AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

U19 World Cup: फक्त 58 धावांवर खेळ आटोपला, श्रीलंकेचे 45 चेंडूत 5 विकेट काढले

अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया हे संघ आमनेसामने आले होते. हा सामना ऑस्ट्रेलियाने सहज जिंकला. कारण मिळालेलं टार्गेट काहीच नव्हतं. त्याला कारण ठरला ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज...

U19 World Cup: फक्त 58 धावांवर खेळ आटोपला, श्रीलंकेचे 45 चेंडूत 5 विकेट काढले
फक्त 58 धावांवर खेळ आटोपला, श्रीलंकेचे 45 चेंडूत 5 विकेट काढलेImage Credit source: Getty Images
| Updated on: Jan 23, 2026 | 4:52 PM
Share

अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या 23व्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात श्रीलंकेची वाट लागली. नाणेफेकीचा कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. हा निर्णय सर्वच बाजूने योग्य ठरला. कारण श्रीलंकेने फलंदाजी करतानाच नांगी टाकली होती. श्रीलंकेचा संपूर्ण संघ 18.5 षटकात 58 धावांवर बाद झाला. या सामन्यात श्रीलंकेचे 8 खेळाडू एकेरी धावांवर राहिले. तर एका खेळाडूला खातंही खोलता आलं नाही. कविजा गामजेने 10 आणि चमिका हीनातिगाला याने 14 धावा केल्या. म्हणजेच एकाही खेळाडूला 20 धावांचा आकडा गाठता आला नाही. हे आव्हान ऑस्ट्रेलियाने सहज गाठलं. यासाठी फक्त एक विकेट गमवावी लागली. ऑस्ट्रेलियाने 12 षटकात 1 गडी गमवून दिलेलं आव्हान गाठलं.

एक गोलंदाज पडला भारी

नामिबियाच्या विंडहोकमध्ये 23 जानेवारीला हा सामना खेळला गेला. या सामन्यात श्रीलंकेची सुरूवात संथ गतीने आणि विकेटने झाली. या डावाच्या तिसऱ्या षटकापासून श्रीलंकेला धक्के मिळण्यास सुरुवात झाली. संघाची धावसंख्या 3 असताना दोन विकेट पडल्या. दोन्ही विकेट चार्ल्स लॅछमंडने घेतल्या. त्यानंतर विल बायरॉम आला आणि त्याने श्रीलंकन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवण्यास सुरुवात केली. त्याच्या भेदक माऱ्यापुढे श्रीलंकेचा संघ अवघ्या 58 धावांवर बाद झाला. विल बायरॉमने 6.5 षटकं म्हमजे 41 चेंडू टाकले. यात त्याने श्रीलंकेचा निम्मा संघ तंबूत पाठवला. त्याने 6.5 षटकात फक्त 14 धावा दिल्या आणि पाच विकेट काढल्या.

ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेने दिलेलं आव्हान सहज गाठलं. पहिल्या षटकात विल मलाजुकची विकेट तेवढी श्रीलंकेला मिलाली. त्याने मागच्या सामन्यात सर्वात वेगवान शतक ठोकलं होतं. मात्र त्यानंतर एकही विकेट हाती लागली नाही. उलट लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं. ऑस्ट्रेलियाने 62 धावा केल्या आणि 9 विकेट राखून हा सामना जिंकला. श्रीलंकेचा कर्णधार विमथ दिनसारा म्हणाला की, निराश आहोत. त्यांनी खरोखरच चांगली गोलंदाजी केली पण आज आपला दिवस नव्हता. पुढच्या फेरीसाठी पात्र ठरल्याबद्दल खूप आनंद झाला. प्रत्येक सामन्यावर लक्ष केंद्रित करू आणि आमचे सर्वोत्तम प्रयत्न करू.

हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने...
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने....
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.