Gold Rate Weekly : इराण-इस्त्रायलमध्ये भडकले युद्ध; सोन्याच्या किंमतींना आग, एका आठवड्यात 10 ग्रॅम सोन्याचा इतका वाढला भाव
Gold Rate Update : सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी कायम आहे. जगात इस्त्रायलने अजून एका मोठ्या युद्धाला तोंड फोडले आहे. इराणविरोधातील युद्ध भडकले आहे. तशा सोन्याच्या किंमतींना आग लागली आहे. या आठवड्यात 10 ग्रॅम सोन्याने इतका पल्ला गाठला.

इस्त्रायल आणि इराण या दोन देशात युद्ध भडकले आहेत. त्यामुळे भूराजकीय अशांतता वाढली आहे. व्यापारावर मोठा परिणाम दिसून येत आहे. दोन्ही देश एकमेकांवर दात खाऊन आहेत. क्षेपणास्त्रांचा मुक्त वापर होत आहेत. या घडामोडीचा शेअर बाजारासह इतर व्यापारावर थेट परिणाम दिसून येत आहे. सोन्याच्या किंमतींना तर जणू आग लागली आहे. सोन्याच्या किंमती आकाशाला भिडल्या आहेत. वायदे बाजारात सोन्याचा भावाने लाखांचा टप्पा ओलांडला आहे. स्थानिक सोने पेढ्यांवर, सराफा बाजारात जोरदार वाढ दिसून आली आहे. एका आठवड्यात 10 ग्रॅम सोन्याने इतकी झेप घेतली आहे.
MCX वर 1 लाखांचा टप्पा ओलांडला
इस्त्रायल आणि इराण युद्ध भडकले आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर MCX वर 10 ग्रॅम सोन्याचा भाव पुन्हा 1 लाख रुपयांवर आला आणि त्याने त्यापुढे घोडदौड सुरू ठेवली आहे. या आठवड्यात तर सोन्याने चांगली उडी घेतली. चांदीसोबत जणू सोन्याने स्पर्धा लावली. 6 जून 2025 रोजी वायदे बाजारात 5 ऑगस्टसाठीच्या सौद्यासाठी सोन्याचा भाव 97,036 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर 13 जून रोजी हा भाव 1,00,681 रुपये 10 ग्रॅम असा झाला. सोने त्याच्या सर्वकालीन उच्चाकांवर पोहचले. म्हणजे एका आठवड्यात 10 ग्रॅम सोने 3,645 रुपयांनी महागले.
सराफा बाजारात सोन्याची चमक
देशातील विविध सराफा बाजारात सोन्याची चमक वाढली. सोन्याच्या भावात वाढ झाली. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशननुसार, 6 जून रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव 98,163 रुपये प्रति 10 ग्रॅमवर होते. तर शुक्रवारी 13 जून रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव 99,060 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले होते. एका आठवड्यात स्थानिक बाजारपेठेत 10 ग्रॅम सोन्याच्या किंमतीत 897 रुपयांची वाढ झाली. सोने एका आठवड्यात चमकले. जळगाव सराफा बाजारात चांदी पाठोपाठ सोन्याने मोठी झेप घेतली. गेल्या आठवड्यात चांदीने मोठी उडी घेतली होती. त्यानंतर सोन्याने पण मोठी कामगिरी केली.
सोन्याची किंमत जाणून घ्या
कॅरेट रुपये (प्रति 10 ग्रॅम)
22 कॅरेट सोने – 96,680 रुपये
20 कॅरेट सोने – 88,160 रुपये
18 कॅरेट सोने – 80,240 रुपये
14 कॅरेट सोने – 63,890 रुपये
