नवी दिल्ली : शेअर बाजारात (Share Market) अनेक असे शेअर आहेत, ज्यांनी बाजाराच्या विरुद्ध जोरदार कामगिरी बजावली. या मल्टिबॅगर शेअरने (Multibagger Share) गुंतवणूकदारांना झटपट परतावा मिळून दिला. नवीन वर्षाची सुरुवात होऊन अवघे 17 दिवस झाले आहेत. या काळात एका कंपनीच्या शेअरने धमाका उडवून दिला आहे. या शेअरने अवघ्या 11 दिवसांत गुंतवणूकदारांची रक्कम दामदुप्पट केली. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या (Investors) आनंदाला पारावार उरला नाही.शेअर बाजाराला घसरणीचे ग्रहण लागलेले असतानाही या शेअरने तेजीचे सातत्य टिकवून ठेवले आहे. येत्या काही दिवसांत शेअर किती सूसाट धावतो, याकडे तज्ज्ञांचे लक्ष आहे.