AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Price Today : गुरुवार पावला! झरझर चढले, दणकावून आपटले! सोन्याचा निघला दम, भावात कमाल घसरण

Gold Silver Price Today : झरझर रेकॉर्डवर रेकॉर्ड करणाऱ्या सोन्याला एकदाचा जोराचा दम लागला. आज सकाळी सोन्याने बैठक मारलीच. त्याच्या पाठोपाठ चांदीने दम खाला आहे. भावात जोरदार घसरण झाली.

Gold Silver Price Today : गुरुवार पावला! झरझर चढले, दणकावून आपटले! सोन्याचा निघला दम, भावात कमाल घसरण
आजचा भाव काय
| Updated on: Mar 23, 2023 | 9:14 AM
Share

नवी दिल्ली : आज खरेदीदार हरकून गेल्याशिवाय राहणार नाहीत. सोन्याला दम लागला आहे. तर चांदीने बैठक मारली आहे. सोन्याच्या चांदीच्या दरवाढीला पुन्हा एकदा ब्रेक लागला आहे. गेल्या गुरुवारी, 16 मार्च रोजी सकाळी सोन्याच्या चांदीच्या किंमती घसरल्या होत्या. तोच कित्ता या गुरुवारी सोन्याने गिरवला. सोन्यात मोठी घसरण झाली. त्यापाठोपाठ चांदीने पण हापकी खाल्ली. चैत्र शुद्ध प्रतिपदेनंतर शुद्ध सोने आणि चांदीचा (Gold Silver Price Today) भाव स्वस्त झाला. आज खरेदीचा चांगला मुहूर्त आहे. रविवारी 24 कॅरेट सोने 60,470 रुपये तोळा झाले होते. त्यापूर्वी 2 फेब्रुवारी रोजी सोन्याचा भाव 58,880 रुपये प्रति तोळा होता.

22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या भावात आज जबरी घसरण झाली. 22 कॅरेट सोन्यात प्रति तोळा 800 रुपयांची घसरण झाली. आज सकाळी हा भाव 54,350 रुपये आहे. तर रेकॉर्डस्तरावरुन 24 कॅरेट एक तोळा सोने आज स्वस्तात खरेदी करता येईल. आज हा भाव 59,280 रुपये आहे. तोळ्यामागे 870 रुपयांची घसरण झाली. चांदी किलोमागे 500 रुपयांनी घसरली आहे. चांदीचा भाव 71,600 हजार रुपये किलो आहे. गुडरिटर्न्सने हे ताजा भाव जाहीर केले आहेत. आयबीजेएने अजून भाव अपडेट केलेले नाहीत. हे सकाळचे भाव आहे. शहरानुसार भावात तफावत आहे.

भारतीय मानके संस्थेद्वारे शुद्ध सोन्यासाठी हॉलमार्क देण्यात येतो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916 तर 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 अंकीत असते. अनेक ठिकाणी ग्राहक 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची आग्रहाने मागणी करतात.

सोन्यात अपडाऊन्स

  1. 23 मार्च रोजी सोने दणकावून आपटले, भाव 59,280 रुपये झाला.
  2. 22 मार्च रोजी एक तोळा सोन्याचा भाव 60,150 रुपये होता.
  3. 21 मार्च रोजी सकाळी सोन्यात 540 रुपयांची घसरण झाली.
  4. 19 मार्च रोजी 24 कॅरेट सोने 60,470 रुपये तोळा झाले.
  5. 17 मार्च रोजी सोने 500 रुपये तोळा महागले. शनिवारी पुन्हा वाढ नोंदवली.
  6. 16 मार्च सोन्याने भाव वाढीत ब्रेक घेतला.
  7. 15 मार्च रोजी हा भाव 58,140 रुपयांवर पोहचला.
  8. 14 मार्च रोजी सोने झरझर चढले. हा भाव 58,130 रुपये तोळा झाला.
  9. 13 मार्च रोजी सोमवारी सोने प्रति तोळा 56968 रुपये झाले.

प्रमुख शहरातील भाव

  1. गुडरिटर्न्सनुसार, मुंबईत 22 कॅरेट सोन्याच्या भाव 54,200 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 59,130 रुपये आहे.
  2. पुण्यात 22 कॅरेट सोन्याच्या भाव 54,200 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 59,130 रुपये आहे.
  3. नागपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या भाव 54,200 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 59,130 रुपये आहे.
  4. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या भाव 54,230 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 59,,160 रुपये आहे.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.