AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EV स्टॉक सुसाट! अवघ्या 6 महिन्यात तुफान परतावा, झटक्यात गरिबी दूर

Penny Stock: 1,621.50 कोटींचे मार्केट कॅप असलेली स्मॉल कॅप कंपनी ए-1 लिमिटेड (A-1 Limited) चा शेअर आज 5 टक्क्यांनी उसळला. या तेजीमुळे गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला. सहा महिन्यात या कंपनीने 100 टक्के परतावा दिला. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला.

EV स्टॉक सुसाट! अवघ्या 6 महिन्यात तुफान परतावा, झटक्यात गरिबी दूर
ईव्ही स्टॉकImage Credit source: गुगल
| Updated on: Jan 20, 2026 | 3:40 PM
Share

EV Penny Stock: या ईलेक्ट्रिक व्हेईकल कंपनीच्या स्टॉकने सोमवारी मोठी झेप घेतली. 1,621.50 कोटींचे मार्केट कॅप असलेली स्मॉल कॅप कंपनी ए-1 लिमिटेडचा (A-1 Limited) स्टॉक पाच टक्क्यांनी वधारला. या कंपनीची उपकंपनी इलेक्ट्रिक मोबिलिटी A-1 Sureja Industries एकूण 1,425 युनिट्सचे दोन ऑर्डर मिळाले आहेत. हा कार्यादेश कमी गतिमान इलेक्ट्रिक टू व्हिलर्स वाहनांच्या पुरवठ्यासंदर्भात आहे. या कंपनीने पहिला कार्यादेश 12 जानेवारी 2026 रोजी Zipnova Enterprise LLP कडून मिळाला. त्यानुसार, 525 कमी गतीशील इलेक्ट्रिक मोटरसायकलचा पुरवठा करण्यात येणार आहे. तर दुसरी ऑर्डर 14 जानेवारी 2026 रोजी Aayushman Engineering ने दिली आहे. यामध्ये 900 गमी गतिशील इलेक्ट्रिक दुचाकींचा पुरवठा करण्यात येणार आहे. या कंपनीने गेल्या सहा महिन्यात 100 टक्के परतावा दिला. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला.

ऑर्डर मजबूत, EV सेगमेंटमध्ये तुफान

कंपनीनुसार, ही नवीन ऑर्डर A-1 Sureja Industries च्या सध्याची ऑर्डर अधिक मजबूत करते. याचा अर्थ या कंपनीला कमी गतिशील इलेक्ट्रिक व्हेईकल सेगमेंटमध्ये कंपनीच्या उत्पादनांना बाजारात चांगली मागणी आहे आणि भविष्यात या उत्पादनांसाठी चांगला ग्राहक वर्ग आहे. त्यामुळे या कंपनीच्या शेअरमध्ये चांगली उसळी दिसून आली. कंपनी भविष्यात त्यादृष्टीने महत्त्वाचे पाऊल टाकण्याची शक्यता आहे.

कंपनीचा वाटा 51%

अक्षय ऊर्जा आणि शाश्वत संसाधने याकडे जगाचा ओढा वाढला आहे. याच दरम्यान A-1 Limited ने A-1 Sureja Industries मधील वाटा 45% हून वाढवून 51% इतका केला आहे. ही गुंतवणूक 100 कोटींच्या इंटरप्राईज व्हॅल्युशनवर आहे. कंपनी EV आणि यासंबंधीत क्षेत्रात रिसर्च, कंपोनेंट उत्पादनं आणि स्मार्ट चार्जिंगसंबंधीच्या विस्तारची शक्यता दिसत आहे. यामुळे बोनस आणि शेअर स्प्लिटविषयी लिक्विडिटी वाढली आहे. तर काही दिवसांपूर्वी A-1 Ltd ने 3:1 बोनस इश्यू पूर्ण केला आहे. यातंर्गत प्रत्येक एका शेअरवर तीन बोनस शेअर देण्यात आले. तर 10 रुपयांचा फेसव्हॅल्यू असलेल्या एका शेअरला एक रुपया फेस व्हॅल्यूच्या 10 शेअरमध्ये वाटले.

A-1 Limited शेअरची किंमत

कंपनीचा शेअर BSE वर दुपारी 12:51 वाजेपर्यंत 4.91% वा 1.65 रुपयांनी वधारुन 35.25 रुपयांवर व्यापार करत होता. या शेअरने गुंतवणूकदारांना अवघ्या सहा महिन्यात दामदु्प्पट परतावा दिला आहे. या शेअरने या काळात गुंतवणूकदारांना 111 टक्क्यांचा परतावा दिला आहे.

डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.

नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार.