‘हे’ कुटुंब महिन्याला 100 कोटी पगार घेतं, इतरांनाही कमाईचा मार्ग सांगतं, नेमका व्यवसाय-उत्पन्नाचा मार्ग काय?

एखाद्या कुटुंबात एका महिन्यात किती रुपये कमाई येऊ शकते याचा सर्वसामान्य माणसाने अंदाज केला तर फारतर ते लाखाच्या घरात आकडे सांगू शकतील. मात्र, देशात असेही लोक आहेत जे महिन्याला कोट्यावधी रुपये कमावतात.

'हे' कुटुंब महिन्याला 100 कोटी पगार घेतं, इतरांनाही कमाईचा मार्ग सांगतं, नेमका व्यवसाय-उत्पन्नाचा मार्ग काय?
Follow us
| Updated on: May 29, 2021 | 5:18 PM

नवी दिल्ली : एखाद्या कुटुंबात एका महिन्यात किती रुपये कमाई येऊ शकते याचा सर्वसामान्य माणसाने अंदाज केला तर फारतर ते लाखाच्या घरात आकडे सांगू शकतील. मात्र, देशात असेही लोक आहेत जे महिन्याला कोट्यावधी रुपये कमावतात. असंच एक कुटुंब सध्या महिन्याला तब्बल 100 कोटी रुपयांची कमाई करत आहेत. इतकंच नाही तर ते इतरांनाही कमाईचा मार्ग सांगतं. हे ऐकून नेमका या कुटुंबा व्यवसाय काय आणि ते इतरांना कमाईचा कोणता मार्ग सांगतं याबद्दल तुम्हाला प्रश्न पडला ना? चला तर जाणून घेऊयात कोट्यावधी कमाईचा या कुटुंबाचा मार्ग.

महिन्याकाठी पगार 100 कोटी रुपये

या कुटुंबाचा कोट्यावध रुपये कमाईचा मार्ग आहे शेयर बाजार. हे कुटंब जिरोधा या आपल्या कंपनीच्या माध्यमातून हजारो लोकांना कमाईचा मार्ग सांगतं. सोबतच स्वतःही कोट्यावधी कमावतं. जीरोधाचे संस्थापक नितिन कामथ, त्यांची पत्नी सीमा पाटील आणि नितिनचे बंधू निखिल कामत यांचा महिन्याकाठी पगार 100 कोटी रुपये आहे. बंगळुरुमधील त्यांची ऑनलाईन प्लॅटफार्म असलेली कंपनी लोकांनाही कमाईसाठी मदत करते. या प्लॅटफॉर्मवर लोक इक्विटी मार्केटवर डिलिव्हरी आणि इंट्रा डे दोन्हीचे व्यवहार करु शकतात. 2010 मध्ये स्थापन झालेली ही कंपनी सध्या गुंतवणुकदारांमध्ये चांगलीच लोकप्रिय आहे.

कामथ कुटुंब अनेक कंपन्यांच्या मालकांनाही जड

भारतीय बाजारात एंजल ब्रोकिंग, जिरोधा, शेयरखान असे अनेक ट्रेडिंग प्लॅटफॉर्म लोकप्रिय आहेत. हे प्लॅटफॉर्म लोकांना शेअर बाजाराच्या माध्यमातून मोठी कमाई करुन देतात. मात्र, या कंपन्यांचे मालकही कोट्यावधी कमावतात. कमाईत हे लोक मोठ मोठ्या कंपन्यांच्या अधिकारी आणि मालकांनाही मागे टाकतात.

कंपनीचं बाजारमुल्य 2 अब्ज डॉलर

केवळ 10 वर्षात जीरोधा कंपनीने वेगाने उंची गाठलीय. याचा अंदाज कंपनीच्या बाजारमुल्यावरुन येऊ शकेल. केवळ 10 वर्षात कंपनीचं बाजारमुल्य 2 अब्ज डॉलर झालंय. आता कंपनी या प्रगतीचा फायदा कर्मचाऱ्यांना देणार आहे. यानुसार कंपनीने आपल्या सुरुवातीच्या कर्मचाऱ्यांना शेयर बायबॅक करण्याची योजना आणलीय. जीरोधाचं मुल्य केवळ 1 वर्षात दुप्पट झालंय. कंपनी जवळपास 2.5 कोटी डॉलरच्या (150-200 कोटी रुपये) एम्प्लॉयी स्टॉक ऑप्शन प्लॅन बायबॅक योजनेवर काम करत आहे.

देशातील कोट्यावधी पगार घेणारी लोक

याआधी आर्थिक वर्ष 2020 मध्ये सम फार्माचे कलानिथी मारन यांचा पगार 87.5 कोटी रुपये सांगण्यात आला होता. दुसरीकडे हिरो मोटकॉर्पचे पवन मुंजाल यांचा पगार 84.6 कोटी रुपये होता. आमरा राजाचे संस्थापक जयादेव गाला यांचा पगार जवळपास 45 कोटी रुपये असल्याचं सांगण्यात आलंय. असं असलं तरी टेक महिंद्राचे सीईओ सी पी गुरनानी यात अव्वल आहेत. त्यांचा पगार जवळपास 146 कोटी रुपये आहे.

हेही वाचा :

धक्कादायक, भारतात श्रीमंत आणि शक्तीशाली लोकांकडून धमक्या, अदर पुनावालांकडून भारताबाहेर लस उत्पादनाचा विचार

Mukesh Ambani | मुकेश अंबानींच्या यशाचे ‘हे’ 5 मंत्र तुम्हालाही श्रीमंत होण्यास मदत करु शकतात

एक रुपयाही खर्च न करता घर बसल्या कमवा पैसे, या 8 सोप्या पद्धती तुम्हीही वापरा

व्हिडीओ पाहा :

Family in India whose monthly income is 100 crore know all about Zerodha family

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.