Good News: IT आणि FMCG पासून पर्यटनापर्यंत नव्या नोकऱ्यांसह पगारही वाढणार, प्रत्येक क्षेत्राची स्थिती काय?

आता भारतासह इतर देशही यावर मात करण्याचा प्रयत्न करीत आहेत. कोरोनामुळे मोठ्या संख्येने लोकांच्या नोकऱ्या गेल्यात, याचा परिणाम अशा अनेकांच्या पगारावर झाला, ज्यांच्या नोकऱ्या वाचल्यात.

Good News: IT आणि FMCG पासून पर्यटनापर्यंत नव्या नोकऱ्यांसह पगारही वाढणार, प्रत्येक क्षेत्राची स्थिती काय?

नवी दिल्लीः कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेने जगभरातील देशांत हाहाकार माजवला. विशेषतः अर्थव्यवस्थेला या साथीमुळे मोठा फटका बसला. आता भारतासह इतर देशही यावर मात करण्याचा प्रयत्न करीत आहेत. कोरोनामुळे मोठ्या संख्येने लोकांच्या नोकऱ्या गेल्यात, याचा परिणाम अशा अनेकांच्या पगारावर झाला, ज्यांच्या नोकऱ्या वाचल्यात.

कंपन्या नवीन भरती देखील करतायत

ही एक दिलासा देणारी बाब आहे की, देशात कोरोनाच्या प्रभावातून सावरत आता कंपन्यांनी पुन्हा लोकांना कामावर घेण्यास सुरुवात केलीय. कंपन्या नवीन भरती देखील करीत आहेत आणि पगार देखील चांगला देत आहेत. यासोबतच जुन्या कर्मचाऱ्यांनाही वेतनवाढ मिळालीय. जर आपण आरबीआयच्या केंद्रीय बँकेचा अहवाल पाहिला तर 2020-21 या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत कंपन्यांचा नफा पुन्हा वाढू लागलाय.

पुनर्नियुक्तीचा चांगला परिणाम

अर्थव्यवस्थेबाबत रिझर्व्ह बँकेने आपल्या अहवालात म्हटले आहे की, चालू आर्थिक वर्ष 2021-22 च्या पहिल्या तिमाहीतही कंपन्यांच्या नफ्यात वाढ होताना दिसत आहे. आरबीआयच्या अहवालानुसार, वेतन बिलात म्हणजेच पगार आणि भत्त्यांमध्ये 16 क्षेत्रांमध्ये वाढ झाली. याचे मुख्य कारण म्हणजे पुन्हा कामावर घेणे आणि पगारामध्ये वार्षिक वाढ आहे. वेतन बिलात सर्वाधिक वाढ कापड क्षेत्रात (37.7 टक्के) आणि सर्वात कमी वाढ वाहतूक (1.8 टक्के) क्षेत्रात दिसून आली.

एप्रिल ते जून 2021 पर्यंत सुधारणा

आरबीआयच्या 17 ऑगस्टच्या अहवालात म्हटले आहे की, “गेल्या पाच तिमाहीत सातत्याने वाढ झाल्यामुळे पगार आणि भत्त्यांमध्ये कंपन्यांचा खर्च वाढला, जे भरतीमध्ये वाढ दर्शवते. सर्वात मोठी उडी आयटी आणि वाहन क्षेत्रात दिसून आली. त्याचप्रमाणे कापड उद्योगातील वेतन बिल 2021 च्या एप्रिल-जून तिमाहीत 37.7 टक्क्यांनी वाढले. मात्र, वाहतूक क्षेत्रात सर्वात कमी वाढ दिसून आली. ते 1.8 टक्के होते.

कापडानंतर ऑटो सेक्टरचा क्रमांक

आरबीआयच्या अहवालात म्हटले आहे की, ऑटो सेक्टर हे टेक्सटाईल सेक्टर (37.7 टक्के उसळी) नंतर येते. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत त्याचे वेतन बिल 25.5 टक्क्यांनी वाढले. कोरोना नंतर वाहनांची विक्री वाढली, ज्यामुळे या क्षेत्रात नोकऱ्या वाढल्या. त्याचप्रमाणे वेतन बिलात धातू आणि खाण आणि ग्राहक सारख्या विभागात 20 टक्क्यांहून अधिक वाढ झाली.

या पाच सेक्टरमध्ये कोणतीही घट न करता तेजी

आयटी, कम्युनिकेशन्स, पॉवर, फार्मा आणि एफएमसीजी ही पाच क्षेत्रे आहेत, ज्यांचे वेतन बिल आर्थिक वर्ष 2021 च्या सर्व तिमाहीत कधीच कमी झाले नाही. आयटी क्षेत्रातील वेतन बिल सर्व तिमाही दरम्यान वाढतच गेले. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत त्यात 16.7 टक्के वाढ झाली. कोरोना महामारी दरम्यान, फार्मा क्षेत्राने चांगला नफा कमावला.

FMCG, वीज आणि दळणवळण क्षेत्र

एफएमसीजी क्षेत्राचे वेतन बिल एप्रिल-जून तिमाहीत 10.6% वाढले. महामारीमुळे वीज क्षेत्रातील वापर कमी झाला, परंतु आर्थिक वर्ष 2021 दरम्यान सर्व तिमाहीत त्याचे वेतन बिल वाढले. या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 11.6% ने वाढली. त्याचप्रमाणे दळणवळण क्षेत्राचे वेतन बिल 7.4 टक्क्यांनी वाढले.

वाहतूक आणि पर्यटन क्षेत्रात वाईट परिणाम

परिवहन क्षेत्रात सर्वात कमी 1.8 टक्के वाढ झाली. परिवहननंतर कोरोना महामारीचा सर्वात वाईट परिणाम पर्यटन क्षेत्रावर झाला. गेल्या आर्थिक वर्षाच्या चार तिमाहीत त्याच्या वेतन बिलामध्ये घट दिसून आली. परंतु या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत त्यात 4.3 टक्के वाढ झाली, जी सुधारणा दर्शवते.

सतत सुधारणेची चिन्हे

केंद्रीय बँक आरबीआयने आपल्या अहवालात म्हटले आहे की, अर्थव्यवस्थेत पुनरुज्जीवन होण्याची चिन्हे आहेत. देशातील 1,427 सूचीबद्ध गैर-वित्तीय कंपन्यांनी दिलेल्या निकालांनुसार, जून तिमाहीत त्यांची विक्री वर्ष-दर-वर्षाच्या आधारे 57 टक्क्यांनी वाढली. गेल्या वर्षी याच कालावधीत त्यात 34 टक्के घट झाली होती. देशाची अर्थव्यवस्था पुन्हा वेग घेईल, अशी अपेक्षा आहे.

संबंधित बातम्या

LIC IPO बद्दल मोठी बातमी! पॉलिसी खरेदी करणाऱ्यांना अधिक लाभ, नवी योजना तयार

कर्जात बुडालेल्या Vi चे MTNL-BSNL मध्ये विलीनीकरण होणार, सरकारची योजना काय?

From IT and FMCG to tourism, salaries will also increase with new jobs, what is the status of each sector?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI