AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Rate : सोन्याचा भाव प्रचंड घसरणार? फक्त 120000 रुपयात….सराफा बाजारातून मोठी अपडेट समोर!

पाहायचं झालं तर सोनं विकायचं की नाही हे ठरवताना विचार केला पाहिजे. सध्या खरंच पैशांची गरज आहे का? हा मुद्दाही सोनं विकताना लक्षात घ्यायला हवा. सोनं हा गुंतवणुकीचा चांगला पर्याय आहे. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून तुम्ही सोनं खरेदी केलेलं असेल तर ते विकू नये.

Gold Rate : सोन्याचा भाव प्रचंड घसरणार? फक्त 120000 रुपयात....सराफा बाजारातून मोठी अपडेट समोर!
gold rate predictionImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 29, 2026 | 6:53 PM
Share

Gold Rate : आजकाल सोन्याचा भाव कधी वाढतोय तर कधी कमी होताना दिसतोय. काही दिवसांपूर्वी सोनं आपल्या सार्वकालिक उच्चांकावर जाऊन पोहोचलं होतं. आता मात्र सोन्याचा भाव घसरताना दिसतोय. हीच बाब लक्षात घेऊन लोक आपल्याजवळीस सोनं, सोन्याचे दागिने विकत असून नफा मिळवत आहेत. सध्या बाजारात सोन्याचा भाव चांगला आहे. त्यामुळे जुने दागिने विकून त्यातून नफा मिळवण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यामुळे भविष्यकालीन विचार करता सोनं विकून नफा मिळवावा का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

सोनं भविष्यात 1.2 लाख प्रति 10 ग्रॅमपर्यंत कमी होऊ शकतं

मिळालेल्या माहितीनुसार एप्रिल ते जून या तिमाहीत भारतात साधारण 50 टक्के जुनं सोनं विकण्यात आलं आहे. सध्या नफा कमवायची संधी आणि भविष्यात सोन्याचा भाव पडण्याची शक्यता या गोष्टी लक्षात घेऊन हे सोनं विकायला काढलं जात असल्याचं बोललं जातंय. भविष्यात सोन्याचा भाव चांगलाच घसरणार आहे, असं अनेक तज्ज्ञ सांगत आहेत. सध्याच्या बाजाराची स्थिती लक्षात घेऊन सोनं भविष्यात 1.2 लाख प्रति 10 ग्रॅमपर्यंत कमी होऊ शकतं असं म्हटलं जात आहे. त्यामळेच आपले जुने दागिने विकून लोक सद्या नफा पदरी पाडून घेत आहेत.

तुम्ही सोनं विकावं का?

तसं पाहायचं झालं तर सोनं विकायचं की नाही हे ठरवताना विचार केला पाहिजे. सध्या खरंच पैशांची गरज आहे का? हा मुद्दाही सोनं विकताना लक्षात घ्यायला हवा. सोनं हा गुंतवणुकीचा चांगला पर्याय आहे. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून तुम्ही सोनं खरेदी केलेलं असेल तर ते विकू नये. परंतु तुम्हाला नफाच हवा असेल तर सोनं विकण्याची ही योग्य वेळ असू शकते, असे म्हटले जात आहे.

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ