AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EPFO: कर्मचार्‍यांना मोठी लॉटरी! ATM आणि UPI मधून काढा PF चा पैसा, ईपीएफओचा नवीन प्लॅन काय?

PF Withdraw with ATM And UPI: EPFO 3.0 लवकरच लाँच होत आहे. त्याची अधिकृत तारीख लवकरच समोर येईल. त्यामुळे तुमचे पीएफ खाते हे एखाद्या बँक खात्याप्रमाणे काम करेल. म्हणजे येत्या काही महिन्यात कर्मचाऱ्यांना एटीएम आणि युपीआयद्वारे पैसे काढता येतील. काय आहे मोठी अपडेट?

EPFO: कर्मचार्‍यांना मोठी लॉटरी! ATM आणि UPI मधून काढा PF चा पैसा, ईपीएफओचा नवीन प्लॅन काय?
पीएफमधून पैसे काढणे एकदम सोपेImage Credit source: गुगल
| Updated on: Mar 26, 2026 | 3:33 PM
Share

PF Withdraw with ATM And UPI: देशातील कोट्यवधी नोकरदारांसाठी मोठी आनंदवार्ता येऊन धडकली आहे. केंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (Employees Provident Fund Organisation) आता सिस्टिम अपग्रेड करणार आहे. लवकरच EPFO 3.0 लाँच होईल. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पीएफ खाते हे एखाद्या बँकेच्या खात्यासारखे होईल. देशभरातील कर्मचाऱ्यांना एटीएम आणि युपीआयच्या माध्यमातून पीएफ पैसे काढता येतील. काय आहे याविषयीची मोठी वार्ता, जाणून घ्या.

पीएफमधून पैसे काढणे ही मोठी कटकट

बिझनेस टुडेच्या एका वृत्तानुसार, आतापर्यंत पीएफमधून पैसे काढणे ही एक दीर्घ आणि किचकट प्रक्रिया मानली जात आहे. यामध्ये कागदी प्रक्रिया आणि कंपनीची मंजूरीची गरज आहे. त्यासाठी काही दिवसांची वाट पाहावी लागते. पण आता EPFO 3.0 अंतर्गत एक डिजिटल, कोर-बँकिंग सिस्टिम तयार करण्यात येत आहे. त्यामुळे तुम्हाला पीएफ बॅलेन्स लागलीच चेक करता येईल. ऑनलाईन क्लेम टाकता येईल आणि लागलीच पैसे खात्यात जमा होईल.

ATM कार्ड आणि UPI च्या माध्यमातून पैसे काढा

सर्वात मोठी अपडेट म्हणजे पीएफची रक्कम आता ATM कार्ड आणि UPI च्या माध्यमातून काढता येईल. अर्थात योग्य कारण असेल तरच पीएफची रक्कम काढता येईल. आरोग्य, घर खरेदी, शिक्षण आणि बेरोजगारी सारख्या महत्त्वाच्या कारणासाठी पीएफची रक्कम काढता येईल. नियमातंर्गत पैसा काढता येईल. म्हणजे सहज पैसा काढता येईल. पण नियम पण लागू असतील. या सुविधेमुळे क्लेम सेटलमेंट अधिक वेगवान होतील. आधार आणि KYC व्हेरिफिकेशनच्या माध्यमातून क्लेम ऑटोमॅटिक प्रक्रिया होईल. त्यामुळे आठवड्याची प्रतिक्षा काही दिवसांवर येईल. तर नोकरी बदलल्यानंतर पीएफ हस्तांतरण आपोआप होईल. त्यामुळे कर्मचाऱ्यांना पीएफ हस्तांतरणासाठी वारंवार अर्ज करावा लागणार नाही.

लवकरच EPFO 3.0 प्लॅटफॉर्म

लवकरच EPFO 3.0 प्लॅटफॉर्म दाखल होत आहे. तज्ज्ञांच्या मते, इतकी सुविधा दिली असली तरी जबाबदारी वाढेल. पीएफ ही खरीतरी निवृत्तिसाठीची बचत मानली जाते. त्यामुळे वारंवार पीएफ काढणे हे भविष्यासाठी नुकसानदायक ठरू शकते. EPFO 3.0 प्लॅटफॉर्म पूर्णपणे डिजिटल, गतीमान आणि युझर फ्रेंडली होण्याच्या दृष्टीने सरकारने एक मोठे पाऊल टाकले आहे. लवकरच या प्लॅटफॉर्मचे उद्धघाटन होणार आहे. गेल्यावर्षी सरकारने या बदलाची माहिती दिली होती.

Follow Us
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका;
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका; म्हणाले हिंदुत्त्व...
ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! अहिरांनी ठणकावू सांगितलं
Sachin Ahir | ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! सचिन अहिर यांनी ठणकावू सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
Sachin Ahir Exclusive| 6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या
Nalasopara Rain Updates | मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या लोकल
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना नेमका काय इशारा?
राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया...
Sudhir Mungantiwar | राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, योगी आदित्यनाथ...
56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी
Sudhir Mungantiwar | 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी; एकही शेतकरी वंचित राहणार नाही - सुधीर मुनगंटीवार
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून...
Kalyan News | कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून नागरिकांची जीवघेणी कसरत
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने खळबळ, नेमका रोख कोणाकडे?