AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पेट्रोल-डिझेल सोडा…आता सरकार आणखी एक झटका देण्याच्या तयारीत, मध्यमवर्गीयांवर वाढणार बोजा

रुपयांचा दर डॉलरच्या तुलनेत ९७ च्या आसपास पोहचल्यानंतर आरबीआयच्या गव्हर्नर सह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचे टेन्शन वाढले आहे. त्यामुळे आरबीआयने लवकरच मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे.

पेट्रोल-डिझेल सोडा...आता सरकार आणखी एक झटका देण्याच्या तयारीत, मध्यमवर्गीयांवर वाढणार बोजा
rbi bank news
| Updated on: May 21, 2026 | 5:32 PM
Share

मध्य पूर्वेतील तणाव कमी घेण्याचे नाव घेत नसतानाच कच्चे तेलाचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर दोन वेळा वाढवण्यात आले आहेत आणि आणखीन त्यात वाढ करण्याचा विचार केला जात आहे.परंतू आता सरकार आणखी एक मोठा झटका देण्याची तयारी करत आहे.त्यामुळे सामान्यांचे जगण आणखीनच कठीण होणार आहे.

गेल्या काही काळापासून भारतीय रुपयात घसरण सुरुच आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार रुपया एक वर्षांतच १० ते १२ टक्के घसरला आहे. काही तज्ज्ञांनी तर रुपया १०० ची लेव्हल पार करण्याचा अंदाज वर्तवला आहे. या दरम्यान, रुपयांची वाढती घसरण रोखण्यासाठी आरपीआय मोठे पाऊल उचलण्याची तयारी करत आहे.

ब्‍लूमबर्गच्या बातमीनुसार रुपयात स्थिरता आणण्यासाठी आरबीआय रेपो रेट वाढवण्याच्या विचार करत आहे. तसेच करन्सी ट्रान्सफर आणि डॉलर जमा करण्याच्या योजनेवर देखील काम केले जात आहे. अशात जर रेपो रेटमध्ये वाढ केली तर या संकटाच्या काळात बँकेकडून कर्ज घेतलेल्या व्यक्तींच्या ईएमआयमध्ये वाढ होऊ शकते. त्यामुळे मध्यम वर्गाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

रुपया ९७ रुपयांच्या जवळ पोहचल्याने टेन्शन

बुधवारी रुपयाच्या नव्या रेकॉर्ड लोने देशातील लोकांना चिंतेत ढकलले आहे.यामुळे आरबीआयचे अधिकारी देखील तणावात आले आहेत. बातमीनुसार डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया ९७ च्या आसपास पोहचल्याने आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा सह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संभाव्य उपाय योजनांवर चर्चा करण्यासाठी अंतर्गत बैठक बोलावली आहे.

आरबीआय काय करु शकते ?

बातमीनुसार सध्या उपलब्ध पर्यायांत व्याज दरात वृद्धी करणे हा एक उपाय आहे, आरबीआयच्या मॉनिटर पॉलिसीची पुढची बैठक ५ जून रोजी होणार आहे. ज्यात रेपो रेट मध्ये वाढ करण्यावर विचार केला जाऊ शकतो. अन्य उपायांत एनआरआय डिपॉझिट स्कीमच्या माध्यमातून परदेशातून डॉलर जमा करणे आणि सॉवरेन डॉलर बॉन्ड विकणे यांचा समावेश आहे.

विचाराधीन असलेले उपाय २०१३ च्या टेपर टँट्रम काळाच्या दरम्यान घेतलेल्या काही उपायांशी मिळते जुळते आहे. त्यावेळी भारताने परकीय चलनाचा प्रवाह वाढवण्यासाठी स्थानिक बँकांच्या माध्यमातून NRI लोकांसाठी डिपॉझिट स्कीम सुरु केली होती. आरबीआयच्या अंदाजानुसार या वेळी या योजनांतून ५० अब्ज डॉलरपर्यंतची रक्कम उभी केली जाऊ शकते. आधी ही रक्कम सुमारे ३० अब्ज डॉलर होती.

आरबीआयची सहा सदस्यी मुद्रा निती समितीची बैठक ३ ते ५ जून दरम्यान होणार आहे. समितीने या वर्षी आपल्या मानक दराला ५.२५ टक्क्यांवर अनचेंज ठेवला आहे. मात्र, बहुतांशी अर्थतज्ज्ञांनी येणाऱ्या काही महिन्यात यात वाढ होण्याची भविष्यवानी केली आहे.

Follow Us
56 इंच छातीवाले देशातील तरुणांना घाबरले? राऊतांचा मोदी-शहांवर हल्लाबोल
Sanjay Raut : 56 इंच छातीवाले देशातील तरुणांना घाबरले? संजय राऊतांचा मोदी-शहांवर थेट हल्लाबोल
भारतीय तरुणांना कोणीही... चिराग पासवान यांचं मोठं विधान
Chirag Paswan : भारतीय तरुणांना कोणीही... चिराग पासवान यांचं मोठं विधान; रेल्वे-मेट्रो बंदीवरून नेमकं काय म्हणाले?
काहीही झालं तरी आंदोलन करणार; 500 हून अधिक आंदोलक ताब्यात, तरीही....
Delhi CJP Protester : काहीही झालं तरी आंदोलन करणार; 500 हून अधिक आंदोलक ताब्यात, तरीही CJP कार्यकर्ते...
आज कदाचित शेवटची सभा असू शकते; रोहित पवार असं का म्हणाले?
Rohit Pawar Speech : आज कदाचित शेवटची सभा असू शकते; रोहित पवार असं का म्हणाले?
दिल्लीमध्ये 15 हजार पोलीस तैनात; CJP आंदोलनाला परवानगी नाही मात्र...
CJP Delhi Protest : दिल्लीमध्ये 15 हजार पोलीस तैनात; CJP आंदोलनाला परवानगी नाही मात्र अभिजीत दीपके...
जंतर-मंतरवरील आंदोलनावर पोलिसांची ड्रोनद्वारे नजर; प्रत्येक हालचाल...
Delhi CJP Jantar Mantar Protest : जंतर-मंतरवरील आंदोलनावर पोलिसांची ड्रोनद्वारे नजर; 150 पोलिसांना बॉडी कॅमेरे, प्रत्येक हालचाल होणार...
ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील आंदोलनाचा धसका? जंतरमंतर परिसरात जाणारे
Delhi CJP Jantar Mantar Andolan : ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील आंदोलनाचा धसका? जंतरमंतर परिसरात जाणारे सर्व रस्ते बंद, इंटरनेट सेवाही...
सीजेपी आंदोलनाआधी दिल्लीचं छावणीत रूपांतर; जंतर-मंतरवर BSF, CRPF अन्..
Delhi Jantar- Mantar CJP Andolan : सीजेपी आंदोलनाआधी दिल्लीचं छावणीत रूपांतर; जंतर-मंतरवर BSF, CRPF अन्....
मला अटक करा... अभिजीत दीपकेंचं सरकारला खुलं आव्हान, पुढे म्हणाले...
Abhijeet Dipke : मला अटक करा... अभिजीत दीपकेंचं सरकारला खुलं आव्हान, पुढे म्हणाले...
गजानन कीर्तिकरांच्या घरवापसीच्या चर्चेने एकनाथ शिंदे संतापले? म्हणाले,
Shivsena : गजानन कीर्तिकरांच्या घरवापसीच्या चर्चेने एकनाथ शिंदे संतापले? म्हणाले, आम्हाला गांभीर्याने....