Gold Silver Rate Today 16 August 2024 : लाडक्या बहिणीसाठी आनंदवार्ता, रक्षाबंधनापूर्वी सोने झाले स्वस्त, चांदी महागली, काय आहेत आता किंमती

Gold Silver Rate Today 16 August 2024 : रक्षाबंधनापूर्वी सोने स्वस्त झाले आहे. गेल्या दोन दिवसापासून दरवाढीला ब्रेक लागला आहे. लाडक्या बहिणीला महागडे गिफ्ट द्यायचे असेल तर आता खरेदीची सुवर्णसंधी आहे. तर चांदीने उसळी घेतली आहे.

Gold Silver Rate Today 16 August 2024 : लाडक्या बहिणीसाठी आनंदवार्ता, रक्षाबंधनापूर्वी सोने झाले स्वस्त, चांदी महागली, काय आहेत आता किंमती
सोने आणि चांदीचा भाव
Follow us
| Updated on: Aug 16, 2024 | 8:26 AM

रक्षाबंधनाचा सण आता अगदी जवळ आला आहे. लाडक्या बहिणीसाठी राज्य शासनाने हप्ता जमा केला आहे. अनेक बहि‍णींच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे. लाडक्या बहिणीला तुम्हाला महागडं गिफ्ट द्यायचं असेल तर सोने स्वस्त झाले आहे. दोन दिवसापासून सोन्याच्या दरवाढीला ब्रेक लागला आहे. तर चांदीने उसळी घेतली आहे. या आठवड्यात मौल्यवान धातूत चढउताराचे सत्र सुरू आहे. काय आहेत या मौल्यवान धातूची किंमत? (Gold Silver Price Today 16 August 2024 )

दरवाढीला सोन्याचा ब्रेक

या आठवड्यात भाव कमी जास्त होत आहेत. आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोने 270 रुपयांनी तर 13 ऑगस्ट रोजी 104 रुपयांनी महागले. 14 ऑगस्ट रोजी किंमती 110 रुपयांनी कमी झाल्या. काल भावत कोणताच बदल झाला नाही. आज सकाळच्या सत्रात मौल्यवान धातूत घसरण दिसली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 65,700 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 71,660 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदी वधारली

या आठवड्याच्या सुरुवातीला चांदीत चढउताराचे सत्र दिसले. सोमवारी चांदी किलोमागे 600 रुपयांनी स्वस्त झाली. तर दुसऱ्या दिवशी 13 ऑगस्टला चांदीने 1 हजार रुपयांची मुसंडी मारली. 14 ऑगस्ट रोजी 500 रुपयांनी किंमती उतरल्या. 15 ऑगस्ट रोजी तितकीच दरवाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 83,500 रुपये आहे. आज सकाळच्या सत्रात चांदीत दरवाढीचे संकेत आहेत.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 70793, 23 कॅरेट 70,510, 22 कॅरेट सोने 64,846 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 53,095 रुपये, 14 कॅरेट सोने 41,414 रुपये प्रति 10 ग्रॅमवर उतरले आहे. एक किलो चांदीचा भाव 80,921 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

TV9 फेस्टीव्हलमध्ये अनुप्रिया पटेल यांनी घेतला देवी भगवतीचा आशीर्वाद
TV9 फेस्टीव्हलमध्ये अनुप्रिया पटेल यांनी घेतला देवी भगवतीचा आशीर्वाद.
त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?
त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?.
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका.
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?.
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल.
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?.
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?.
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '.
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे.
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड.