
Gold And Silver Investment : गेल्या अनेक दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावामध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहे. दिवाळीआधी सोन्याचा भाव चांगलाच वाढला होता. नंतर मात्र तो हळूहळू कमी होत गेला. आता पुन्हा एकदा या दोन्ही मौल्यवान धातूंचा भाव चांगलाच वाढलेला आहे. या दोन्ही धातूंनी वर्षभरात कमालच केली आहे. 2025 साली सोन्याची किंमत साधारण 73-75 टक्क्यांन वाढलेली आहे. 1 जानेवारी 2025 रोजी सोन्याचा भाव 78000 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. आता हाच भाव डिसेंबर महिन्यात 1,37,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचला आहे. गेल्या 46 वर्षांत सोन्याचा भाव पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. त्यामुळेच आता सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करावी की नाही? असा प्रश्न गुंतवणूकदारांना पडलेला आहे.
एमसीएक्सवर सोन्याचा भाव 135590 रुपये प्रति 10 ग्रॅम हा सार्वकालिक उच्चांग गाठून आलेला आहे. एमसीएक्सवर शुक्रवारी सोन्याचा भाव 1,34,200 रुपयांवर होता. सोने हा अजूनही सुरक्षित गुंतवणूक म्हणून लोकांची पसंद कायम आहे. ऑक्टोबर 2023 पासून सोन्याचा भाव साधारण 139 टक्क्यांनी वाढला आहे.
एका वर्षात सोने आणि चांदीने भरपूर रिटर्न्स दिलेले आहेत. त्यामुळेच आगामी वर्ष म्हणजेच 2026 सालीही हा भाव असाच वाढत राहणार का? असे विचारले जात आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार पुढच्या वर्षीदेखील सोन्याचा भाव असाच वाढू शकतो. मेहता इक्विटिज लिमिटेडचे व्हीपी कमोडिटीज राहुल कलांत्री यांनी सांगितल्यानुसार सध्या जागतिक पातळीवर मोठ्या घडामोडी घडत आहेत. असे असतानाही गेल्या आठवड्यात हे दोन्ही धातू सार्वकालिक उच्च्कांवर पोहोचले होते. अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने रेपो रेटमध्ये कपात केल्यामुळे चांदीच्या दरात मोठी वाढ झाली होती. चांदीच्या भावात या वर्षी साधारण 100 टक्क्यांनी वाढ झालेली आहे.
दरम्यान, या वर्षी सोन्याचा भाव वाढत असला तरीही गुंतवणूकदारांनी एक धोरण ठरवले पाहिजे. दीर्घकालीन गुंतवणूक करणाऱ्यांसाठी सोन्याच्या भावातील घसरण ही गुंतवणुकीची चांगली संधी असू शकते.
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)