AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

US-Iran डील सुरु असतानाच सोने आणि चांदीच्या दरात झाली मोठी वाढ, नवे दर काय ?

इराण आणि अमेरिका यांच्यातील अनिश्चितता कायम राहिल्याने सोमवारी सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली, तर डॉलर निर्देशांक देखील कमजोर झाला आहे.

US-Iran डील सुरु असतानाच सोने आणि चांदीच्या दरात झाली मोठी वाढ, नवे दर काय ?
GOLD AND SILVER
| Updated on: Jun 22, 2026 | 4:55 PM
Share

सोने आणि चांदीच्या किंमतीत मोठी उसळी आली आहे. सोमवारी मल्टी कमोडिटी मार्केटमध्ये सोने आणि चांदीचे दर दिवसाच्या उच्च पातळीवर कामकाज करत होते. सोने १४०० रुपयांनी वाढून ( १ टक्के ) १,४८,६०० रुपये प्रति १० ग्रॅमवर कामकाज करत होते. तर चांदीच्या दरात मोठे दरवाढ झाली होती.

एमसीएक्‍सवर चांदीच्या किंमत ४५०० रुपये वा २ टक्के वाढून सुमारे २.३८ लाख रुपये प्रति किलोवर होती. सोने आणि चांदीच्या दरात ही वाढ तेव्हापासून आली आहे जेव्हापासून स्वित्झर्लंडमध्ये अमेरिका आणि इराणच्या दरम्यान संघर्ष आणि होर्मुझ संदर्भात उघडण्या संदर्भात चर्चा होत होती. इराण -अमेरिकेत यु्द्ध रोखणे आणि होर्मुझ संपूर्ण खोलण्यावर सहमती होऊ शकते अशी आशा केली जात आहे.

सध्या दोन्ही देशात पहिल्या फेरीची चर्चा पूर्ण झाली आहे. ज्यात दोन्ही देशात स्वित्झर्लंडमध्ये पहिल्या फेरीची चर्चा झाल्यानंतर अमेरिका आणि इराण अंतिम सामजंस्यासाठी ६० दिवसांचा रोडमॅपवर सहमती झाली आहे. या रोडमॅप अंतर्गत दोन्ही देश होर्मुझ पुन्हा बंद होऊ न देणे आणि अन्य गोष्टींवर चर्चा करतील. तसेच दोन्ही देशात पुन्हा संघर्ष होऊ नये याचा प्रयत्न करतील. पहिल्या फेरीत सफल चर्चा झाल्यानंतर सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे. या शिवाय सोने आणि चांदीचे भावात वाढ होण्यामागे आणखीनही कारणे आहे.

या कारणांनी देखील सोन्या-चांदीच्या दरात वाढ

सुरक्षित गुंतवणूक : जागतिक आर्थिक आणि भू-राजकीय अनिश्चितते दरम्यान गुंतवणूकदारांनी सोने आणि चांदीच्या दरात गुंतवणूक वाढवली आहे. ज्यामुळे या एसेटची किंमतीला सपोर्ट मिळाला आणि सोने चांदीच्या भावात वाढ झाली आहे.

डॉलरमध्ये कमजोरी: अमेरिकन डॉलरमध्ये कमजोरी आल्याने सोने आणि चांदी अन्य करन्सीच्या तुलनेत जास्त स्वस्त दिसत आहेत. तसेच डॉलरची कमजोर झाल्याने सोने-चांदीमध्ये गुंतवणूकीची मागणी वाढली आहे.

इंटरनॅशनल मार्केटमध्ये सोने-चांदीच्या दरात वाढ

ग्‍लोबल मार्केटमध्ये सोने आणि चांदीच्या किंमतीत वाढ झाली आहे. स्पॉट सिल्व्हरमध्ये सुमारे २.४ टक्के वाढ झाली आहे. ज्याचा परिणाम भारतीय बाजारावर देखील पडला आहे. तसेच सोन्याचे दरात देखील १ टक्क्यांहून जास्त वाढ झाली आहे आणि सोने ४२०० डॉलर प्रति औंसावर ट्रेंड करत आहे.

(नोट-कोणत्याही संपत्ती गुंतवणूक करण्याच्या आधी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा .)

Follow Us
‘स्कूल ठीक करो’ मोहिमे अंतर्गत CJP पदाधिकारी आणि दादा भुसे यांची भेट
मंत्री दादा भुसे आणि कॉकरोच जनता पार्टीची भेट
OBC आश्रमशाळांना इशारा; मूलभूत सुविधा न दिल्यास मान्यता रद्द
राज्यातील जिल्हा परिषद शाळा आणि आश्रमशाळांच्या दयनीय स्थितीवर मंत्र्यांची कठोर भूमिका
आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय, वयोमर्यादेचा नियम शिथिल
आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय, वयोमर्यादेचा नियम शिथिल
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट