AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Price | 5 महिन्यात सोनं 8 हजार 400 रुपयांनी घसरलं, तर चांदी 14 हजार 400 रुपयांनी स्वस्त, आजचा दर काय?

शुक्रवारी 5 फेब्रुवारी 2021 च्या वायद्याच्या सोन्याची किंमत MCX एक्सचेंड वर 519 रुपयांच्या घसरणीसह 48 हजार 702 रुपये प्रतितोळा राहिली.

Gold Price | 5 महिन्यात सोनं 8 हजार 400 रुपयांनी घसरलं, तर चांदी 14 हजार 400 रुपयांनी स्वस्त, आजचा दर काय?
Gold and Silver
| Updated on: Jan 17, 2021 | 9:33 AM
Share

मुंबई: काही महिन्यांपूर्वी जवळपास 56 हजारांपर्यंत गेलेल्या सोन्याचा किंमतीत आता मोठी घसरण पाहायला मिळत आहे. शुक्रवारी 5 फेब्रुवारी 2021 च्या वायद्याच्या सोन्याची किंमत MCX एक्सचेंड वर 519 रुपयांच्या घसरणीसह 48 हजार 702 रुपये प्रतितोळा राहिली. तर एप्रिल 2021 च्या वायद्याच्या सोन्याची किंमत गेल्या आठवड्यातील व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी MCX वर 514 रुपयांच्या घसरणीसह 48 हजार 715 रुपये प्रति तोळा राहिली आहे.(Gold and silver prices fall sharply in 5 months)

मागील आठवड्यात सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण

गेल्या आठवड्यात सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण पाहायला मिळाली. गेल्या आठवड्यात सोमवारी 11 जानेवारीला MCX वर 5 फेब्रुवारी 2121 च्या वायद्याच्या सोन्याची किंमत 48 हजार 786 रुपये प्रति तोळा होती. तर यापूर्वी 1 तोळा सोन्याची किमंत 48 हजार 967 रुपयावर बाजार बंद झाला होता. म्हणजे गेल्या आठवड्यात सोन्याच्या किंमतीत प्रति तोळा 265 रुपयांनी घसरण पाहायला मिळाली.

मागील आठवड्यात चांदीच्या दरात तेजी

गेल्या आठवड्यात शुक्रवारी 5 मार्च 2021 च्या वायद्याच्या चांदीची किंमत MCX वर 1 हजार 919 रुपयांच्या घसरणीसह प्रति किलो 64 हजार 764 रुपये राहिली. 11 जानेवारीला MCX वर चांदीचा भाव प्रतिकिलो 63 हजार 603 रुपये राहिला होता. त्यापूर्वीच्या सत्रात चांदीची किंमत 64 हजार 231 रुपये प्रति किलोवर राहिली होती. त्यानुसार चांदीच्या दरात गेल्या आठवड्यात 533 रुपयांनी वाढ झाली आहे.

सोन्याच्या दरात 8 हजार 400 रुपये घसरण

कोरोना काळात सोनं 57 हजार 100 रुपये प्रति तो हळा झालं होतं. 5 फेब्रुवारी 2021 च्या वायदा सोन्याच्या किंमतीत मागील उच्चांक 7 ऑगस्ट 2020 ला पाहायला मिळाला होता. त्या सत्रात फेब्रुवारी 2021 च्या वायदा सोन्याची किंमत तब्बल 57 हजार 100 रुपये प्रति तोळा राहिली होती. सध्याच्या सोन्याच्या किमतीची तुलना केली तर ऑगस्टमध्ये सोन्याची किंमत ही सध्याच्या किमतीपेक्षा 8 हजार 398 रुपये जास्त होती.

आजचा सोन्याचा भाव

मुंबईत आज सोनं प्रति तोळा 48 हजार 910 रुपयांवर आलं आहे. मुंबईतील कालची सोन्याची किंमत ही 49 हजार 450 रुपये होती. म्हणजे कालपेक्षा आज सोन्याचे भाव 540 रुपयांनी स्वस्त झालाय. तर पुण्यातील सोन्याचा भाव पाहायचा झाला तर मुंबई प्रमाणेच पुण्यातही आज सोनं 540 रुपयांनी स्वस्त झालं आहे. पुण्यातील सोन्याचा आजचा भाव प्रति तोळा 48 हजार 910 रुपये आहे.

जळगाव सराफा बाजार –  आठवडाभरातील सोन्याचे भाव (प्रति ग्रॅम)

11 जानेवारी – 5 हजार 1 रुपये 12 जानेवारी – 5 हजार 1 रुपये 13 जानेवारी – 5 हजार 20 रुपये 14 जानेवारी – 5 हजार 16 रुपये 15 जानेवारी – 4 हजार 993 रुपये 16 जानेवारी – 4 हजार 954 रुपये 17 जानेवारी – 4 हजार 954 रुपये

संबंधित बातम्या : 

लसीच्या बातमीमुळे सोने-चांदी 1700 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या तोळ्याचा भाव

Special Story | लसीकरणाची नांदी आणि अर्थव्यवस्थेची घसरगुंडी; सोन्यातील गुंतवणूक ठरणार का फायदेशीर?

Gold and silver prices fall sharply in 5 months

डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.