Gold Silver Price Today: सोन्याचे भाव 4 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर, पटापट तपासा नवी किंमत

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर ऑक्टोबर वायदा सोन्याची किंमत (Gold Price) 0.20 टक्क्यांनी वाढली. चांदी सोन्यासारखी वाढलीय. सप्टेंबर फ्युचर्समध्ये चांदीचे भाव 0.37 टक्क्यांनी वाढले.

Gold Silver Price Today: सोन्याचे भाव 4 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर, पटापट तपासा नवी किंमत
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्लीः Gold Silver Price Today: भारतीय बाजारात बुधवारी सोने आणि चांदीचे भाव (Gold Silver Price) वाढलेत, परंतु स्थिर जागतिक किमतींमुळे ते तितके वाढले नाहीत. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर ऑक्टोबर वायदा सोन्याची किंमत (Gold Price) 0.20 टक्क्यांनी वाढली. चांदी सोन्यासारखी वाढलीय. सप्टेंबर फ्युचर्समध्ये चांदीचे भाव 0.37 टक्क्यांनी वाढले.

मागील सत्रात सोने स्थिर किमतीवर बंद

प्रति 10 ग्रॅम 45,600 रुपयांच्या 4 महिन्यांच्या नीचांकावर घसरल्यानंतर सोन्याच्या किमतीत सुधारणा झालीय, परंतु मौल्यवान धातू अद्यापही गेल्या वर्षीच्या 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या विक्रमी उच्चांकापासून 9,000 रुपयांनी कमी झाली. मागील सत्रात सोने स्थिर किमतीवर बंद झाले होते, तर चांदी 0.5 टक्क्यांनी कमी झाली होती.

सोने आणि चांदीची नवी किंमत (Gold/Silver Price on 18 August 2021)

बुधवारी एमसीएक्सवरील ऑक्टोबर वायदा सोने 94 रुपयांनी वाढून 47,374 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. त्याचबरोबर सप्टेंबर फ्युचर्स चांदीचा भाव 236 रुपयांनी वाढून 63,462 रुपये प्रति किलो झाला. मंगळवारी जागतिक बाजारात पुनर्प्राप्तीचा परिणाम देशांतर्गत बाजारावरही दिसून आला. यामुळे मंगळवारी सोने 446 रुपयांनी आणि चांदी 888 रुपयांनी वाढली. दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा बंद भाव 46,460 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि चांदीचा भाव 62,452 रुपये प्रति किलो होता.

आज जागतिक बाजारात सोन्याचे भाव वाढलेत

कोरोना विषाणूच्या डेल्टा प्रकारांमध्ये वाढ झाल्यामुळे आर्थिक घसरणीच्या वाढत्या चिंतेमुळे आज जागतिक बाजारात सोन्याचे भाव वाढलेत, परंतु डॉलरच्या मजबुतीमुळे त्याचा फायदा कमी झाला. मागील सत्रात युरोच्या तुलनेत नऊ महिन्यांचा उच्चांक गाठल्यानंतर डॉलर इतर प्रमुख चलनांच्या तुलनेत जास्त राहिला.

सोन्यात मोठी घसरण होण्याचा अंदाज

सोन्याच्या गुंतवणूकदारांना यूबीएस ग्रुपने इशारा दिलाय. ते म्हणतात की, कोरोनानंतर आर्थिक सुधारणेला गती मिळत आहे. यूएस जॉब मार्केट डेटा अपेक्षेपेक्षा चांगला बाहेर आलाय. अशा परिस्थितीत फेडरल रिझर्व्ह वेळापूर्वी व्याज वाढवण्याचा निर्णय घेऊ शकते. यूबीएस समूहाच्या कमोडिटी मार्केट तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर तुम्ही रणनीतिक स्थितीत असाल तर या गुंतवणुकीतून बाहेर पडा. जर तुम्ही रणनीतिकदृष्ट्या गुंतवणूक केली असेल तर हेजिंग करा. यूबीएस समूहाचा अंदाज आहे की, आंतरराष्ट्रीय बाजारात सोने 1600 डॉलर आणि चांदी 22 डॉलरच्या पातळीवर येऊ शकते. याउलट गोल्डमन सॅक्स म्हणतो की, सोने पुन्हा 2000 डॉलरच्या पातळीवर पोहोचेल.

संबंधित बातम्या

आतापर्यंत 30 लाख खासगी नोकरदारांकडून ‘या’ सरकारी पेन्शन योजनेचा लाभ, 500 रुपयांपासून करा सुरुवात

LPG cylinder price: तुमचा खिसा आणखी रिकामा होणार, LPG सिलिंडर इतक्या रुपयांनी महागला

Gold Silver Price Today: Gold prices hit a 4-month low, check the new price

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI