खाद्यतेलाच्या किंमतीत घसरणीचे सत्र; विदेशी संकेतांचे परिणाम! काय आहेत नेमके दर?

खाद्यतेलाच्या किंमतीत घसरणीचे सत्र; विदेशी संकेतांचे परिणाम! काय आहेत नेमके दर?
खाद्यतेलाच्या दरात घसरण
Image Credit source: t v 9

इंडोनेशियाने पामतेल निर्यातीवरील बंदी हटवल्याने भारतासह अन्य देशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सिद्धेश सावंत

|

May 26, 2022 | 8:06 AM

सर्वसामान्य नागरिक आणि गृहिणींसाठी आनंद वार्ता आहे. खाद्यतेलाच्या किंमतीत (Edible oil Price) घसरणीचे सत्र सुरुच राहण्याचे संकेत मिळत आहे. सूर्यफूल आणि सोयाबीन (Soybean, Sunflower Oil) कच्चे तेल वगळता सीपीओ आणि पामोलीन सारख्या तेल आणि तिलबियांवरील आयात शुल्कात (Import duty) कमी न केल्याने मलेशिया एक्सचेंजमध्ये घसरण झाली. त्याचा परिणाम भारतीय बाजारपेठेवर दिसून आला. विदेशी बाजारातील ही घसरण भारताच्या पथ्यावर पडली आहे. विदेशी बाजारात तेलाच्या किंमतीत घसरण झाल्याने स्थानिक बाजारात, मोहरी, शेंगदाणा, सोयाबीन, तीळ, कपाशी, सीपीओ आणि पामोलीन खाद्यतेलांच्या किंमती घसरल्या. आज केवळ सोयाबीन इंदुर तेलाचे भाव स्थिर आहेत. बाजारातील सूत्रांनुसार, केंद्र सरकारने सूर्यफूल आणि सोयाबीन डीगम(कच्चा तेल) शुद्धीकरण कंपन्यांनामार्च 2024 पर्यंत दरवर्षी 20 लाख टनाच्या आयातीवर आयात शुल्कात सवलत दिली आहे.

त्यासाठी या शुद्धीकरण कंपन्यांकडून 27 मे ते 28 जून या दरम्यान माहिती मागविण्यात आली आहे. त्याआधारे या कंपन्या विदेशातून किती खाद्यतेल आयात करणार आहे, त्याचा अंदाज घेता येणार आहे. सरकार आयात शुल्कात त्याच कंपन्यांना सवलत देणार आहे, ज्या कंपन्या खाद्यतेलावर प्रक्रिया करुन ते बाजारात ग्राहकांसाठी उपलब्ध करुन देतील. आयात शुल्कात सूट न देण्याच्या मलेशियन सरकारच्या निर्णयामुळे तिथला बाजार घसरला सीपीओ आणि पामोलीन तेलाच्या किंमतीत घसरण दिसून आली. सूत्रांच्या माहितीनुसार, मलेशिया एक्सचेंजमध्ये 2.25 टक्के घसरण आली, तर शिकागो एक्सचेंजमध्ये जवळपास 1.5 टक्के घसरण झाली.

खाद्यतेलाच्या भावाला उतरणी

येत्या काही काळात खाद्यतेलाच्या किंमतीत अजून घसरण पाहायला मिळू शकते. तसा आशावाद सूत्र व्यक्त करत आहेत. इंडोनेशियाने पामतेलावरील निर्यात निर्बंध मागे घेतले आहे. त्याचा परिणाम लागलीच दिसून आला. या आठवड्याच्या शेवटी भारतात 2 लाख टन पामतेल दाखल होत आहे. याचा परिणाम जून महिन्याच्या पहिल्या अथवा दुस-या आठवड्यात भारतीय किरकोळ बाजारात दिसून येईल आणि तेलाच्या किंमती अजून घसरतील.

पाहा व्हिडीओ :

भारत सध्या 1.35 कोटी टन खाद्यतेल आयात करतो, त्यातील 85 लाख टन पामतेलचा हिस्सा आहे. इंडोनेशियाच्या निर्यात बंदीचा परिणाम इतर तेलाच्या विक्रीवरही परिणाम दिसून आला. आता पामतेलचा पुरवठा सुरळीत आणि पूर्ववत होत असल्याने किंमतीत पुन्हा घसरण होण्याची शक्यता बळावली आहे.

बाजाराचा आढावा काय सांगतो?

विदेशी बाजारात तेलाच्या किंमतीत घसरण झाल्याने स्थानिक बाजारात, मोहरी, शेंगदाणा, सोयाबीन, तीळ, कपाशी, सीपीओ आणि पामोलीन खाद्यतेलांच्या किंमती घसरल्या. आज केवळ सोयाबीन इंदुर तेलाचे भाव स्थिर आहेत. केंद्र सरकारने सूर्यफूल आणि सोयाबीन डीगम(कच्चा तेल) शुद्धीकरण कंपन्यांना (Refinery Company) मार्च 2024 पर्यंत दरवर्षी 20 लाख टनाच्या आयातीवर आयात शुल्कात सवलत दिली आहे. त्याचा थेट परिणाम बाजारावर दिसून येईल.

हे सुद्धा वाचा

कपाशीच्या ढेपेवर जीएसटीत सूट देण्याची घोषणा यापूर्वीच करण्यात आली आहे. त्याचा गैरफायदा उठवत काही भामटे बनावट कपाशीची ढेप तयार करत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें