Petrol Price Cheaper | अवघ्या 12 रुपयात मिळेल एक लिटर पेट्रोल! सरकारने टाकावे एवढं पाऊल, काय आहे दिग्गज उद्योगपतीची आयडीयाची कल्पना

Petrol Rate News | देशातील एका दिग्गज उद्योगपतीने जनतेला अवघ्या 12 रुपयात एक लिटर पेट्रोल देण्याचा दावा केला आहे. पण त्यासाठी सरकारला काय धोरण ठरवावे लागेल? तर काय म्हणाले उद्योजक ते पाहुयात

Petrol Price Cheaper | अवघ्या 12 रुपयात मिळेल एक लिटर पेट्रोल! सरकारने टाकावे एवढं पाऊल, काय आहे दिग्गज उद्योगपतीची आयडीयाची कल्पना
तर पेट्रोल होईल 12 रुपये प्रति लिटरImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 20, 2022 | 12:44 PM

Cheap petrol news | पेट्रोल(petrol Price) जर अवघ्या 12 रुपये प्रति लिटर मिळाले तर तुम्ही म्हणाल काय गंमत करता राव. अगोदरच इंधनाच्या किंमतींनी जीव जळतोय नी तुमचं काय भलतंच चाललं आहे. ही काय गंमत करायची वेळ आहे का? तर हा दावा केला आहे, भारतातील बड्या उद्योगपतीनी. अनिल अग्रवाल (Industrialist Anil Agrawal) असे त्यांचे नाव आहे. ते वेदांता लिमिटेड (Vedanta Limited) या मोठ्या कंपनीचे चेअरमन आहेत. त्यांच्या मते सरकारने (Government) जर मनावर घेतलं तर देशात 12 रुपये प्रति लिटर पेट्रोल मिळू शकते. त्यांनी त्यासाठी काही उपाय योजना सांगितल्या आहेत. उद्योगपती अग्रवाल यांच्या म्हणण्यानुसार, सरकार तेल साठे शोधण्यात आणि उत्पादनात खासगी क्षेत्राला (Private sector) सहभागी करुन घेतलं तर भारतच स्वतः मोठ्या प्रमाणात तेल उत्पादन करु शकेल आणि त्यामुळे भारताला आयातीवर (Import of Crude Oil) फार काळ अवलंबून रहावे लागणार नाही आणि खर्च कमी झाल्याने आयात केलेल्या तेलापेक्षा हे इंधन तीन चतुर्थांश स्वस्त पडेल. अर्थात सरकार या सूचनेकडे किती गंभीरतेने बघते आणि व्यवहारिकदृष्ट्या ही योजना किती फायदेशीर ठरते यावर ही चर्चा होणे गरजेचे आहे.

इंधन दरवाढीमुळे आक्रोश

देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती झपाट्याने वाढल्या. वर्षभरात तर या किंमतींनी शंभर ओलांडली. जनतेचा प्रचंड रोष बघता सरकारने कर कपातीचा फॉर्म्यूला वापरला आणि तेलाच्या किंमती 15 ते 25 रुपयांच्या दरम्यान घसरल्या. परंतू, तरीही इंधनाचे दर अधिक आहे. भारत इंधनासाठी आयातीवर निर्भर आहे. आखाती देश, रशिया आणि इतर देशातून कच्च्या तेलाची आयात करण्यात येते. आंतरराष्ट्रीय बाजारातील भावानुसार तेल कंपन्यांना माल खरेदी करावा लागतो. त्यामुळे देशात तेलाचे दर स्थिर नसतात आणि त्यात सातत्याने वाढ होते. या समस्येवर उपायासाठी सरकारने सीएनजी आणि इलेक्ट्रिक वाहनांवर भर देण्याचे धोरण स्वीकारले आहे.

काय म्हणाले अग्रवाल ?

वेदांता समुहाचे चेअरमन अनिल अग्रवाल यांच्या मते, सरकारने तेल साठ्यांचा शोध आणि उत्पादनात (Exploration and Production) खासगी क्षेत्राला सहभागी करुन घेणे आवश्यक आहे. परिणामी देशातच कच्च्या तेलाचे उत्पादन होईल. आयात केलेल्या इंधनापेक्षा (Imported Crude Oil)ते तीन चतुर्थांशने स्वस्त पडेल. वेदांता धातू आणि ऊर्जा क्षेत्रात (Metal and Energy Sector) आघाडीवर आहे. रुपयाचे डॉलरच्या तुलनेत कमालीचे अवमूल्यन झाले आहे. त्यामुळे भारताला इतर देशांकडून व्यापार करताना आता ज्यादा किंमत मोजावी लागणार आहे. अशावेळी अग्रवाल यांच्या सूचनेकडे सरकार किती गांभीर्याने पाहते हे येत्या काळात स्पष्ट होईल.

हे सुद्धा वाचा

कच्चे तेल असे पडेल स्वस्त

सध्या भारत साधारणतः 100 डॉलर प्रति बॅरल दराने कच्च्या तेलाची आयात करत आहे. एका बॅरलमध्ये जवळपास 159 लीटर कच्चे तेल असते. सध्या तेल कंपन्यांना एक लिटर तेलासाठी 50 रुपये खर्च करावा लागत आहेत. भारतात जर तेल उत्पादन करण्यात आले तर, एका बॅरलसाठी जवळपास 25 डॉलर म्हणजे प्रति लिटरसाठी 12 रुपये खर्च येईल. जर कच्चे तेल स्वस्त झाले तर त्याचा सर्वसामान्य नागरिकांना फायदा होईल.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.