सोन्याचे दर 1 लाखांच्या पुढे, इस्रायल-इराण तणावाचा परिणाम
Gold Rate today: तुम्हाला सोनं खरेदी करायचे असेल तर ही बातमी नक्की वाचा. सध्या सोने-चांदीचे दर गगनाला भिडत असल्याने ते खरेदीदारांच्या आवाक्याबाहेर जात आहेत. इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या तणावामुळे सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरापासून एमसीएक्सपर्यंत सोन्याच्या दरात वाढ झाली आहे, मग आज काय आहेत दर, जाणून घ्या.

Gold Rate today: तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल तर ही बातमी नक्की वाचा. कारण, सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या तणावामुळे सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. दरम्यान, आजचे सोन्याचे दर नेमके काय आहेत, याची माहिती पुढे जाणून घेऊया.
इस्रायल-इराण तणावाचे परिणाम
इस्रायल आणि इराण यांच्यातील तणावाची आग आखातात पेटत आहे. त्याचा परिणाम सोन्यावरही होत आहे. तणावाच्या या परिस्थितीमुळे बाजारात अनिश्चितता असल्याने सोने महाग झाले आहे. जागतिक स्तरावर सोन्याचा भाव 0.12 टक्क्यांनी वधारून 3,435 डॉलर प्रति औंस झाला.
सोने 1,00,523 रुपये प्रति 10 ग्रॅम
16 जून रोजी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (एमसीएक्स) सोन्याचा भाव 247 रुपयांनी वधारून 1,00,523 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. एमसीएक्सवर चांदीही 56 रुपयांनी वधारून 1,06,549 रुपये प्रति किलो ग्रॅम झाली.
किरकोळ बाजारात भाव स्थिर?
तनिष्कच्या वेबसाईटनुसार, 16 जून रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव 102110 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, तर 15 जून रोजी तोच होता. आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 96,996 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. त्याच्या किमतीतही कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सोमवारी पेटीएममध्ये एक ग्रॅम सोन्याचा भाव 10,335 रुपये आहे.
यंदा सोन्यात 31 टक्क्यांनी वाढ
2025 मध्ये सोने गुंतवणूकदारांचे आवडते बनले आहे. मिंटच्या अहवालानुसार, या वर्षी आतापर्यंत सोन्याच्या किंमती 31 टक्क्यांनी वाढल्या आहेत आणि वारंवार नवे विक्रम प्रस्थापित करत आहेत. 2005 मध्ये 10 ग्रॅम सोने केवळ 7,638 रुपयांना मिळत होते, जून 2025 पर्यंत ते 1,00,403 रुपयांवर पोहोचले, जे 20 वर्षांत 1,200% ने मोठी वाढ आहे.
गेल्या 20 वर्षांत सोन्याने 16 वर्ष सकारात्मक परतावा दिला असून, 2025 मधील सर्वोच्च कामगिरी करणारी मालमत्ता बनली आहे. मध्यपूर्वेतील इस्रायल-इराण तणाव आणि जागतिक बाजारपेठेतील उलथापालथीमुळे सोन्याची चमक आणखी वाढली असून, ती यापुढेही कायम राहील, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
चांदीही दरवाढीत मागे नाही
चांदीही आपली चमक पसरवत आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून चांदीचे दर एक लाख रुपये किलोच्या वर आहेत. 2005 ते 2025 या कालावधीत चांदीने 668.84 टक्के परतावा दिला आहे. एमसीएक्सवर चांदीचा जुलै वायदा भाव 0.76 टक्क्यांनी वधारून 1,06,695 रुपये प्रति किलो ग्रॅम झाला. इस्रायल-इराणमधील वाढता तणाव आणि अमेरिकी डॉलरच्या कमकुवतपणामुळेही चांदीला गुंतवणूकदारांची पसंती मिळाली आहे.