधी, नवीन शक्यतांचा शोध घेत आहे. अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम काही क्षेत्रावर दिसेल. त्यासंबंधीत शेअरधारकांना मोठा फटका बसेल. पण या ट्रेड वॉरमध्ये हे शेअर तुम्हाला कमाई करून देऊ शकतात.
तज्ज्ञांचे मत काय?
शेअर बाजारातील तज्ज्ञ श्रीकांत चौहान यांच्या मते, बाजार सध्या नाजूकस्थितीतून जात आहे. जर निफ्टी 24,650 अंकावरून घसरून 24,500 पर्यंत येऊ शकतो. पण जर त्याने पुन्हा उसळी घेतली तर मग बाजारात तेजी येईल. निफ्टी बंधनं झुगारून 24,900 अंकावर जाऊ शकते. अर्थात या जर तरच्या शक्यता आहे. अमेरिकेचे धोरण नरमले तर ते बाजाराच्या पथ्यावर पडेल.
या शेअरवर लावा डाव
चौहान यांच्या मते, बाजारात दीर्घकाळासाठी काही शेअरमधील गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. त्यांनी काही कंपन्यांमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे. तुमचा अभ्यास आणि तज्ज्ञाचा सल्ला घेऊन तुम्ही बाजारात कमाई करू शकता.
अदानी पोर्ट्स – सध्या अदानी शेअर 1,315.50 रुपायांच्या घरात आहे. हा शेअर 1,840 रुपयांपर्यंत उसळी घेण्याची त्यांनी शक्यता वर्तवली आहे.
डीएलएफ – ही एक रिअल इस्टेट कंपनी आहे. गेल्या तिमाहीत तिने सरस कामगिरी बजावली आहे. सध्या शेअर 754.75 अंकावर आहे. हा शेअर 1,020 पर्यंत भरारी घेण्याची शक्यता आहे.
जिंदल स्टील – हा शेअर आहे. सध्या तो 973.80 रुपयांच्या जवळपास आहे. तो काही दिवसांत 1,225 रुपयांच्या घरात जाऊ शकतो.
टेक महिंद्रा – आयटी क्षेत्रातील सर्वात मजबूत कंपनी आहे. सध्या कंपनीचा शेअर 1502 रुपयांवर आहे. तो 1,830 रुपयांवर पोहचण्याची शक्यता आहे.
महिंद्रा अँड महिंद्रा – ऑटोमोबाईलमध्ये ट्रॅक्टरसह वाहन क्षेत्रात कंपनीचा चांगला कारभार, कंपनीचा शेअर 3,330 रुपयांवर आहे. तो 3,800 रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. याशिवाय कोफोर्ज, अंबर एंटरप्रायजेज,कॅनरा बँक, कॅस्ट्रॉल इंडिया, रिलायन्स इंडस्ट्रीज हे शेअर चमकदार कामगिरी करण्याची शक्यता चौहान यांनी वर्तवली आहे.
डिस्क्लेमर : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. गुंतवणुकीपूर्वी तुमच्या तज्ज्ञाचा सल्ला जरुर घ्या.