AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Price Today : आता विसरा खरेदी ! सोन्याचे भाव जे वाढलेत… 10 ग्रॅमसाठी तब्बल..

Gold Price Today 20 may 2026 Latest News Updates in Marathi : सोनं-चांदी घेण्याची लोकांची लगबग लग्नसराईमुळे सुरू असली तरी वाढत्या भावांमुळे हात आखडता घेतला जातो. आज देशातील प्रमुख शहरात 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याचा भाव किती ? घ्या जाणून

Gold Price Today : आता विसरा खरेदी ! सोन्याचे भाव जे वाढलेत... 10 ग्रॅमसाठी तब्बल..
20 मे रोजी सोनं- चांदीचे भाव
| Updated on: May 20, 2026 | 10:19 AM
Share

Gold Rate Today In India : आंतरराष्ट्रीय बाजारात आणि जगात ज्या घडामोडी घडतात त्याचे परिणा देशांतर्ग होत असतात. अमेरिका आणि इराणमधील तणाव कमी होण्याचे संकेत मिळाल्यानंतर बाजारात खरेदी वाढली, ज्यामुळे सोन्याला सपोर्ट मिळाला आणि त्याचे भाव सुळ्ळकन वर गेले. तर दुसरीकडे, औद्योगिक मागणीतील सुस्ती आणि जागतिक बाजारपेठेतील मंदीमुळे चांदीची चमक फिकी पडली आहे. एका दिवसाच्या घसरणीनंतर, सोनं सलग दुसऱ्या दिवशी महाग झालं आहे. या दोन दिवसांत, 24-कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 830 रुपयांनी, तर 22-कॅरेट सोनं 760 रुपयांनी वधारलं आहे. यापैकी, राजधानी दिल्लीत आज 24 कॅरेटचं 10 ग्रॅम सोन्याचे दर 10 रुपयांनी आणि 22 कॅरेट सोनंही 10 रुपयांनी महागल्याचं दिसून आलं. आणि चांदीबद्दल बोलायचं झाल्यास, दिवसभराच्या तेजीनंतर दिल्लीत चांदी सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झाली असून, या दोन दिवसांत तिचा भाव प्रति किलो 5100 रुपयांनी घसरला आहे.

सिटीवाईज सोन्याचे भाव

भारतातील प्रमुख 10 शहरांमधील 18, 22 आणि 24 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याचे आजचे दर किती ते जाणून घेऊया..

शहर  24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव  22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव  18 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 
दिल्ली ₹1,57,200 ₹1,44,110 ₹1,17,940
मुंबई ₹1,57,050 ₹1,43,960 ₹1,17,790
कोलकाता ₹1,57,050 ₹1,43,960 ₹1,17,790
चेन्नई ₹1,63,230 ₹1,48,710 ₹1,24,110
बंगळुरू ₹1,57,050 ₹1,43,960 ₹1,17,790
हैदराबाद ₹1,57,050 ₹1,43,960 ₹1,17,790
लखनऊ ₹1,57,200 ₹1,44,110 ₹1,17,940
पाटणा ₹1,57,100 ₹1,44,010 ₹1,17,840
जयपुर ₹1,57,200 ₹1,44,110 ₹1,17,940
अहमदाबाद ₹1,57,100 ₹1,44,010 ₹1,17,840

एका दिवसाच्या तेजीनंतर चांदी मात्र घसरली

सोन्याप्रमाणेच चांदीलाही मोठी मागणी असते. सध्या अधिकमास सुरू असून या काळात तर जावयाला चांदीच्या काही गोष्टी वाण म्हणून द्यायचीही प्रथा असते. त्यामुळे खरेदीदारांचा चांदीकडे कल वाढला आहे. याच पार्श्वभमीवर एक गुड न्यूज आहे. 18 मे रोजी एक किलो चांदी 10,000 रुपयांनी महाग झाल्यानंतर, काल आणि आज, अशी सलग दुसऱ्या दिवशी तिच्या दरात घट झाली आहे. दोन दिवसांत एक किलो चांदी 5100 रुपयांनी स्वस्त झाली आहे. आजच्या दिवसाबद्दल बोलायचे झाल्यास, दिल्लीत चांदी 100 रुपयांनी स्वस्त होऊन 2, 84,000 रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे. इतर महत्त्वाच्या महानगरांबद्दल सांगायचं झालं तर मुंबई आणि कोलकाता येथेही चांदीचे तेच दर आहेत. तर देशातील सर्वात महाग चांदीचे दर चेन्नईमध्ये असून तेथे 1 किलो चांदीची किंमत ही 2, 99, 000 रुपये इतकी आहे.

सध्या बाजाराचं लक्ष कशाकडे ?

गुंतवणूकदार यूएस फेडरल ओपन मार्केट कमिटीच्या (FOMC) बैठकीच्या मिनिट्सवर, तेथीली प्रत्येक माहितीवर बारकाईने लक्ष ठेवून असतील. व्याजदरांची भविष्यातील दिशा आणि त्याचा सोने-चांदीच्या किमतींवर कसा परिणाम होईल, हे समजून घेण्याचा बाजार प्रयत्न करेल. मिराई असेट शेअरखानचे कमोडिटीज प्रमुख, प्रवीण सिंग यांच्या मते, जागतिक व्याजदर, कच्च्या तेलाच्या किमती आणि पश्चिम आशियातील घडामोडींमुळे येत्या काही दिवसांत सराफा बाजार अस्थिर राहू शकतो.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
नवरात्रीचा खर्च कमी करून दुष्काळग्रस्तांसाठी मोठी मदत; 18 लाख...
इतर खर्च कमी करून दुष्काळग्रस्तांसाठी मोठी मदत; 11 लाख देण्याचा निर्णय, भाजप नेत्याचा पुढाकार
बोरिवलीतील सावरकर उद्यानात गुजराती बॅनरवरून मनसेचे आंदोलन, मराठी...
बोरिवलीतील सावरकर उद्यानात गुजराती बॅनरवरून मनसेचे आंदोलन, मराठी-गुजराती मुद्द्यावरून वाद
भोरमध्ये भातशेती संकटात; पावसाअभावी जमिनीला भेगा, हातातोंडाशी आलेलं...
भोरमध्ये भातशेती संकटात; पावसाअभावी जमिनीला भेगा, हातातोंडाशी आलेलं पीक करपलं
रोहित पवार आमच्यासोबत कॅबिनेटमध्ये मंत्री होतील; नितेश राणेंचं विधान
रोहित पवार आमच्यासोबत कॅबिनेटमध्ये मंत्री होतील अन्... नितेश राणेंचं मोठं विधान चर्चेत
आदिवासी विद्यार्थ्यांचा मुंबई मोर्चा पोलिसांनी रात्रीच अडवला...
आदिवासी विद्यार्थ्यांचा मुंबई मोर्चा पोलिसांनी रात्रीच अडवला, विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
MPSC विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मैदानात; पुण्यातील आंदोलनस्थळी...
MPSC विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मैदानात; पुण्यातील आंदोलनस्थळी जाणार
पुणे बंदच पडले पाहिजे, अभिजीत दिपकेचं मोठं आवाहन; थेट म्हणाले, फोन करा
पुणे बंदच पडले पाहिजे, अभिजीत दिपकेचं मोठं आवाहन; थेट म्हणाले, फोन करा अन्...
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उमेदवार
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उभा केला उमेदवार, सामना'तून दिली माहिती
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान...
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान व्हायरल
निवडणुका 2024 मध्ये झाल्या अन् ज्ञानेश कुमार 2025 मध्ये पदावर आले...
निवडणुका 2024 मध्ये झाल्या आणि ज्ञानेश कुमार 2025 मध्ये पदावर आले, मग... CM फडणवीसांनी समीकरणच मांडलं