AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gautam Adani 10 वर्षांत 7 लाख कोटी खर्च करणार, प्लॅन हा खास

Gautam Adani | अदानी एनर्जी सोल्यूशन्सने स्टॉक एक्सचेंजला एक महत्वपूर्ण माहिती दिली आहे. त्यानुसार या क्षेत्रासाठी भारतातील हा सर्वात मोठा इन्फ्रास्ट्रक्चर ग्रुप त्यांची स्थिती मजबूत करणार आहे. पुढील 10 वर्षांत हा समूह 7 लाख कोटींची गुंतवणूक करण्याची तयारी करत आहे. काय आहे अदानी समूहाचा मेगा प्लॅन?

Gautam Adani 10 वर्षांत 7 लाख कोटी खर्च करणार, प्लॅन हा खास
| Updated on: Dec 12, 2023 | 10:19 AM
Share

नवी दिल्ली | 12 डिसेंबर 2023 : अदानी समूहाचे चेअरमन अब्जाधीश गौतम अदानी यांना पुन्हा सुगीचे दिवस आले आहेत. हे वर्ष त्यांची परीक्षा घेणारे ठरले. पण हिंडनबर्ग रिपोर्टप्रकरणात त्यांना अनेक ठिकाणी दिलासा मिळाला. सुप्रीम कोर्टाचे मत, अमेरिकन सरकारने घेतलेली भूमिका त्यांना बळ देणारी ठरली. अदानी समूहाच्या शेअरने मोठी उडी घेतली. श्रीमंतांच्या यादीत त्यांनी मोठी आघाडी घेतली. त्यांनी आता व्यवसाय विस्ताराची योजना आखली आहे. हिंडनबर्गचे वादळ संपल्यात जमा आहे. त्यामुळे बाजारात अदानी समूहाने मोठी झेप घेतली आहे. बाजारातील समूहाचे मार्केट कॅप 12 लाख कोटींच्या घरात पोहचले आहे. आता गौतम अदानी हे येत्या 10 वर्षांतील घौडदौडीसाठी रोडमॅप तयार करत आहेत. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी याची माहिती दिली.

गुंतवणूकदारांना दिली ही माहिती

गौतम अदानी यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर गुंतवणूक योजनेची माहिती दिली. Green Initiatives विषयी माहिती दिली. PTI च्या रिपोर्टनुसार, अदानी समूह पुढील 10 वर्षांत 7 लाख कोटींची गुंतवणूक करणार आहे. अदानी एनर्जी सोल्यूशन्सने स्टॉक एक्सचेंजमध्ये फायलिंग केले आहे. त्यात ही माहिती देण्यात आली आहे. इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात कंपनी आघाडी घेणार आहे. त्यासाठी ही गुंतवणूक करण्यात येणार आहे.

या क्षेत्रात विस्तार

अदानी समूहाची फ्लॅगशिप कंपनी, अदानी इंटरप्राईजेस खनिज, विमानतळ, संरक्षण आणि सौर ऊर्जा उपकरणं, रस्ते, मेट्रो, रेल्वे, डाटा सेंटर आणि रिसोर्स मॅनेजमेंट क्षेत्रात भरीव काम करेल. तर Adani Ports ग्रीन इनिशिएटिव्हवर लक्ष केंद्रीत करणार आहे. पुढील 10 वर्षांचा रोडमॅपची माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आली आहे. त्यानुसार, 2025 पर्यंत अदानी समूह, कार्बन न्यूट्रल पोर्ट ऑपरेशन्स म्हणून राष्ट्रीय मानके स्थापित करेल.

सर्वात मोठा ग्रीन एनर्जी पार्क

Gautam Adani यांनी ग्रीन एनर्जी पार्कची संकल्पना मांडली आहे. त्यानुसार, 1000 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प स्थापन करण्यात येईल. ग्रीन फ्यूचरसाठी कंपनी सर्व उपाय योजना करणार आहे. त्यासाठी मँग्रोव लागवडीचे उद्दिष्ट 5000 हेक्टरपर्यंत वाढविण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांतील शेअर बाजारातील घौडदौडीमुळे उद्योजक गौतम अदानी हे अब्जाधीशांच्या यादीत 14 व्या क्रमांकावर पोहचले आहे. अदानी यांच्या संपत्तीत 85.1 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. मुकेश अंबानी आणि त्यांच्यात आता केवळ एक क्रमांकाचा फरक आहे. मुकेश अंबानी सध्या श्रीमंतांच्या यादीत 13 व्या क्रमांकावर आहेत.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.