AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mahapalika Election : महापालिका निवडणुकीपूर्वी राजकीय जोर बैठका; मुंबई, नागपूरमध्ये मोठ्या घडामोडी, सर्वच पक्षांना लगीनघाई

Maharashatra Politics : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजत आहे. महापालिका निवडणुकीपूर्वची राजकीय जोर बैठका सुरू आहेत. मुंबईसह नागपूरमध्ये आज मोठ्या घाडमोडी घडत आहेत. महाविकास आघाडी आणि महायुती दोघांनी कंबर कसली आहे.

Mahapalika Election : महापालिका निवडणुकीपूर्वी राजकीय जोर बैठका; मुंबई, नागपूरमध्ये मोठ्या घडामोडी, सर्वच पक्षांना लगीनघाई
महापालिका निवडणुकीसाठी राजकीय जोर बैठकाImage Credit source: गुगल
| Updated on: Jun 15, 2025 | 10:17 AM
Share

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वीच राज्यातील सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. महापालिका, नगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजले आहेत. तर दुसरीकडे जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या निवडणुकीची पण काही महिन्यात चाचपणी सुरू होईल. या सर्व दृष्टीने राज्यातील पक्ष राजकीय जमीन कसून घेत आहे. मुंबई महापालिकेसाठी खरी रस्सीखेच आहे. भाजपाला येथे झेंडा फडकवायचा आहे. आज मुंबईत ठाकरे गट आणि राष्ट्रवादी तर नागपूरमध्ये भाजप-संघाची बैठक होत आहेत. आगामी पालिका निवडणुकीसाठीच ही कसरत सुरू असल्याचे समोर येत आहे.

शाखा प्रमुखांची बैठक

आज उद्धव ठाकरे शिवसेनेच्या शाखा प्रमुखांची सेना भवनात बैठक होत आहे. महाविकास आघाडी म्हणून पालिका निवडणुका एकत्रितपणे लढवायच्या की नाहीत हे अजून निश्चित झालेले नाही. ठाकरे सेना मुंबई महापालिकेसाठी जय्यत तयारीला लागलेली आहे. त्याच दृष्टीने शाखा प्रमुखांची बैठक होत आहे. मनसेसोबतचे मनोमिलन होणार की नाही याचे पत्ते अजूनही उलगडलेले नाही. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक घेतल्याने दोन्ही ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांना तुर्तास खोडा बसला आहे. त्यामुळे सकारात्मक चर्चांना आता काही अर्थ उरला आहे का? असा सवाल विचारण्यात येत आहे. त्यातच ठाकरे गटाने पक्षाचे बळ वाढवण्यासाठी बैठकींची कसरत सुरू केली आहे.

पवारांच्या राष्ट्रवादीचे आज संकल्प शिबिर

दुसरीकडे घाटकोपर येथील पंतनगरात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे संकल्प शिबिर होत आहे. शरद पवार यांनी भाजपासोबत युती न करण्याचे धोरण पुन्हा अधोरेखित केले आहे. त्यामुळे दादा गट आणि थोरल्या पवारांचा गट एकत्र येण्याची सध्यातरी सुतराम शक्यता नाही. दोन्ही गट सध्या साखर कारखाना निवडणुकीत मशगूल आहेत. त्यातच शरद पवारांच्या राष्ट्रवादीने मुंबई महापालिकेसाठी कंबर कसल्याचे दिसते. भाजपासोडून इतर पक्षांशी युती करण्यास या पक्षाची कोणतीही हरकत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आज संकल्प शिबिरातून कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांना कोणता संकल्प देण्यात येतो हे लवकरच समोर येईल.

भाजप-संघाची आज समन्वय बैठक

तर दुसरीकडे पालिका निवडणुकीसह इतर मुद्यांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपा यांच्यात अत्यंत महत्त्वाची समन्वय बैठक आज होत आहे. नागपूरमध्ये रेशीमबाग येथील कार्यालयात ही बैठक होईल. या बैठकीत संघाच्या सर्व 32 संघटनांचे प्रतिनिधी हजर असतील. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपाचे महत्त्वाचे नेते बैठकीला उपस्थित असतील. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपाचा झंझावात आणण्यासाठी ही बैठक महत्त्वाची मानण्यात येत आहे. आता तळागाळात शतप्रतिशत भाजपा पोहचवण्याचे मिशन समोर असल्याचे दिसून येते.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.