AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today : मोठी अपडेट! सोने-चांदीचे भाव पुन्हा उतरले

Gold Silver Rate Today : जागतिक बाजारात अनेक घटना घडत असतानाही सोने-चांदीने माघार घेतली आहे. जागतिक बाजारात कच्चा तेलाचे भाव गेल्या सहा महिन्यातील निच्चांकावर पोहचले आहे. महागाईच्या आघाडीवर अमेरिकेने उपाय योजना सुरु केल्या आहेत. त्याचा परिणाम जागतिक बाजारात दिसून येत आहे. सलग तिसऱ्या दिवशी सोने-चांदीत नरमाई आहे.

Gold Silver Rate Today : मोठी अपडेट! सोने-चांदीचे भाव पुन्हा उतरले
| Updated on: Dec 14, 2023 | 8:34 AM
Share

नवी दिल्ली | 14 डिसेंबर 2023 : सोने-चांदीने पुन्हा एकदा आनंदवार्ता दिली आहे. वर्षाच्या सरत्या महिन्यात मौल्यवान धातूंनी ग्राहकांना मोठा दिलासा दिला. गेल्या आठवड्यापासून विचार करता, सोन्यात जवळपास 3000 रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदीने पण माघार घेतली आहे. त्यामुळे ग्राहकांचा जीव भांड्यात पडला आहे. दिवाळीपासून दोन्ही धातूच्या किंमती सूसाट होत्या. सोन्याने 65 हजारांच्या टप्पा ओलांडला तर चांदी 78 हजारांच्या घरात पोहचली होती. लग्नसराईत भाव एकदम वाढल्याने चिंता वाढली होती. भाव कमी झाल्याने ग्राहकांना खरेदीची सुवर्णसंधी मिळाली आहे. असा आहे सोने-चांदीचा भाव (Gold Silver Price Today 14 December 2023)

सोन्याच्या किंमतीत घसरण

या आठवड्यात सोने 550 रुपयांनी स्वस्त झाले. गेल्या आठवड्यात मोठी घसरण दिसून आली. सोमवारी, 11 आणि 12 डिसेंबर रोजी सोन्याच्या किंमती प्रत्येकी 220 रुपयांनी घसरल्या. बुधवारी 13 डिसेंबर रोजी किंमती 100 रुपयांनी उतरल्या. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 56,800 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 61,950 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीत मोठी घसरण

या आठवड्यात चांदी एक हजार रुपयांनी स्वस्त झाली. गेल्या आठवड्यात चांदीत जवळपास 3500 रुपयांची घसरण झाली होती. या आठवड्यात 11 डिसेंबर रोजी भाव 200 रुपयांनी कमी झाले. मंगळवारी किंमतीत 100 रुपयांची घसरण झाली. 13 डिसेंबर रोजी भाव 700 रुपयांनी उतरले. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 75,000 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 61,201 रुपये, 23 कॅरेट 60,956 रुपये, 22 कॅरेट सोने 56,060 रुपये झाले. 18 कॅरेट 45,901 रुपये, 14 कॅरेट सोने 35,803 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 70,898 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

किंमती मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

Follow Us
भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष
बदलापूर वृक्ष प्राधिकरण नियुक्तीवरून भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष
देवेंद्र फडणवीसांची धर्मेंद्र प्रधान यांच्याशी भेट; म्हणाले,‘माझे बंधू
फडणवीस-प्रधान भेट: माझे बंधू म्हणत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
बदलापुरात सीलबंद पाण्याच्या नावाखाली दूषित पाण्याची विक्री?
बदलापूरमध्ये सीलबंद पाण्याच्या नावाखाली अशुद्ध पाण्याची विक्री
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळला; कंत्राटदारांवर 12 कोटींचा दंड
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रो स्लॅब कोसळला, आदित्य ठाकरेंची कठोर कारवाईची मागणी
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या'...
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' निर्णयाने... फुटीर 6 खासदारांबाबत नवी अपडेट समोर
नवनाथ वाघमारेंचं वादग्रस्त वक्तव्य, नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्याचा निषेध, मराठा नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या...
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या बड्या नेत्यासह एकाच मंचवर, त्या व्हिडीओची तुफान चर्चा
सचिन अहिर ॲक्शन मोडवर! थेट वरळीला पोहोचले अन्...
Sachin Ahir | सचिन अहिर ॲक्शन मोडवर! थेट वरळीला पोहोचले अन्...
गृहमंत्री अमित शाहांचा मोठा गौप्यस्फोट! स्वातंत्र्यादीनाच्या अगदी एका
गृहमंत्री अमित शाहांचा मोठा गौप्यस्फोट! स्वातंत्र्यदिनाच्या अगदी एका दिवसापूर्वी... धक्कादायक माहितीचा खुलासा
शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींनी बोलावली तातडीची बौठक; NTA मध्ये मोठा बदल
शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींनी बोलावली तातडीची बौठक; NTA मध्ये मोठा बदल... दिल्लीत हालचाली वाढल्या!