AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Insurance घेणं एकदम सोपं! विम्याची करा ऑनलाईन शॉपिंग; IRDAI चे मोठे गिफ्ट

IRDAI Bima Sugam : आता विमा खरेदी ही अत्यंत सोपी होईल. तुम्ही जशी ऑनलाईन शॉपिंग करता. तुमच्या आवडीची वस्तू निवडता, अगदी तसेच एकाच साईटवर तुम्ही विविध कंपन्यांचे वेगवेगळे विमा खरेदी करू शकता. IRDAI ने ग्राहकांसाठी हे मोठे गिफ्ट दिले आहे. यामुळे विम्याचे मार्केट पूर्णपणे बदलणार आहे.

Insurance घेणं एकदम सोपं! विम्याची करा ऑनलाईन शॉपिंग; IRDAI चे मोठे गिफ्ट
विमा खरेदी एकदम सोपी
| Updated on: Sep 20, 2025 | 8:42 AM
Share

Insurance like a Online Shopping : देशातील विमा नियामक संस्था IRDAI ने देशातील कोट्यवधी विमा ग्राहकांना आनंदवार्ता दिली आहे. इरडाने विमा सुगम पोर्टल सुरू करण्याची घोषणा केली आहे. ग्राहकांना आता जीवन,आरोग्य आणि वाहन विमा एकाच पोर्टलवर खरेदी करता येईल. विशेष म्हणजे त्यांना विमा खरेदी करताना अनेक पर्यायांपैकी जो योग्य वाटतो तो निवडता येईल. अनेक कंपन्यांचे विविध विमा पॉलिसी एकाच प्लॅटफॉर्मवर दिसतील. त्यातून तुलनात्मक जी पॉलिसी चांगली वाटते ती ग्राहकांना निवडता येईल. या प्लॅटफॉर्मवरून ग्राहकांना क्लेम सेटलमेंट आणि विमा पॉलिसीचे नुतनीकरण पण करता येईल. अशा सरकारी साईटची अनेक दिवसांपासून प्रतिक्षा होती. अखेर एक डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्यास इरडाने होकार भरला आहे. विशेष म्हणजे या वर्षाअखेरीसच ही साईट आणि याविषयीचे ॲप दाखल होईल.

सहा महिने झाला उशीर

GIC च्या अहवालानुसार, विमा सुगम या नावाने हे पोर्टल आणि ॲप लाँच होईल. हा प्लॅटफॉर्म या वर्षी एप्रिल महिन्यात ग्राहकांसाठी उपलब्ध होणार होता. पण त्याला जवळपास 6 महिन्यांहून अधिकचा उशीर झाला आहे. या सुविधा टप्प्याटप्प्याने लागू होतील. बोर्ड अप्रुव्ह रोडमॅप अंतर्गत पुढील महिन्यात विमा कंपन्या आणि इकोसिस्टिम सहभागीदार यासाठी एकीकृत धोरण पुढे नेतील. त्यानंतर बाजारात खऱ्या अर्थाने व्यवहार सुरू होईल.

काय आहे विमा सुगम?

विमा सुगम हे वन स्टॉप सोल्यूशन्स असेल. यातंर्गत जितक्या विमा कंपन्या आहेत, त्या एकाच प्लॅटफॉर्मवर येतील. त्यांचे विविध प्रकारचे विमा एकाच ठिकाणी उपलब्ध होतील. यामध्ये जीवन विमा, आरोग्य विमा आणि वाहन विमा एकाच ठिकाणी उपलब्ध असतील. यापैकी ग्राहकांना कोणताही एक निवडता येईल. त्यांना या विम्यामध्ये तुलना करता येईल. जिथे पैशांची बचत आणि चांगल्या सुविधा मिळतील ती कंपनी निवडता येईल. यासाठी जीवन विमा परिषद आणि सामान्य विमा परिषदेने होकार दिला आहे. विमा सुगम भारत परिषदेने (bima sugam India federation) या सुविधेबद्दल उत्सुक असल्याचे आणि ग्राहकांसाठी हा एक खिडकी कार्यक्रम असल्याचे म्हटले आहे.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.