AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shahrukh Encounter : मोठी बातमी, पुण्यातील सराईत गुंडाचा सोलापूरात खात्मा, शाहरूख एन्काऊंटरमध्ये ठार

Solapur Encounter : सोलापूरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. पुण्यातील सराईत गुंडाचा सोलापूरात पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. शाहरूख नावाच्या गुंडावर पुण्यासह परिसरात अनेक गुन्हे दाखल आहेत. तो सोलापूरात लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

Shahrukh Encounter : मोठी बातमी, पुण्यातील सराईत गुंडाचा सोलापूरात खात्मा, शाहरूख एन्काऊंटरमध्ये ठार
कुख्यात गुंड ठारImage Credit source: गुगल
| Updated on: Jun 15, 2025 | 11:30 AM
Share

सोलापूरातून एक मोठी बातमी समोर येत आहे. पुण्यातील सराईत गुंडाला सोलापूरात, पोलिसांना कंठस्नान घातले. शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख (वय 23) असे या सराईत गुंडाचे नाव आहे. त्याच्यावर पुण्यासह परिसरात अनेक गुन्हे दाखल आहेत. पोलिसाच्या त्याच्या मागावर होते. तो गेल्या काही दिवसांपासून सोलापूरात लपल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. पोलिसांच्या एन्काऊंटरमध्ये मोक्यातील हा फरार आरोपी ठार झाला. या घटनेने पुण्यातील गुंडांमध्ये दहशत पसरली आहेत. पुण्यातील स्वयंघोषीत दादा, भाऊ सध्या अंडरग्राऊंड झाल्याचे समजते.

पोलिसांना पाहताच गोळीबार

शाहरूख शेखवर पुणे पोलिसात अनेक गुन्हे दाखल आहेत. तो सराईत गुन्हेगार होता. काही प्रकरणात तो पोलिसांना हवा होता. पोलीस त्याच्या शोधात होते. तो सोलापूर जिल्ह्यात लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. काही दिवापासून तो सोलापुरातील लांबोटी गावाजवळ लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याला अटक करण्यासाठी पुणे गुन्हे शाखेचे पथक मध्यरात्री लांबोटी येथे आले होते.

लपलेल्या घरावर छापा मारताना आरोपी शाहरुख शेख यांने पोलिसांवर गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या गोळीबारला प्रत्युत्तर देताना शाहरुख उर्फ अट्टी शेख गंभीर जखमी झाला.गंभीर अवस्थेत त्याला सोलापूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

पहाटे तीन वाजता थरार

शाहरूख हा मोका गुन्ह्यातील फरार आरोपी आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहे. पोलीस त्याचा कसून शोध घेत होते. पण तो सारखा गुंगारा देत होता. जीवाच्या भीतीने त्याने सोलापूर गाठले होते. पण त्याच्या कारवाया थांबत नव्हत्या. त्याचा काही गुन्ह्यात हात असल्याचे समोर आले होते. तो मोहोळ जवळील लांबोटी येथे लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे त्याला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक सोलापूरात दाखल झाले होते.

भल्या पहाटे पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी कारवाई सुरू केली. पोलिस आल्याची भनक लागताच शाहरूखने पोलिसांवर गोळीबार केला. त्याला शरण येण्याची संधी देण्यात आली. पण त्याने गोळीबार केला. प्रत्युत्तरात शाहरूख गंभार जखमी झाला. पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पहाटे साडेतीन वाजता ही कारवाई करण्यात आली.

त्याच्यावर खोटा गुन्हा

माझ्या मुलावर खोटा गुन्हा दाखल केला, गोळीबार केलेला नसताना देखील पोलिसांनी इन्काउंटर केला.सोलापूरात पोलिसांच्या इनकाउंटरमध्ये ठार झालेल्या कुख्यात गुंड शाहरुख शेखचे वडील रहिम शेख आणि पत्नी नफिसा शेख हिने दावा केला. पहाटे साडेतीन वाजता 10-12 पोलीस थेट घरात घुसले. शाहरुखने पोलिसांना घरात येऊ नका म्हणून सांगितलं. त्याच्याकडे पिस्टल होती पण त्याने गोळी चालवली नाही, पोलिसांनीच घरात घुसताच थेट गोळी चालवली, असा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला.

पोलिसांनी चार गोळ्या चालवल्याचा दावा त्याच्या पत्नीने केला. तर माझा मुलगा किरकोळ गुन्हेगार होता, इन्काउंटर करण्या इतका कुख्यात गुंड नव्हता. त्याच्यावर काही गुन्हे दाखल होते पण बांबूने मारहाण झालेल्या प्रकरणात त्याच्यावर खोटा मोक्का लावण्यात आला आहे. तो व्यवस्थित कामाला लागला होता मात्र पोलिसांनी त्याला आरोपी केलाय, पुण्याच्या काळेपडळ पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कुख्यात गुंड शाहरुख उर्फ अट्टी शेख याच्या वडिलांनी केली आहे.

राणे बंधूंच्या लढाईत निलेश राणेंची सरशी; मालवण, कणकवलीत भाजपला धक्का
राणे बंधूंच्या लढाईत निलेश राणेंची सरशी; मालवण, कणकवलीत भाजपला धक्का.
उपऱ्यांचा प्रवेश, नाराज निष्ठावंत BJP समर्थकांचं आंदोलन, भाजपमध्ये वाद
उपऱ्यांचा प्रवेश, नाराज निष्ठावंत BJP समर्थकांचं आंदोलन, भाजपमध्ये वाद.
सून जिंकली, सासू रुसली! राजकीय घराणं अन् नेत्यांच्या गणगोताचा निकाल
सून जिंकली, सासू रुसली! राजकीय घराणं अन् नेत्यांच्या गणगोताचा निकाल.
कुठं कोणाचा सुपडासाफ? कोण कुणाला नडलं? कुठं कोण कुणाशी भिडलं?
कुठं कोणाचा सुपडासाफ? कोण कुणाला नडलं? कुठं कोण कुणाशी भिडलं?.
नगरपालिकेतही देवाभाऊंचा करिष्मा, महायुती 200 पार अन् भाजप सर्वात पक्ष
नगरपालिकेतही देवाभाऊंचा करिष्मा, महायुती 200 पार अन् भाजप सर्वात पक्ष.
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.