Gold Price Today: सोने महागल्यानंतर अजूनही 10 हजारांनी स्वस्त, पटापट तपासा 10 ग्रॅम सोन्याचे भाव

Gold Price Today: सोने महागल्यानंतर अजूनही 10 हजारांनी स्वस्त, पटापट तपासा 10 ग्रॅम सोन्याचे भाव
gold

आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याच्या किमती वाढल्या, तर चांदीच्या किमतींमध्ये कोणताही विशेष बदल झाला नाही.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Vaibhav Desai

Jul 13, 2021 | 6:48 PM

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मजबुतीमुळे भारतीय सराफा बाजारात आज म्हणजेच 13 जुलै 2021 रोजी सोन्याच्या किमतीत किंचित वाढ नोंदली गेली. यानंतरही सोन्याचे दर विक्रमी स्तराहून आता 10 हजार रुपयांनी स्वस्त आहे. त्याचबरोबर आज चांदीच्या भावातही तीव्र तेजी दिसून आली. गेल्या सराफा सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोन्याचे दर 10 ग्रॅम 46,766 रुपयांवर बंद झाले. त्याचबरोबर चांदी 67,498 रुपये प्रतिकिलोवर बंद झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याच्या किमती वाढल्या, तर चांदीच्या किमतींमध्ये कोणताही विशेष बदल झाला नाही. (Gold Price Today: After the price of gold is still 10 thousand cheaper, check the price of 10 grams of gold)

सोन्याची नवीन किंमत (Gold Price, 13 July 2021)

दिल्ली सराफा बाजारात मंगळवारी सोन्याच्या किमतीत प्रति 10 ग्रॅम केवळ 90 रुपयांची वाढ नोंदली गेली. शुद्ध सोन्याच्या 99.9 ग्रॅमची नवीन किंमत आता राजधानी दिल्लीत प्रति 10 ग्रॅम 46,856 रुपयांवर पोहोचलीय. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत आज प्रति औंस 1,809 डॉलरवर गेली. 7 ऑगस्ट 2020 रोजी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचे भाव प्रति 10 ग्रॅम 57,008 रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर बंद झाले होते. याच आधारावर आज सोन्याचे दर विक्रमी उच्चांकापेक्षा 10,152 रुपयांनी स्वस्त आहेत.

चांदीची नवीन किंमत (Silver Price, 13 July 2021)

चांदीच्या किमतींमध्येही आज वाढीचा कल दिसून आला. दिल्ली सराफा बाजारात चांदीचे दर मंगळवारी 490 रुपयांनी वाढून 67,988 रुपये प्रतिकिलोवर बंद झाले. त्याचबरोबर आज आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या भावात फारसा बदल झाला नाही आणि तो औंस 26.21 डॉलर होता.

सोन्याचा भाव का वाढला?

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले की, डॉलरच्या कमकुवततेमुळे सोन्याच्या किमतींमध्ये वाढ झाली. दुसरीकडे मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे व्हीपी कमोडिटी रिसर्च नवनीत दमानी म्हणाले की, अमेरिकेच्या महागाई आकडेवारीची प्रतीक्षा करताना डॉलर कमी झाला आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत सुरू असलेल्या अस्थिरतेचा परिणाम भारतीय सराफा बाजारावर होत आहे.

संबंधित बातम्या

भारतातील घरांच्या किमतीत घट, अमेरिकेसह कोणत्या देशात किती स्वस्त घरे पाहा

पोस्टाच्या ‘या’ विशेष योजनेवर सहज मिळणार कर्ज, जाणून घ्या व्याजदर काय?

Gold Price Today: After the price of gold is still 10 thousand cheaper, check the price of 10 grams of gold

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें