AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरी ठेवलेल्या सोन्यावर 2.50% व्याज मिळवा, RBI चे नवे नियम जारी

वर्षानुवर्षे लोकांचा यावर विश्वास असून, हे नेहमीच आर्थिक अडचणीत मदतगार ठरते. जगात कोरोना साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यापासून सोन्याच्या किमती रोलर कोस्टर राईडवर आहेत. तर गुंतवणूक तज्ज्ञ आणि फंड मॅनेजर सोन्याच्या दागिन्यांपेक्षा कागदी सोन्याची वकिली करतात.

घरी ठेवलेल्या सोन्यावर 2.50% व्याज मिळवा, RBI चे नवे नियम जारी
सोने हॉलमार्किंग
| Edited By: | Updated on: Aug 20, 2021 | 7:04 AM
Share

नवी दिल्ली : आर्थिक तज्ज्ञांनी नेहमीच सोन्याला सर्वाधिक पसंतीची संपत्ती मानलेय. एवढेच नाही तर सोने हे प्रत्येक भारतीयांसाठी गुंतवणुकीचे सर्वात आवडते साधन राहिलेय. वर्षानुवर्षे लोकांचा यावर विश्वास असून, हे नेहमीच आर्थिक अडचणीत मदतगार ठरते. जगात कोरोना साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यापासून सोन्याच्या किमती रोलर कोस्टर राईडवर आहेत. तर गुंतवणूक तज्ज्ञ आणि फंड मॅनेजर सोन्याच्या दागिन्यांपेक्षा कागदी सोन्याची वकिली करतात.

सोन्याचे सर्वात पसंतीचे पेपर गोल्ड स्वरूप मानले जाते

सॉवरेन गोल्ड बाँडच्या (Sovereign Gold Bonds ) विपरीत सोन्याचे मूल्य बाजाराच्या हालचालीनुसार वाढत राहते, ते आपल्याला कोणतेही व्याज देत नाही. आरबीआयच्या SGBsला सोन्याचे सर्वात पसंतीचे पेपर गोल्ड स्वरूप मानले जाते, कारण ते पिवळ्या धातूचे मूल्य वाढवते आणि व्याज देते.

घरी ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांवर पैसे कसे कमवायचे?

जर तुम्ही तुमचे सोन्याचे दागिने बँकेत ठेवायचे ठरवले तर तुम्हाला लॉकरचे शुल्क भरावे लागेल. तुमच्या घरी ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांमधून तुम्ही अधिक पैसे कमावू शकता, असा एक मार्ग आहे. तुम्ही निष्क्रिय सोने RBI ने नियुक्त केलेल्या बँकेत जमा करू शकता आणि त्यावर व्याज मिळवू शकता. आरबीआयच्या सुवर्ण मुद्रीकरण योजनेअंतर्गत (Gold Monetisation Scheme) ही सुविधा उपलब्ध आहे. हे बँकेच्या मुदत ठेवीसारखे आहे, जिथे तुम्ही तुमचे घरी पडून असलेले सोने बँकेत जमा करता येते आणि मॅच्युरिटी झाल्यावर तुम्हाला सोने किंवा सोन्याचे मूल्य जमा व्याजासह परत मिळते.

‘या’ बँका सेवा देताहेत

अलीकडे एचडीएफसी बँक, कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) यासह अनेक बँका ट्विटरवर आरबीआयच्या सुवर्ण मुद्रीकरण योजनेचा प्रचार करताना दिसत आहेत. एचडीएफसी बँकेने आपल्या ट्विटरवर लिहिले, “तुमच्याकडे असलेल्या निष्क्रिय सोन्याच्या दागिन्यांवर व्याज मिळवू शकता. एचडीएफसी बँक तुमच्या निष्क्रिय सोन्यावर (idle lying gold jewellery) जास्त व्याज देते. एचडीएफसी बँक गोल्ड मुद्रीकरण योजनेमध्ये गुंतवणूक करा, दीर्घ मुदतीच्या ठेवींवर 2.50% आणि मध्यम मुदत ठेवींवर 2.25% मिळवा. या योजनेअंतर्गत सोन्याची किंमत मॅच्युरिटीच्या वेळी सध्याच्या किमतीवर आधारित असेल. सोन्याच्या ठेव मूल्यावर व्याज मोजले जाणार आहे.

गोल्ड मुद्रीकरण योजना काय आहे ते जाणून घ्या?

ही योजना फिक्स डिपॉझिटच्या स्वरूपात सोन्यातही जमा करता येते. भारतातील रहिवासी असलेली कोणतीही व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकते. गोल्ड एफडी संयुक्त नावानेही उघडता येते. बँका या योजनेंतर्गत सोन्याचे बार, नाणी, रत्ने आणि इतर धातू वगळता दागिन्यांच्या स्वरूपात कच्चे सोने स्वीकारतात. गुंतवणूकदार किमान 10 ग्रॅम कच्चे सोने जमा करू शकतो. गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही. गुंतवणूकदार 1 ते 15 वर्षांच्या दरम्यान कोणतीही मुदत निवडू शकतात. मुदतीचे विविध पर्याय खाली दिले आहेत:

<< शॉर्ट टर्म बँक डिपॉझिट (STBD): कार्यकाळ 1 ते 3 वर्षे << मध्यम मुदतीची सरकारी ठेव (MTGD): कार्यकाल: 5-7 वर्षे << दीर्घकालीन सरकारी ठेवी (LTGD) कालावधी 12-15 वर्षे

मॅच्युरिटीच्या वेळी ठेवीदाराला ज्या स्वरूपात त्याने सोने जमा केले होते त्याच स्वरूपात ते मिळत नाही. जमा केलेले सोन्याचे दागिने वितळले जातात आणि पीव्हीसीद्वारे चाचणी केली जाते.

संबंधित बातम्या

गॅस सिलिंडरवर सबसिडी मिळतेय की नाही; घर बसल्या समजून घ्या

EPFO कडून व्याजाच्या पैशाबद्दल मोठी माहिती, जाणून घ्या पैसे कधी मिळणार?

Get 2.50% interest on gold kept at home, RBI issues new rules

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.