AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या गावात मृत्यूचे तांडव, बंदुकधारी आले, बंदुका ताणल्या नि… क्रूरतेचा कळस, जग हादरले

Nigeria Yelewata Massacre : अफ्रिकेतील नायजेरीया या देशात हिंसेचा आगडोंब उसळला. मानवतेला काळिमा फासणाऱ्या या घटनेने संपूर्ण जग हादरले आहे. नायजेरिया सरकारवर याप्रकरणी टीका होत आहे. बेनुए राज्यात घडलेल्या या घटनेने सरकारला मोठा धक्का बसला आहे.

या गावात मृत्यूचे तांडव, बंदुकधारी आले, बंदुका ताणल्या नि... क्रूरतेचा कळस, जग हादरले
या गावात मृत्यूचे तांडवImage Credit source: गुगल
| Updated on: Jun 15, 2025 | 8:38 AM
Share

Nigeria Benue Massacre: नायजेरियात जातीय आणि धार्मिक हिंसाचाराने पुन्हा एकदा डोके वर काढले. येथे हकनाक 100 गावकऱ्यांना त्यांचे प्राण गमवावे लागले. शुक्रवारी मध्यरात्री ते शनिवारी पहाटेपर्यंत येलेवाटा या गावात मृत्यूचे तांडव सुरू होते. बंदुकधाऱ्यांनी गावकऱ्यांना घराबाहेर काढून त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. इतकेच नाही तर जे लोक घरात लपले होते. त्यांची घर जाळण्यात आली. त्यात होरपळून अनेक गावकऱ्यांचा मृत्यू झाला. या हत्याकांडानंतर नायजेरिया सरकारवर चोहोबाजूने टीकेची झोड उठली आहे. ॲमनेस्टी इंटरनॅशनल नायजेरियाने शनिवारी 14 जून रोजी भल्या पहाटे घडलेल्या या घटनेची माहिती दिली आहे.

मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

ॲमनेस्टी इंटरनॅशनल नायजेरियाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर या घटनेची माहिती दिली. त्यांच्या मते अजून अनेक लोक बेपत्ता आहेत. तर अनेक जण या घटनेत गंभीर जखमी आहेत. त्यांना सरकारकडून साध्या उपचाराची सोय सुद्धा करण्यात आली नाही. पुरुषांना बाहेर काढून गोळ्या घालण्यात आल्या. तर त्यांच्या कुटुंबांना बेडरूममध्ये बंद करून जाळण्यात आले. या घटनेवर जागतिक नेत्यांनी दुख व्यक्त केले आहे.

बेनुए राज्यात हिंसाचार

नायजेरियातील बेनुए राज्यात हिंसेचे लोण पसरले आहे. ॲमनेस्टी इंटरनॅशनल नायजेरियाच्या मते, गेल्या काही दिवसात हिंसक घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. बंदुकधारी गावा गावात जाऊन अंदाधुंद गोळीबार करत आहेत. ते एकमेकांना ठार करत आहेत. नायजेरिया सरकार कुठलीच कायदेशीर कारवाई करत नसल्याने या हल्लेखोरांचा अतिरेक वाढला आहे. सतत हल्ले होत असल्याने अनेक गावातून लोकांनी पलायन केले आहे. या हल्ल्यात सर्वाधिक शेतकरी मारल्या जात आहेत.

जमिनीवर डोळा, धार्मिक, जातीयतेचा मुलामा

बेनुए हे राज्य नायजेरियाच्या मध्यवर्ती भागात आहे. येथील जमिनीवर भूमाफियांचा डोळा आहे. बेनुए राज्य हे उत्तरेतील मुस्लिम आणि दक्षिणतेली ख्रिश्चन यांचे संगम स्थळ मानण्यात येते. गुरूढोरं चारणारे आणि स्थानिक शेतकरी यांच्यात जमिनीवरून मोठा वाद आहे. यामध्ये जातीय आणि धार्मिक मुलामा देऊन गावकऱ्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक गावातील शेतकरी हे शहराकडे पलायन करत आहेत. त्यांच्या जमिनी कवडीमोल दराने विक्री करत आहेत. यापूर्वी झालेल्या हिंसाचारात 500 जणांना प्राण गमवावे लागले. आतापर्यंत 2.2 दशलक्ष लोकांनी हा भाग सोडल्याचा दावा करण्यात येत आहे. हे सध्याच्या काळात, रोहिंग्यापेक्षा सर्वात मोठे स्थलांतर असल्याचे सांगण्यात येते.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?