Gold-Silver Price Today : दरवाढीच्या घोडदौडीला थोडीशी लगाम, सोने-चांदीचे आजचे दर काय?

सोने-चांदी दराच्या वाढत्या घोडदौडीला थोडी लगाम लागली आहे. एका दिवसाच्या तेजीनंतर बुधवारी सराफा बाजारात काहीशी घरसण पाहायला मिळाली.

Gold-Silver Price Today : दरवाढीच्या घोडदौडीला थोडीशी लगाम, सोने-चांदीचे आजचे दर काय?
GOLD silver rate today
Follow us
| Updated on: Apr 07, 2021 | 11:24 AM

Gold-Silver Price Today मुंबई : सोने-चांदी दराच्या वाढत्या घोडदौडीला थोडी लगाम लागली आहे. एका दिवसाच्या तेजीनंतर बुधवारी सराफा बाजारात काहीशी घरसण पाहायला मिळाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोनेदरात (Gold Price) 0.25 टक्क्यांची कपात झाली. चांदीची किंमत 0.23 टक्क्यांनी घसरली. गेल्यावर्षी ऑगस्य महिन्यात सोन्याचा तोळ्याचा भावा तब्बल 56 हजार 200 रुपये होता. त्यामध्ये आतापर्यंत म्हणजेच एप्रिल 2021 पर्यंत जवळपास 11 हजारांची घट झाली आहे. त्यामुळे MCX नुसार सोन्याच्या आजच्या दरात 115 रुपयांची घट होऊन तोळ्याचा भाव 45,804 रुपयांवर पोहोचला आहे. (Gold-Silver Price Today 07th april 2021 MCX commodity market)

इकडे महाराष्ट्रातील प्रसिद्ध जळगावातील सराफा बाजारात आजचा सोन्याचा भाव 47 हजारांवर पोहोचला आहे. MCX वर सोन्याचा भावात घसरण झाली असली तरी प्रत्यक्ष सराफाजवळ तुम्हाला सोने 47 हजारांच्या आसपास मिळू शकतं. दुसरीकडे जळगावातील चांदीचा किलोचा भाव 67,440 वर पोहोचला आहे.

सोने दर (Gold Price)

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर बुधवारी जून वायदा सोनेदरात 115 रुपयांची घट झाली. त्यामुळे 10 ग्रॅम सोन्याचा भाव 45,804 रुपयांपर्यंत पोहोचला. मागील व्यावसायिक सत्रात 1.25 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली होती. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत फारसा फरक पडला नाही.

चांदीचे दर (Silver Price)

आज MCX वर मे वायदेनुसार चांदीचा भाव 149 रुपयांनी घसरला. त्यामुळे प्रतिकिलो चांदीचा भाव 65,748 रुपयांवर पोहोचला. मागील ट्रेडिंग सत्रात चांदीदरात 2 टक्क्यांनी म्हणजेच तब्बल 1300 रुपयांची वाढ झाली होती.

कोरोना महामारीच्या चिंतेने सोनेदरात उसळी

देश पुन्हा एकदा कोरोनाचा कहर झेलत आहे, त्यामुळे वर्षाच्या अखेरीस सोन्याची किंमत 48 हजार रुपयांपर्यंत पोहोचू शकते. मार्चच्या सुरुवातीस सोने 44 हजारांपर्यंत खाली आले होते, परंतु आता पुन्हा किमती वाढल्यात.

वर्षाअखेरीस सोने 50 हजारांपर्यंत पोहोचू शकते

केडिया अ‍ॅडव्हायझरीचे संचालक अजय केडिया यांच्या म्हणण्यानुसार, यंदा जूनपर्यंत सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 47 हजार रुपयांपर्यंत पोहोचू शकेल. या वर्षाच्या अखेरीस सोने 48 ते 50 हजारांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. परंतु कोरोना प्रकरणात मोठी वाढ झालीय, तर येत्या काही दिवसांत सोन्याच्या किमतीत वाढ होऊ शकते.

संबंधित बातम्या 

Gold Rate Today: कोरोना महामारीमुळे सोने पुन्हा महागले, पटापट तपासा 10 ग्रॅम सोन्याचा भाव

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.