
काल, म्हणजेच 22 जानेवारी रोजी सोन्याच्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण पहायला मिळाली होती, त्यामुळे अनेकांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र हाँ आनंद फार काळ टिकलेला नाही. कारण आज, (23 जानेवारी 2026) रिकव्हरी मोड पुन्हा सुरू आहे. काल सोने आणि चांदीच्या किमतीत झालेली घसरण पाहून गुंतवणूकदारांना काळजी वाटू लागली होती की चांदी पुन्हा 3 लाख रुपयांच्या खाली येईल. पण आज केवळ चांदीच नाही तर सोन्याच्या किमतीतही मोठी वाढ होत आहे, जी आतापर्यंतची उच्चांकी पातळी गाठताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात आज COMEX वर सोन्याचा दर प्रति औंस 4 हजार 964 डॉलर पोहोचला आणि चांदीचा दर प्रति औंस 96.506 उतक्या रेट वर पोहोचला.
भारतात आज सोन्याचा दर किती ?
गुरुवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया (MCX) मध्ये दिवसभर सोने आणि चांदीच्या किमतीत लक्षणीय घट झाली, परंतु बाजार बंद होईपर्यंत ती सुधारली. त्यानंतर चांदीची किंमत प्रति किलो 3,26,500 रुपये झाली तर सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम 1,56,540 रुपये इतकी झाली होती. झाली.
पुन्हा का वाढले भाव ?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँडवर कब्जा करण्याचा निर्णय मागे घेतला आणि युरोपीय देशांवर टॅरिफ लादण्यापासूनही माघार घेतली, ज्यामुळे सोने आणि चांदीच्या किमतीत लक्षणीय घट झाली, मात्र ती एका दिवसासाठीच होती. पण आता, अमेरिकेतील उपभोक्ता खर्च आणि रोजगार बाजारातील मजबूत आकडेवारीचा डॉलरवर परिणाम झाला आहे. परिणामी, सोने आणि चांदीच्या किमती पुन्हा एकदा विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या आहेत. फेडरल रिझर्व्ह अजूनही दबावाखाली आहे, भू-राजकीय तणाव संपलेला नाही आणि अमेरिकन डॉलर कमकुवत होत आहे, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत.
रॉबर्ट कियोसाकीचे नवे भाकित
एकीकडे सोनं आणि चांदीच्या किमतींमध्ये तीव्र चढउतार होत असताना, गुंतवणूकदार आणि रिच डॅड पुअर डॅड या पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी चांदीच्या किमतींबाबत एक नवीन भाकित केले आहे. 2026 पर्यंत चांदीची किंमत प्रति औंस 200 डॉलरपर्यंत पोहोचेल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या विधानानंतर, गुंतवणूकदारांनी चांदी खरेदी करण्यास सुरुवात केली, ज्यामुळे व्यापार आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोने आणि चांदीच्या किमती वाढल्या.
(सोनं किंवा चांदी खरेदी करण्यापूर्वी सध्याच्या किमती तपासणे महत्त्वाचे आहे. शहरानुसार किंमती बदलू शकतात. म्हणून, तुमच्या शहरातील दागिन्यांच्या दुकानात जाऊन तुम्ही लेटेस्ट दर जाणून घेऊ शकता. )