AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today | ग्राहकांसाठी आनंदवार्ता, दरवाढीचा उडाला धुवा, सोने आणि चांदी आले की जमिनीवर

Gold Silver Rate Today 14 March 2024 | गेल्या आठवड्यात आलेल्या तेजीच्या तुफानाला या आठवड्यात मोठी उसंत मिळाली. दरवाढीचे तुफान गेल्या तीन दिवसांत थोपवून धरण्यात बाजाराला सवड मिळाली. सोने आणि चांदीने जोरदार आपटी खाल्ली. भाव कमी झाल्याने ग्राहकांना थोडा दिलासा मिळाला.

Gold Silver Rate Today | ग्राहकांसाठी आनंदवार्ता, दरवाढीचा उडाला धुवा, सोने आणि चांदी आले की जमिनीवर
झरझर उतरले सोने आणि चांदी Image Credit source: गुगल
| Updated on: Mar 14, 2024 | 8:31 AM
Share

नवी दिल्ली | 14 March 2024 : 1 ते 10 मार्च दरम्यान सोने आणि चांदीत तुफान तेजी आली. या तेजीने ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले. गेल्या आठवड्यात मौल्यवान धातूचा आलेख एकदम चढता होता. दणदण दर वधारले. अवघ्या काही तासांत धातूंनी मोठा पल्ला गाठला. या भयावह दरवाढीने ग्राहकांचा पार हिरमोड झाला. पण या आठवड्यात दरवाढीला ब्रेक लागला. या तीन दिवसांत भावात घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला. आता अशा आहेत सोने आणि चांदीच्या किंमती (Gold Silver Price Today 14 March 2024)..

सोने फिरले माघारी

या महिनाच्या सुरुवातीला, दहा दिवसांत सोन्याने 1 मार्चपासून ते 10 मार्चपर्यंत 3,430 रुपयांची आघाडी घेतली. गेल्या आठवड्यात अखेरच्या टप्प्यात पण दरवाढीची सलामी मिळाली. या आठवड्यात दरवाढीच्या आघाडीवर शांतता दिसून आली. 10-11 मार्च रोजी किंमती स्थिर होत्या. 12 मार्च रोजी किंमती किरकोळ 10 रुपयांनी कमी झाल्या. 13 मार्च रोजी यामध्ये 420 रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 60,500 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 65,900 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीत आपटी बार

मार्च महिन्यातील सुरुवतीच्या दहा दिवसांत चांदीने 3 हजारांची चढाई केली. तर या आठवड्यात सोमवारी पहिल्या दिवशी चांदी 100 रुपयांनी उतरली. तर 12 मार्च रोजी 500 रुपयांनी दरवाढ झाली. 13 मार्च रोजी 900 रुपयांची मोठी घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव आता 75,200 रुपये आहे.

  1. 14 ते 24 कॅरेटचा भाव काय – इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने आणि चांदी उतरले. 24 कॅरेट सोने 65,335 रुपये, 23 कॅरेट 65,073 रुपये, 22 कॅरेट सोने 59,847 रुपये झाले.18 कॅरेट 49,001 रुपये, 14 कॅरेट सोने 38,221 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 72,469 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
  2. घरबसल्या जाणून घ्या भाव – सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
महाराष्ट्रात 100 टक्के दुष्काळ जाहीर होणार? भरणेंनी काय दिलं आश्वासन
Maharashtra Drought | महाराष्ट्रात 100 टक्के दुष्काळ जाहीर होणार? मंत्री बाबासाहेब पाटलांची मोठी माहिती; पण दत्तात्रय भरणेंनी काय दिलं आश्वासन
सोलापूरात करपलेली सोयाबीन घेऊन संभाजी ब्रिगेडचं अनोखं आंदोलन
Solapur | काजू-बदाम नको, शेतकऱ्यांना मदत हवी; करपलेली सोयाबीन घेऊन संभाजी ब्रिगेडचं अनोखं आंदोलन
फोनवर बोलत रस्ता ओलांडताना डोक्यावर काहीतरी कोसळलं; 23 वर्षीय तरुण....
Mira Road | फोनवर बोलत रस्ता ओलांडताना डोक्यावर काहीतरी कोसळलं; 23 वर्षीय तरुण जखमी, पण घटनास्थळी वेगळंच सत्य समोर
राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’वरून वाद पेटला; पटेलांची टीका...
राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’वरून वाद पेटला; प्रफुल्ल पटेलांची टीका, सतेज पाटलांचा पलटवार
मोठी खळबळ! गरब्याच्या नावाखाली चक्क वेगवेगळे पार्टनर...
मोठी खळबळ! गरब्याच्या नावाखाली चक्क वेगवेगळे पार्टनर... महाराष्ट्रात नेमकं काय घडतंय?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना भावनिक पत्र, पार्थ सावध...
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना लिहिलेलं भावनिक पत्र, पार्थ सावध...
महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीस
Girish Mahajan | महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीसांचे तातडीचे आदेश
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय...
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय चर्चांना उधाण
विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
Praful Patel | विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... शेतकरी संतप्त
Viral Video : माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... संतप्त शेतकऱ्याचं सरकारला आव्हान