Sindhu River : सिंधू आली हो अंगणी! मोदी सरकारचा पाकिस्तानला मास्टरस्ट्रोक, सुखावणार या राज्यातील शेतकरी
Sindhu River Water : पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानसोबतचा सिंधू नदी जल करार रद्द केला. त्यानंतर इतके पाणी वळवणार तरी कसे आणि कोठे असा सवाल दोन्ही देशात चर्चेत आला. आता मोदी सरकारने मास्टरस्ट्रोक हाणला आहे.

Sindhu River Water come Rajasthan : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतच्या सिंधू नदी पाणी वाटप करार (Indus Water Treaty Suspended) रद्द केला. पाकिस्तानचा त्यामुळे जळफळाट झाला. मोदी सरकारने पश्चिम वाहिनी नद्यांचे (झेलम-चिनाब-सिंधू) पाणी सुद्धा अडवले. पाकिस्तानची जलकोंडी करण्यात आली. भारताला या नद्यांचे पाणी अडवणे शक्य नाही. इतके मोठे धरण लवकर बांधणे शक्य नाही अशा चर्चा दोन्ही देशात रंगल्या. मोदी सरकारने पाकिस्तानला एका निर्णयातून मास्टरस्ट्रोक दिला आहे. काय आहे तो निर्णय ज्यामुळे पाकिस्तानला मिरच्या झोंबल्या आहेत.
राजस्थान होणार हिरवेगार
राजस्थानमध्ये वाळवंट सातत्याने अधिक्रमण करत आहे. वाढत्या वाळवंटाला थांबवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रयत्नातून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात येत आहे. आता सिंधू आणि चिनाब नदीचे पाणी राजस्थानमध्ये आणण्यात येणार आहे. येथील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देण्यात येईल. राजस्थान हिरवेगार होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याविषयीची घोषणा केली. जलशक्ती मंत्रालयाने पण त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, चिनाब, व्यास आणि सतलज जोडणी कालव्याच्या माध्यमातून हे पाणी राजस्थानकडे वळवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यासाठीची योजना लवकरच तयार होईल.
तीन वर्षांत पाणी राजस्थानमध्ये खेळेल
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मध्यप्रदेशमधील पंचवटीमध्ये शनिवारी भाजपाच्या तीन दिवसीय प्रशिक्षण वर्गाला भेट दिली. पहिल्या दिवशी खासदार आणि आमदारांना त्यांनी मार्गदर्शन केले. तीन वर्षात सिंधू नदीचे पाणी कालव्याच्या माध्यमातून राजस्थानच्या श्रीगंगानगरपर्यंत आणण्यात येणार आहे. त्यामुळे राजस्थानचा मोठा भूभाग सिंचनाखाली येईल. येथील शेतकर्यांना पाणी संकटाचा सामना करावा लागणार नाही. तर दुसरीकडे पाकिस्तानला मोठा फटका बसेल.
200 किलोमीटर लांब कालवा, 12 कालव्यांचे जाळे
प्राथमिक माहितीनुसार, या योजनेअंतर्गत 200 किलोमीटर लांब कालवा आणि 12 जोडणी कालवे तयार करण्यात येतील. त्यामधून पश्चिम वाहिनी नद्यातील पाणी राजस्थानमध्ये खेळवण्यात येईल. विशेष म्हणजे कोणत्याही प्रशासकीय अडचणी येऊ नये यासाठी सिंधू नदी खोऱ्यातील सर्वच नद्यांच्या पाण्याविषयीच्या योजनांना झटपट मंजूरी देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.
