AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

August Bank Holiday | सुट्यांचा सुकाळ, बँकेतील कामे घ्या पटकन उरकून, इतक्या दिवस बंद राहतील बँका

August Bank Closed Holiday | ऑगस्ट महिन्यात विविध सण येतात. या महिन्यांत स्वातंत्र्य दिनासह अनेक उत्सव ही साजरे होतात. यादिवशी बँकांना सुट्टी राहणार आहे.

August Bank Holiday | सुट्यांचा सुकाळ, बँकेतील कामे घ्या पटकन उरकून, इतक्या दिवस बंद राहतील बँका
कामकाज उरकून घ्या लवकरImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Aug 11, 2022 | 4:43 PM
Share

August Bank Holiday News | ऑगस्ट (August) महिन्यातील दहा दिवस उलटून गेले असून त्यातील शनिवार, रविवार वगळता तीन दिवस बँका विविध राज्यात बंद होत्या. आता आजची रक्षाबंधनाच्या (Raksha Bandhan) सुट्टी सहित पुढील आठवड्यात पुन्हा सुट्यांचा सुकाळ आलेला आहे. 15 ऑगस्टनंतर बँकांना (Bank Holidays) विविध दिवशी सुट्या राहतील. त्यामुळे या कालावधीत बँकांचे कामकाज ठप्प राहिल. त्यामुळे तुमचे बँकेतील कामकाज असेल तर ते पूर्ण करुन घ्या. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) ऑगस्टमधील बँकांच्या सुट्ट्यांची यादी (List of Bank Holidays) जाहीर केली आहे. ऑगस्ट महिन्यात एकूण 13 दिवस (दुसरा/चौथा शनिवार आणि रविवार वगळता) बँका बंद राहतील. स्वातंत्र्य दिन 2022, रक्षाबंधन 2022, जन्माष्टमी (जन्माष्टमी 2022) आणि गणेश चतुर्थी (गणेश चतुर्थी 202) यांसारखे मोठे सण या महिन्यात येतात. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात बँकेशी संबंधित काही काम (Working of Bank) असेल तर सुट्टी नक्की तपासा आणि त्यानुसार बँकेत जा. नाहीतर काम तर होणारच नाही, पण मनस्ताप होईल.

सुट्यांचे गणित काय

केंद्रीय बँक तीन श्रेणीत लक्षात घेत सुट्यांची यादी जाहीर करते. परक्राम्य संलेख अधिनियम (negotiable instrument act), तात्काळ पैसे पाठविणे (real time gross settlement) आणि बँक खाते व्यवहाराचा लेखाजोखा मांडण्यासाठी (Bank closing Account) याअंतर्गत बँकेच्या सुट्या असतात. तर राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर बँकांना सुट्टी आहे. या सुट्या शनिवारी आणि रविवारपेश्रा वेगळ्या असतील. दिवाळी आणि दस-यासारख्या सणाच्या दिवशी देशभरातील बँकांना सुट्टी असते.

ऑनलाईन बँकिंग सेवा सुरळीत

बँकेला सुट्टी असली की शटर डाऊन असते, अर्थात बँकिंगचे काम पूर्णपणे थांबत नाही. ऑनलाइन बँकिंग सेवा पूर्वीप्रमाणेच चालू राहील आणि आपण सुट्टीच्या दिवशी ही आपले काम हाताळू शकता. पण ग्राहकांना बॅंकेच्या शाखेत जाऊन त्यांचे पैसे जमा करता येणार नाहीत किंवा शाखेतून पैसे काढता येणार नाहीत. परंतु एटीएममध्ये अशा सेवा उपलब्ध राहतील. ऑनलाईन बँकिंग सेवा, एटीएम आणि मोबाइल बँकिंग सुरू राहील. काही शहरांमध्ये विशिष्ट दिवशी सर्व बँका एकाच वेळी बंद राहतील.

राज्यानुसार सुट्ट्या

या सर्व सुट्ट्या सर्व राज्यांमध्ये लागू होणार नाहीत. आरबीआयच्या अधिकृत संकेतस्थळावरील सुट्ट्यांच्या यादीनुसार (Bank Holidays List 2022) बँकिंगच्या सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये साजरे केल्या जाणाऱ्या सणांच्या किंवा संबंधित राज्यांमध्ये खास प्रयोजनानुसार सुट्टी जाहीर करण्यात येते.

पहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी (Bank Holidays List in August 2022)

11 ऑगस्ट : रक्षाबंधन (देशभरात सुट्टी) 13 ऑगस्ट : दुसरा शनिवार (साप्ताहिक सुट्टी) 14 ऑगस्ट : रविवार (साप्ताहिक सुट्टी) 15 अगस्त: स्वतंत्रता दिन 16 ऑगस्ट : पारशी नववर्ष (मुंबई आणि नागपूरमध्ये सुट्टी) 18 ऑगस्ट : जन्माष्टमी (देशभरात सुट्टी) 21 ऑगस्ट : रविवार (साप्ताहिक सुट्टी) 28 ऑगस्ट : रविवार (साप्ताहिक सुट्टी) 31 ऑगस्ट : गणेश चतुर्थी (गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटकातील बँकांना सुट्टी)

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.