AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Price Today : सोने झाले महाग, चांदीचे दरही वाढले; पटापट तपासा

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत 1,759 डॉलर प्रति औंस होती आणि चांदी 22.58 डॉलर प्रति औंसवर स्थिर राहिली. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, कॉमेक्सवरील सोन्याचे भाव स्पॉट सोन्याच्या किमतींसह कमकुवत व्यापार करत आहेत.

Gold Silver Price Today : सोने झाले महाग, चांदीचे दरही वाढले; पटापट तपासा
संग्रहित छायाचित्र.
| Edited By: Vaibhav Desai | Updated on: Oct 05, 2021 | 5:21 PM
Share

नवी दिल्लीः राष्ट्रीय राजधानी दिल्लीत मंगळवारी सोन्याचा भाव 269 रुपयांनी वाढून 45,766 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते, रुपयाची घसरण हे त्याचे मुख्य कारण आहे. मागील व्यापारात सोन्याची किंमत 45,497 रुपये प्रति 10 ग्रॅम होती. चांदी 630 रुपयांनी वाढून 59,704 रुपये प्रति किलो झाली. मागील व्यापारात ती 59,074 रुपये प्रति किलो होती. मंगळवारच्या सुरुवातीच्या व्यवहारात भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 32 पैशांनी घसरून 74.63 वर आला.

आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत 1,759 डॉलर प्रति औंस होती आणि चांदी 22.58 डॉलर प्रति औंसवर स्थिर राहिली. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, कॉमेक्सवरील सोन्याचे भाव स्पॉट सोन्याच्या किमतींसह कमकुवत व्यापार करत आहेत. ते म्हणाले की, सोन्याचे भाव मंगळवारी अर्ध्या टक्क्याने घसरून 1,759 डॉलर प्रति औंस झाले. पटेल पुढे म्हणाले की, मजबूत डॉलरमुळे दिवसा सोन्याचे भाव स्थिर राहिले.

भारतात सोने विनिमय होणार

भारताची वार्षिक सोन्याची मागणी 800-900 टन आहे. हा एक मोठा आयातदार आहे, परंतु किंमतीच्या आधारावर कोणतेही मोठे लिक्विड स्पॉट मार्केट नाही. भारतीय सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्डाने (सेबी) गोल्ड एक्स्चेंजसाठी प्रस्ताव तयार केला आहे. गुंतवणूकदार इलेक्ट्रॉनिक गोल्ड पावत्या (ईजीआर) मध्ये व्यापार करू शकतात, जे विद्यमान स्टॉक एक्सचेंजमध्ये भौतिक सोन्याच्या बदल्यात जारी केले जाईल. यासह, ते सेबीच्या चौकटीनुसार प्रस्तावित गोल्ड एक्सचेंजमध्ये देखील जारी केले जातील.

सोन्याची किंमत 57 हजार ते 60 हजार रुपयांपर्यंत जाणार

दिवाळी ते डिसेंबर पर्यंत सोन्याची किंमत 57 हजार ते 60 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते. म्हणजेच आता जे भाव चालू आहेत ते 14 हजार प्रति 10 ग्रॅम पर्यंत वाढू शकतात. जोपर्यंत चांदीचा प्रश्न आहे, त्यातही मोठी वाढ होऊ शकते. बहुतेक व्यापाऱ्यांचा असा विश्वास आहे की दिवाळीपर्यंत किंवा वर्षाच्या अखेरीपर्यंत चांदीचे दर 76,000 ते 82,000 रुपये प्रति किलो पर्यंत जाऊ शकतात.

संबंधित बातम्या

भारताचे नवे सोने विनिमय कसे कार्य करेल? तुम्ही अशा प्रकारे ट्रेडिंग करू शकता

तुमचे आधार कार्ड चोरीला गेले किंवा हरवलेय का? तुम्ही घर बसल्या असा अर्ज करा

Gold Silver Price Today: Gold became more expensive, silver also rose; Check it out

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!